आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : हवाईजादा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाच्या पोस्टरवर पल्लवी शारदा आणि आयुष्मान खुराना)
सिनेमाचे नाव हवाईजादा
क्रिटिक रेटिंग 2.5/5
मुख्य कलाकार आयुष्मान खुराणा, मिथून चक्रवर्ती आणि पल्लवी शारदा
दिग्दर्शक विभू पुरी
निर्माते विशाल गुरमानी, राजेश बंगा आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट
संगीतकार रोचक कोहली आणि मंगेश धाकडे
जॉनर ड्रामा
आज बॉक्स ऑफिसवर 'हवाईजादा' हा सिनेमा रिलीज झाला आहे. विभू पुरी दिग्दर्शित या सिनेमाचे कथानक भारताचे महान शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांच्या जीवनपटावर आधारित आहे. शिवकर बापूजी तळपदे या मराठमोळ्या शास्त्रज्ञांनी पहिले मानवरहित विमान तयार केले होते. शिवकर यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला होता. राईट बंधूच्या आधी 8 वर्ष म्हणजे 1895 मध्ये तळपदे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिटे मनुष्यरहित विमान उडविले. त्या विमानाचे नाव मरुत्‌सखा होते.
काय आहे सिनेमाचे कथानक
शिवकर बापूजी तळपदे उर्फ शिवी (आयुष्मान खुराणा) बालपणी एकाच वर्गात अनेकदा नापास होतो. शिवीचे वडील यामुळे खूप नाराज होतात आणि त्याला घराबाहेर हाकलून देतात. वडिलांनी घरातून काढून टाकल्यानंतर शिवीची भेट पंडित सुब्बाराय शास्त्री (मिथून चक्रवर्ती) यांच्यासोबत होते. संस्कृत आणि वेदांचे अभ्यासक असलेल्या पंडित सुब्बराव शास्त्री शिवीच्या वडिलांना सांगतात, की त्यांचा मुलगा हिरा असून एकेदिवशी जगात आपले नाव मोठे करेल. सुब्बराव शास्त्री यांनी लिहिलेल्या वैमानिक शास्त्र या अभ्यास ग्रंथावरुन शिवीला विमान उडवण्याची प्रेरणा मिळते. एक मराठी तरुण इंडियन फ्लाइंग मशीन बनवत असल्याची कुणकुण जेव्हा इंग्रजांना लागते तेव्हा ते शिवीचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी कटकारस्थान रचतात. आता इंग्रज शिवीचा प्रयत्न उधळून लावतात का? की शिवी जगातील पहिला मानवरहित विमान तयार करण्यात यशस्वी होतो, हे वाचण्यापेक्षा मोठ्या पडद्यावर बघणे इंट्रेस्टिंग ठरेल. या सिनेमात शिवी आणि सितारा (पल्लवी शारदा) यांची रोमँटिक लव्हस्टोरीसुद्धा बघायला मिळते.
कसा आहे कलाकारांचा अभिनय
आयुष्मान खुराणा शिवकर बापूजी तळपदेंच्या भूमिकेत अगदी फिट बसला आहे. त्याचा अभिनय बघण्याजोगा असून या भूमिकेसाठी त्याच्याव्यतिरिक्त दुस-या कुणाचा विचारच होऊ शकत नाही. मिथून चक्रवर्ती यांनी शिवीचे मार्गदर्शक सुब्बाराय शास्त्री यांची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली आहे. पल्लवी शारदाविषयी बोलायचे झाल्यास 'बेशरम'नंतरचा तिचा हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमात पूर्वीपेक्षा ती बरीच सडपातळ दिसतेय. तिने शिवीच्या प्रेयसीची भूमिका चांगली वठवली आहे. मात्र तिच्या भूमिकेवर 'देवदास'च्या चंद्रमुखीचा थोडा प्रभाव असल्याचे जाणवते.
पुढे वाचा, कसे आहे दिग्दर्शन आणि हा सिनेमा पहावा की नाही...