आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIRST REACTION : मद्रास कॅफे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'मद्रास कॅफे'त रचला गेला होता राजीव गांधींच्या हत्येचा कट

दिग्दर्शक- सुजीत सरकार

जॉन अब्राहम- रॉ एजेंट विक्रम सिंह

नर्गिस फाखरी- जया, ब्रिटिश वार रिपोर्टर

राशि खन्ना- रूबी सिंह, विक्रम सिंह की पत्नी

अजय रत्नम- अन्ना भास्करन


ऐंशीच्या दशकात मध्य श्रीलंकेत निष्पाप लोकांची हत्या करणं आणि सिव्हिल वॉरचं चित्र तब्बल 27 वर्षे बघायला मिळालं. श्रीलंकेतील सिव्हिल वॉरमध्ये हजारो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. नव्वदच्या दशकात भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांचीही हत्या घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकन सिव्हिल वॉरची सुरुवात तामिळ टायगर्सचा लीडर वेलुपिल्लई प्रभाकरने केली होती. तेव्हा भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती, की राजीव गांधी यांच्या हत्येचा कट प्रभाकरणनेच रचला होता. निष्पाप लोकांचा जीव वाचवण्यासाठी अनेक भारतीय जवान शहिद झाले. याच सत्यघटनेवर दिग्दर्शक सुजित सरकारने 'मद्रास कॅफे' हा सिनेमा बनवला. हा सिनेमा 70 एमएमवर भारतीय सिनेमाचे ते रुप सादर करत आहे, ज्याला एक्स्ट्राऑर्डनरी पॉलिटिकल थ्रिलर म्हटले जाते.

भारताच्या समकालीन इतिहासाला सुजित सरकारने बुद्धीमानाने दर्शवले आहे. त्यांना हा सिनेमा इतक्या सहज आणि बॅलेन्स पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवले की हा सिनेमा बुद्धीमान सिनेमाचे एक उदाहरण आहे. म्हणजेच तुम्ही रटाळ आणि टिपिकल लव्ह स्टोरी असलेले सिनेमे बघून कंटाळले असाल, तर 'मद्रास कॅफे' हा सिनेमा तुम्हाला इतिहासात घेऊन जाईल.

भारताच्या वतीने पाठवण्यात आलेला शांती प्रस्ताव स्वीकार न केल्यामुळे भारत सरकार रॉ एजंट विक्रम सिंहला श्रीलंकेत पाठवतं. जेणेकरुन तो तेथे शांती कार्य पुढे नेऊ शकेल. येथे एजंट विक्रमची भेट ब्रिटिश रिपोर्टर जयाबरोबर होते. तिच्या मदतीने विक्रम सिंह अखेर धोका, पॉवर, कट-कारस्थान उघड करतो. मात्र तो आपल्याच सिस्टमध्ये असलेल्या कमतरतेमुळे, आपल्याच लोकांकडून मिळालेल्या दगामुळे भारताच्या माजी पंतप्रधानांचा जीव वाचवू शकत नाही. म्हणजेच राजकारणाची पोलखोल करण्याचीही कहाणी आहे 'मद्रास कॅफे'.

उत्कृष्ट स्क्रिनप्लेमुळे सिनेमाची कथा प्रत्येक वळणावर प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि पुढे काय होणार, याची उत्सुकता निर्माण करते. सोमनाथ डे आणि शुभेंद्रू भट्टाचार्य यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.

कौतुकास्पद बाबा म्हणजे, सुजित सरकारने प्रत्येक पात्राची निवड मनापासून केली आहे. सर्वच कलाकारांनी मनापासून अभिनय केला आहे. प्रत्येक कलाकार आपल्या व्यक्तिरेखेत फिट बसला आहे. अन्ना भास्करनची भूमिका साकारणारा अभिनेता अजय रत्नम या भूमिकेत अगदी फिट बसला आहे. कोणतीही व्यक्तिरेखा सिनेमाच्या कथेवरुन भरकटत नाही. कलाकारांचा अभिनय जिवंत वाटतो.

