आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बक बक बक.... (सत्याग्रह चित्रपटाचे परिक्षण)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट सुरू झाल्याबरोबर अजय देवगण एका तरुण विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसतो. जीवलग मित्राच्या लग्नासाठी एका लहान गावात तो गेलेला असतो. त्याच्या जीवलग मित्राचे वडील (अमिताभ बच्चन) सिधांतवाडी येथील एका शाळेचे माजी मुख्याध्यापक असतात. मित्राच्या घरी जेवण घेतल्यावर त्याचे वडील (त्यांना आपण बीएफएफ म्हणू शकतो) अजयला विचारतात, की त्याच्या भविष्यातील योजना काय आहेत. त्याला पुढे काय करायचे आहे. अभ्यास पूर्ण केल्यावर मला एक छोटासा बिझनेस करायचा आहे, असे अजय त्यांना सांगतो. त्यावर मित्राचे वडील जरा चिडतात. पैसा कमविणे तुमचा धर्म आहे आणि मार्केट तुमची मॉरॅलिटी असा आरोप ते करतात.

त्यानंतर रात्रीच्या सुमारास अजय त्याच्या मित्रासोबत घराच्या गच्चीवर बसून मद्य प्राशन करीत असतो. यावेळी त्याचे वडील तेथे येतात. अजयला ते पुन्हा उपदेश करतात. माझ्या मुलाला वाईट मुलांची संगत लागली आहे, असे सांगतात. त्यांचा मुलगा सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असतो. रात्र जशी सरत जाते, तसा अजय तेथून बाहेर पडण्याचा विचार करतो. एका ऑटो बोलवून तो तेथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी असलेले लग्नही तो अटेंड करीत नाही.

चित्रपटाची ही सुरवात आहे. यावरून चित्रपट पुढे सरकतो. पुढील अडीच तासात आपण एवढेच समजू शकतो, की सगळे बरोबर आहेत आणि सगळेच चुकीचे आहेत.

पुढील तीन वर्षांत अजय 6,000 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या एका कंपनीचा मालक होतो. त्याचा जीवगत मित्र एका रस्ता अपघातात जीव गमावतो. जिल्हाधिकाऱ्याला कानाखाली वाजविल्याने त्याचे वडील लॉकअपमध्ये असतात. अपघाती मृत्यू झाल्याने मिळणारी सरकारी मदत त्यांना मिळत नाही. त्यानंतर अगदी काही क्षणांमध्ये अजय मित्राच्या वडीलांना सोडविण्यासाठी आंदोलन पुकारतो. दिल्लीतील एक सुंदर पत्रकार (करिना कपूर) त्यांच्या गावात ठिय्या मारून बसते. ती एक चांगली पत्रकार असते, असे आपण म्हणू शकतो. ती पंतप्रधानांची मुलाखत घेण्याची असाईनमेंटसुद्धा धुडकावून लावते. तरीही तिचे संपादक काही करू शकत नाहीत. ती भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी होते. यावेळी स्थानिक गुंड (अर्जुन रामपाल) कथानकात प्रवेश करतो.

त्यानंतर काही मिनिटांत चित्रपटाच्या स्क्रिनवर फेसबुक स्टेट्स, ट्विट्स झळकतात. एकापाठोपाठ एक पब्लिक रॅली निघतात. त्यांच्याविरुद्ध पोलिस बळाचा वापर केला जातो. वॉटर कॅनन वापरले जातात. या जमावाने कधी भ्रष्टाचार केलेला नसावा, असे आपण गृहित धरू शकतो. जिल्हाधिकारी लाच मागतो. मित्राचे वडील सगळे प्रलंबित सरकारी अर्ज 30 दिवसांच्या आत क्लिअर करण्याची मागणी करतात.

आतापर्यंत तुम्ही चित्रपटाचा डीएनए समजू शकता. हा चित्रपट एक राजकीय थ्रिलर आहे. प्रकाश झा यांनी तो दिग्दर्शित केला आहे. ही लोकेशन भोपाळमधील आहे. लोकांच्या भाषेला जरा बिहारी टच आहे. आरक्षण चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी बजावलेल्या भूमिकेची या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका एक प्रकारे सिक्वेल आहे. अगदी शांत स्वभाव, गरीबांसाठी झटणारा व्यक्ती अशी त्यांची इमेज यात रंगविण्यात आलेली आहे.

2011 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले आंदोलन आपल्या स्मरणात आहे. त्याच धर्तिवर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. अण्णाच्या आंदोलनाचा प्रथम सोशल मीडियावर प्रसार झाला. त्यानंतर ते देशभरात वणव्यासारखे पेटले.

या चित्रपटातील पात्र भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असतात. अजयच्या मित्राच्या वडीलांचा मागण्या आंदोलनाच्या वाटचालीसह बदलत जातात. सुरवातीला ते जिल्हाधिकाऱ्याला हटविण्याची भाषा करतात, त्यानंतर राजकारणात जाण्याचा विचार करतात, त्यानंतर विधेयक आणण्यावर विचार होतो. यावेळी मित्राचे वडील आणि आंदोलकांमध्ये क्वचितच चर्चा घडते. या चित्रपटात भ्रष्टाचाराची चर्चा करण्यात आली आहे. परंतु, याचा प्लॉट नेमका कोणताय? उलट अजयचा मित्राची हत्या घडवून आणणारे कोण आहेत, याचा शोध घेतला जातो. अजयच्या मित्राची भूमिका सत्येंद्र दुबे यांच्यावर आधारित वाटते. 2005 मध्ये माफियांनी दुबे यांची हत्या केली होती. राष्ट्रीय राजमार्ग प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. ते उघडकीस आल्याने त्यांची माफियांनी हत्या केली होती.

भूक, भ्रष्टाचार, गरिबी असे मुद्दे सादर करून लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आलाय. परंतु, या पातळीवर चित्रपट यशस्वी झालेला नाही. त्यानंतर तुम्ही म्हणाल, की बस आता खुप झाले यार. बक बक बंद करा. यापेक्षा जास्त मनोरंजन तर टीव्हीवरही मिळते यार....