आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जिस्म2'मध्ये ना लव्ह, ना सेक्स... फक्त धोका !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटातील हिरोच्या कॉफी टेबलच्या आजूबाजूला नोम चोमस्कीचे पुस्तक आणि चे ग्वेराचे आत्मचरित्र पडलेले दिसते. हा हिरो श्रीलंकेतील एका पंचतारांकित रिसोर्टमध्ये एकटाच वास्तव्याला असल्याचे आपल्या लक्षात येते. आपल्या या गुप्त ठिकाणाहून तो बॉम्बस्फोट आणि भारतात दहशतवादी कायवाया घडवून आणण्याचा कट रचतोय. चित्रपटातील या हिरोचे नाव आहे कबीर (रणदीप हुड्डाने भट्ट कॅम्पच्या चित्रपटात इमरान हाश्मीची जागा घेतली आहे) असून तो एक मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे.
कबीर हा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल एकेकाळी पोलिस ऑफिसर होता. त्याची एक प्रेयसीसुद्धा (सनी लियोन) होती. अचानक कबीर तिच्या आयुष्यातून निघून जातो. तिच्या आयुष्यात त्याचे काहीच स्थान उरत नाही. त्याच्याबरोबर काय झाले हे जाणून घेण्यासाठी ती मुळीच उत्सुक नसते. चित्रपट बघताना आपल्याला त्याची फारशी काळजी वाटत नाही.
मी ज्या थिएटरमध्ये बसून हा चित्रपट बघत होतो, त्या थिएटरमध्ये मोठ्या संख्यने पुरुषमंडळी हा चित्रपट बघायला आलेली होती. निश्चिकतच हे प्रेक्षक चित्रपटाची कथा, त्यातीत गाणी किंवा अभिनेत्यांना बघायला मुळीच आले नव्हते. इतकेच नाही तर टायटल आणि प्रोमोमधून जिस्म २ आणि जन्नत २ मध्ये तुलना करणे कठीण जाते. हे सगळे प्रेक्षक फक्त चित्रपटातील बॉम्बशेल सनी आणि तिचे लव्ह मेकिंग सीन बघायलाच चित्रपटगृहात आले होते.
आपल्या सिनेमातील अभिनेत्रींचे अस्तित्व केवळ यावरच आधारित आहे, की त्या आपल्या स्वप्नात येऊन किती खळबळ निर्माण करतात. या अभिनेत्री एकाप्रकारे समाजसेवाच करत आहेत.
'जिस्म २'ची अभिनेत्री म्हणून सनीच्या नावाची घोषणा झाली त्या दिवसापासून प्रेक्षक सनीला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक होते. प्रेक्षकांची ही आवड ओळखण्यात महेश भट्ट चतुर आहेत. सनी भारतीय चित्रपटात काम करणा-या मोनालिसा (भोजपूरी आणि बंगाली चित्रपटातील पोर्न स्टार), नमिता किंवा शकिला (साउथ इंडस्ट्री), किंवा बॉलिवूडशी संबंधित असलेल्या राखी सावंत, शर्लिन चोप्रा यांच्यापेक्षा वेगळी आहे. वास्तवात सनी पश्चिमेकडील देशातील पोर्न स्टार आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्याला मिस लियोनच्या अभिनयाला सुधारण्यासाठी फक्त एकच काम चांगले करावे लागले ते म्हणजे डबिंग. मात्र चित्रपटातील डबिंग नीटप्रकारे झालेले नाहीये. प्रत्येक संवादाला सनी केवळ उठत किंवा बसत आहे आणि लांब श्वास घेत आहे. शिवाय घाबरुन आपल्या भुवया उंचावत आहे. चित्रपटात तिने नेमकी कोणती भूमिका साकारली आहे, हे सांगणे कठीण होते. म्हणूनच सनीचा अभिनय ताकदीचा नाहीये.
चित्रपटात ती कॉलगर्लही असू शकते. चित्रपटातील पहिल्या दृश्यात ती एका डिस्कोथेकमधून एका तरुणाला (अरुणोदय सिंग) आपल्यासोबत आणते. हा तरुण तिच्याबरोबर रात्र घालवल्यानंतरही तिला पैसे देत नाही. उलट तो तिच्यासमोर एक जॉबची ऑफर ठेवतो. हा तरुण पोलिस ऑफिसर असतो. काही मिनिटांनी सनी आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा छडा लावण्यासाठी भारतीय गुप्त एजन्सीला मदत करायचे ठरवले. (सनीचा हा एक्स बॉयफ्रेंड पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे.)
चित्रपटात दोन दोन धष्टपुष्ट पुरुष आहेत. हे दोघेही अर्धनग्न तरुणीसाठी शारिरीक रुपाने ऑब्सेस्ड आहेत. अश्लिल (प्रोनोग्राफिक फिल्म) चित्रपटाला शोभेल असे चित्रपटाचे कथानक आहे. जोपर्यंत चित्रपट क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत या चित्रपटात इतर हिंदी चित्रपटांप्रमाणे जास्तीत जास्त सेक्स नसल्याचे आपल्या लक्षात येते.त्यामुळे तुम्हाला अर्धनग्न पुरुष (अरुणोदय आणि रणदीप) आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादावर बडबड करणा-या एक वेडा बॉसला (आरिफ जकारिया) सहन करावे लागते.
सहसा सेक्स सीन प्रेक्षक एन्जॉय करताना दिसतात. मात्र येथे कलाकारांच्या गंभीर संवादांवरही प्रेक्षकांना हसू कोसळते. शुद्ध उर्दूमध्ये असलेले संवाद षडयंत्राच्या कठीण थेअरीबद्दल आहेत. कदाचित चित्रपटात मनोरंजनाच्या नावावर फक्त एवढेच आहे.
२००२साली सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष असलेले दिवंगत दिग्दर्शक विजय आनंद यांनी भारतात वयस्कर प्रेक्षकांसाठी चित्रपट प्रदर्शित होऊ शकतील असे एक्स-रेटेट चित्रपटगृह सुरु करण्याचे सुचवले होते. विजय आनंद यांच्या या सल्ल्यावर विचार करण्याचे तर दुरच त्यांना थेट अध्यक्षपदावरुन पायउतर करण्यात आले होते.
कदाचित सरकारने त्यावेळी विजय आनंद यांच्या म्हणण्यावर विचार केला असता, तर आज मिस लियोनला अभिनय करताना जेवढी मेहनत घ्यावी लागली तेवढी घ्यावी लागली नसती आणि आपल्यावरही कलाकारांचा सुमार दर्जाचा अभिनय पाहण्याची वेळ आली नसती.(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)