आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सिनेमात श्रेयस सुपरहिरोची भूमिका साकारणार असून, तो मराठीतला पहिलाच सुपरहिरो असेल. हिंदीत रमलेला श्रेयस सात वर्षांच्या खंडानंतर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी सिनेमाकडे वळला आहे. 'बाजी' हा मराठीतला पहिला सुपरहिरो सिनेमा ठरणार असून, रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी असा पुरेपुर मसाला या सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवता येईल. 'बाजी'मध्ये खजिन्याचा शोध आणि माणसाच्या ओळखीचा गोंधळ असे मजेशीर कथानक मांडण्यात आले आहे.
हा मराठीतला पहिला सुपरहिरो सिनेमा असला, तरी तो हॉलिवुडपटांवरून घेण्यात आलेला नाही. मराठी प्रेक्षकांना आपलासा वाटणारा मराठमोळा सुपरहिरो यात असेल. विशेष म्हणजे, सुपरहिरो असूनही त्याला कोणत्याही विशेष शक्ती हस्तगत झालेल्या नाहीयेत.
श्रेयसव्यतिरिक्त अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.या सिनेमात एकुण सहा गाणी आहेत. अभिनेत्री श्रुती मराठेवर चित्रीत करण्यात आलेला आयटम नबंर या सिनेमाचा आकर्षणबिंदू आहे. 'दार मोशन पिक्चर्स' ही संस्था या सिनेमाची निर्मिती करत आहेत. त्यांना 'इंडियन मॅजिक आय' आणि 'ब्ल्यू ड्रॉप' यांचंही सहकार्य आहे.