आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Review Of Umesh Kamat Starer Marathi Film Balkadu

Movie Review : धगधगत्या विचाराचा मराठी बाणा 'बाळकडू'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील मराठी माणसाची कुचंबणा यातून नेमकी टिपली आहे. सध्याची सामाजिक स्थिती त्यातील राजकारण, अर्थकारण यावर चांगला प्रकाश टाकण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या हुबेहुब आवाजामुळे बाळकडूला वेगळ्या उंचीवर नेले आहे. मराठी कुटूंबाला वाऱ्यावर सोडणारे राजकारणी, मराठी माणसाचा खालावलेला आत्मविश्वास, तरूणाईची दिशाहिन अवस्था यावर चुरचुरीत भाष्य करत बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची जोड देत कथानक फुलवण्यात आले आहे. एकूण प्रत्येक मराठी माणसाने अनुभव घ्यावा असे हे बाळकडू आहेत.
स्टोरी :
मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एका सामान्य शिक्षकाने बाळासाहेबांच्या विचाराने दिलेला लढा यात आहे. बाळासाहेबांच्या आवाजाचा वापर उत्तम.
डायरेक्शन :
बाळासाहेबांच्या प्रतिमांचा चांगला वापर करत विविध अँगलने बाळासाहेबांचे अनेक पैलू समोर आणण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
अॅक्टिंग :
उमेश कामतने मध्यवर्ती भूमिका समजून, उमजून पार पाडली आहे. भाषणबाजीची दृश्ये दमदार वठली आहेत. नेहा पेंडसे, भाऊ कदम, प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे नेहमीप्रमाणे उत्तम.
म्युझिक :
संगीताला फारसा वाव नाही. तरीही तानाजीचा पोवाडा वातावरण निर्मितीसाठी चांगला वापरला आहे.