आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review: 3 A.M.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही महिन्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर 'डर@ दि मॉल', 'पिज्जा ३D', आणि 'मछली जल की रानी है'सारखे हॉरर सिनेमे रुपेरी पडद्यावर दाखल झाले. या आठवड्यात '3 A.M.' सिनेमा रिलीज झाला. मात्र सिनेमा हॉरर नव्हे मनात पश्चातापाची भावना निर्माण करतो.
कहाणी-
सनी (रणविजय सिंह) आणि सारा (अनंदिता नायर) एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. सनी दिग्दर्शक असतो आणि सारा डॉक्युमेंट्री बनवते. सारा भूतबंगल्यासारख्या मिलमध्ये डॉक्युमेंट्रीसाठी रात्रीच्या वेळी जाते. सकाळी अचानक तिचा मृतदह पंख्याला लटकलेला आढळतो. सनीला या गोष्टीचा धक्का बसतो. त्यानंतर तो साराला भेटण्यासाठी एक शो तयार करतो. या शोच्या माध्यमातून तो रुद्र मिलमध्ये घडलेल्या घटनेचा आणि साराच्या मृत्यूच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.

या कामात सनीला सायरस (सलिल आचार्य) आणि राज (कविन दावे) साथ देतात. तिघे त्यांच्या योजनेनुसार मिलमध्ये पोहोचतात. तिथे त्यांच्यासोबत विचित्र घटना घडायला लागतात. रुद्र मिलमध्ये तिघांसोबत काय होते? साराच्या मृत्यूचे रहस्य उलगडते का? तिघे त्या मिलमधून बाहेर पडण्यात यशस्वी होतात का? या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागेल. मात्र सिनेमा पाहताना तुमच्या मनात उत्सूकता निर्माण होत नाही. पश्चातापाची भावना निर्माण करणारा हा सिनेमा कोणत्याही प्रकारे भयावह नाहीये.
अभिनय
वीजे रणविजय सिंह यापूर्वी 'अॅक्शन रिप्ले', 'मुंबई कटींग' आणि 'लंडन ड्रिम्स' सिनेमात दिसला आहे. मात्र तो त्याच्या आर जेच्या प्रतिमेतून अद्याप बाहेर पडलेला दिसत नाहीये. त्याच्या बोलण्याच्या पध्दतीने संवाद दमदार असूनही वाटत नाही. इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक अभिनेते एंट्री घेत आहे. मात्र रणविजय अद्याप अभिनयात कच्चा लिंबूच आहे. अनंदिता नायरला अभिनयच येत नाही असे म्हणावे लागेल. सिनेमा कमकुवत कलाकार आणि पटकथेमुळे बॉक्स ऑफिसवर आपटला आहे.
दिग्दर्शन
पटकथाच कमजोर आहे तर त्यात दिग्दर्शविषयी बोलणे मुर्खपणाचे ठरेल. दिग्दर्शक विशाल महाडकरने सिनेमनाला पैसा लावला मात्र पटकथा वाचलेली नव्हती. विशालने यापूर्वी 'ब्लड मनी' हा सुपरफ्लॉप सिनेमा बनवलेला आहे.
पाहूच नये
हा सिनेमा पाहून पश्चाताप व्यक्त करण्यापेक्षा पाहूच नका असे आम्ही सांगत आहोत. कारण ज्यात भयावह दृश्य आणि दमदार अभिनय नाही तो सिनेमा पाहण्यात काहीच अर्थ नाहीये. तीन तास वेळ वाया घालवण्यापेक्षा सिनेमा टीव्हीवर पाहिलेला बरा.