रॉ एजंट विक्रम सिंहच्या भूमिकेत असलेला जॉन अब्राहम या सिनेमाचा निर्मातासुद्धा आहे. त्यामुळे या सिनेमात तो मेन लीडमध्ये असणे ठरलेलेच होते. जॉनच्या करिअरमधील हा एक नवीन प्रयोग आहे. डॅशिंग आणि सेक्सी जॉनसाठी ही भूमिका एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हती. तसे पाहता जॉनकडे रॉ एजंटसारखी बॉडी आहे. मात्र एक्स्प्रेशन्स आणखी दमदार होऊ शकले असते.

या सिनेमाचे श्रेय एकट्या कलाकारांना नव्हे तर यूनिट मेंबर्सनाही जातं, ज्यांनी एका सत्य घटनेला ड्रामा न बनवता सादर केले. नर्गिस ब्रिटिश रिपोर्टरच्या भूमिकेत असल्यामुळे तिचे सर्व संवाद इंग्रजीतूनच होते. त्यामुळे ही भूमिका साकारणे नर्गिससाठी सोपे गेले. सिनेमात जॉनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे नवोदित अभिनेत्री राशी खन्नाने. राशीला अभिनयाचे धडे गिरवण्याची गजर आहे.

सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी कमलजीत नेगी यांचे कौतुक व्हायलाच हवे. सिनेमाचे शूटिंग श्रीलंका, मलेशिया, थायलंड, लंडन आणि भारतात झाले आहे. जाफना आणि श्रीलंकेतील ब-याच भागांची निर्मिती भारतातच करण्यात आली. कारण श्रीलंकेत शूटिंग करणे सोपे नसल्यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये याचे जास्तीत जास्त शूटिंग झाले.

सिनेमाच्या सेकंड पार्टचे जास्तीत जास्त चित्रीकरण भारतातच झाले आहे. सिनेमाचा पहिला भाग दक्षिण भारतात शूट करण्यात आला.

भारतात लाईट मशीनगन फायरिंगची परवानगी न मिळाल्यामुळे युद्धाचे काही दृश्य बँकॉकमध्ये शूट करण्यात आले.
ख-याखु-या एके- 47, 9 Berettas आणि M60s यांच्या उपयोगासाठी तेथील स्थानिक अधिका-यांकडून परवानगी घेण्यात आली. या सिनेमाला संगीतबद्ध केले आहे शांतनू मोइत्रा यांनी.

'मद्रास कॅफे' का बघावा याची पाच कारणे...

1.. सिनेमात श्रीलंकन सिव्हिल वॉर दाखवण्यात आले, जी सत्य घटना आहे आणि 27 वर्ष ते सुरु होते. सुजित सरकारने या सिनेमाच्या रिसर्चमध्ये कोणतीच कमतरता ठेवलेली नाही. प्रत्येक बारीक गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिले आहे.

2.. सिनेमाचा दिग्दर्शक सुजित सरकारने यापूर्वी 'विकी डोनर' हा सुपरहिट सिनेमा दिला आहे.

3..जर तुम्ही लव्ह स्टोरीज आणि कॉमेडी सिनेमांना कंटाळला असाल, तर 'मद्रास कॅफे' बघायला हवा.

4.. सिनेमात कुठेही राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख नाहीये, मात्र सुजित सरकार स्वतः सांगतात, की या कथेत वास्तव संदर्भ आहे.

5.. 'रॉकस्टार'नंतर नर्गिस फाखरीला दुस-यांदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षक बघणार आहेत. यावेळी नर्गिसने आपल्या ग्लॅमरस इमेजपासून हटके अभिनय केला आहे.

(सिरिअस टॉपिकमुळे गाणी, आयटम नंबर नसलेला हा सिनेमा 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'ये जवानी है दिवानी' या सिनेमांच्या प्रेक्षकांना कदाचितच आवडेल.)