आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपर कॉमेडी 'चोर चोर सुपर चोर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चोर चोर सुपर चोर' या सिनेमात दिल्लीत वाढलेले छोटे-मोठे गुन्हे आणि झपाट्याने घसरणारी नैतिकता याचे उपहासात्मक पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. इतकेच नाही तर सिनेमाला 'सिझन 1' हे कॅप्शन देण्यामागेही एक रंचक कारण आहे.

'चोर चोर सुपर चोर' या सिनेमाची कथा रिअ‍ॅलिटी शोमध्ये वाढत असलेल्या शालीनतेच्या अपमानावर आधारित आहे. दिग्दर्शक के. राजेश, अनिल थॉमस आणि वी. राधाकृष्णन यांनी या सिनेमाच्या स्क्रिप्टच्या माध्यमातून मेट्रो सिटीत वाढत असलेल्या गुन्हेगारीला विनोदी ढंगाने पडद्यावर आणले आहे. मध्यमवर्गीय लोक उच्चभ्रू लोकांसारखे आयुष्य जगण्यासाठी कसे आसुसलेले असतात, हे सिनेमात चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

दिग्दर्शकांनी मध्यमवर्गीय लोकांना सिनेमात हायलाईट केले आहे. सिनेमाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. व्यक्तिरेखांना सामान्य आयुष्याच्या जवळ दाखवण्यात आले आहे. असे लोक दिल्लीतील मॉल्स, हायवेवर सहज भेटतात.

दीपक डोबरियालशिवाय जे कलाकार या सिनेमात झळकले आहेत, ते सर्व रंगभूमीवरील कलाकार आहेत. हे कलाकार कदाचितच यापूर्वी कधी मोठ्या पडद्यावर दिसले असतील.

सिनेमाला दोन भागात विभागण्यात आले आहे. पहिल्या भागात सिनेमातील व्यक्तिरेखा छोटे-मोठे गुन्हे करताना दिसताता. दुस-या भाग खूप उत्कृष्ट आहे. या भागात सर्व व्यक्तिरेखांची एन्ट्री रिअ‍ॅलिटी शोमध्ये होते. या भागात दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने नोकरदार वर्गासमोर येणा-या आव्हानांना चित्रीत केले आहे.

सिनेमाची कथा ओरिजिनल आणि दमदार आहे. मोठ्या खुबीने ती चित्रीत करण्यात आली आहे. क्लायमॅक्समध्ये सिनेमाची कथा थोडी भरकटते. याचा दोष त्यातील गाण्यांना देता येईल. कारण गरज नसताना सिनेमात गाणी टाकण्यात आली आहेत.

'चोर चोर सुपर चोर' हा सिनेमा न्यू एज सिनेमाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सिनेमाचा प्लॉट व्हिज्युअल्स आणि इमोशन्समध्ये योग्य पद्धतीने गुंफण्यात आला आहे. डोबरियाल आणि अन्य कलाकारांच्या भूमिका उत्कृष्ट झाल्या आहेत. हा एन्टरटेनिंग सिनेमा एक मोठे सरप्राईज पॅकेज असून एकदा तरी बघायलाच हवा.