Home »Reviews »Movie Review» Movie Review: Abcd(Any Body Can Dance)

'ABCD'मध्ये प्रभू देवा छा गया !

मयांक शेखर | Feb 09, 2013, 16:01 PM IST

  • 'ABCD'मध्ये प्रभू देवा छा गया !
    Critics Rating
    • Genre: ड्रामा
    • Director:
    • Plot: हा सिनेमा तुमच्यासाठी एक उत्तम डान्स प्रशिक्षक ठरु शकतो. जर तुम्हाला डान्स शिकायचा नसेल तर माझ्यासारखे आरामात बसून तुम्ही या सिनेमाची मजा घेऊ शकता.

प्रत्येकजण डान्स करु शकतो का, हे मला ठाऊक नाही. मला स्वतःला डान्स आवडतो असेही नाही. मात्र मी एका जागी बसून स्क्रिनवर सुरु असलेले परफॉर्मन्स बघण्यात गुंग झालो होतो. एकानंतर एक क्रेजी स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मी हे खात्रीने सांगू शकतो की, प्रत्येकजण डान्स करुच शकेल असे नाही, मात्र प्रत्येकजण हा सिनेमा बघण्याची मजा नक्कीच लूट शकतो.

बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त सिनेमांमध्ये म्युझिक व्हिडिओचाच भरणा असतो. सिनेमाच्या कथानकाचे डान्स सिक्वेन्सबरोबर काहीही घेणेदेणे नसते. जर ऋतिक रोशन आणि शाहिद कपूरला वगळले तर भारतातील सर्वोत्कृष्ठ समजल्या जाणा-या अभिनेत्यांची पाऊले क्वचितच डान्स करताना हलतात. हे सगळे काही खूप विचित्र आहे. कारण अनेक सिनेमांचा पाया हा साऊंडट्रॅक आणि कोरिओग्राफीवरच असतो. हार्डकोर डान्सर्सना घेऊनच एक संपूर्ण सिनेमा तयार करण्याची कल्पना आजवर कुणालाच सुचली नाही, हे एक आश्चर्य आहे. असे झाले असते तर आत्तापर्यंत म्युझिक आणि कोरिओग्राफीसाठी घेतलेली मेहनत नक्कीच फळाला आली असती. असो, हा संपूर्ण डान्सवर आधारित सिनेमा आहे.

एबीसीडीमध्ये काही उत्तम डान्सर्स आपल्याला पडद्यावर दिसतात. सिनेमाचा फंडा खूपच सरळ आहे. तो म्हणजे एका एका डान्सनंतर दुसरा डान्स. त्यामुळे सिनेमातील कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची योग्य संधी मिळते. मद्रासचे मूनवॉकर ग्रेट प्रभू देवा आणि कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमोच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुणांनी उत्तम काम केले आहे. या तरुणांनी प्रेक्षकांची निराशा मुळीच केलेली नाही. त्यांनी केलेला डान्स आपल्याला अचंबित करणारा आहे. हा सिनेमा उत्तम डान्ससाठीच बघायला हवा.

सिनेमाची कथा अशी आहे की, प्रभू देवा एक डान्स टीचर आहे. एका अ‍ॅकॅडमीत तो मुलांना डान्सचे प्रशिक्षण देत असतो. मात्र त्याला त्या प्रसिद्ध आणि महागड्या डान्स अ‍ॅकॅडमीतून काढून टाकण्यात येतं. त्याचे या डान्स अ‍ॅकॅडमीच्या मालकाबरोबर फारसं पटत नसतं. व्हिलेन जहांगीरची भूमिका के के मेननने साकारली आहे. त्याला बघून आपल्याला शाहरुख खानच्या 'रा वन'मधील जी वनची आठवण होते. जहांगीर टीव्ही डान्स शोच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावतो आणि त्याला प्रभू देवाच्या कलात्मक प्रतिभेची गरज नाहीये. क्लासरुममध्ये तो प्रभू देवाला म्हणतो की, तू 50 विद्यार्थ्यांना नाचवतो. मात्र ख-या आयुष्यात मी पाचशे जणांना आपल्या तालावर नाचवतो. ही एक अंडर-डॉग कथा आहे. मात्र त्याला वास्तविक रुपात चित्रीत करण्यात आले आहे. हा सिनेमा बघताना प्रेक्षकांना कदाचित अमरीश पुरी यांची आठवण होईल.

प्रभू देवाच्या वर्गात झोपडपट्टीत राहणारी मुले डान्स शिकतात. सिनेमाची कथा वेगाने पुढे सरकते. एका विद्यार्थ्याचे वडील या डान्स क्लासच्या विरोधात आहेत. मुले ज्या ठिकाणी डान्सचे प्रशिक्षण घेतात त्या ठिकाणी पोलिस टाळा ठोकतात. सिनेमातील छोटे-छोटे दृश्य मुळ कथानकाला जोडून ठेवतात.

ज्या प्रेक्षकांना डान्सबद्दल कळतं, ते अधूनमधून बॉडी वेव, मिरर वॉक, रोप स्लिंग अशा शब्दांचा वापर करून माझ्या ज्ञानात भर घालत होते. अनेक लोक याप्रकारचे सिनेमे यासाठी बघतात कारण ते डान्सच्या नव्या स्टेप्स शिकू शकतील. मी डान्स विशेषज्ञ नसल्यामुळे सिनेमातील डान्स स्टेप्स नवीन आहेत की जुन्या हे मी सांगू शकत नाही. मात्र सिनेमातील म्युझिक दमदार आहे. तुम्ही एक सामान्य प्रेक्षक म्हणून सिनेमा बघितला तर हे म्हणू शकता की, सिनेमातील फाईट सीन्स आणि चेस सिक्वेन्सचीही उत्तम कोरिओग्राफी करण्यात आली आहे.

'स्टेप अप' या हॉलिवूड सीरिजच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा पाश्चिमात्य डान्स शैलीचे अनुकरण करतो. मुंबईतील झोपडपट्टीची तुलना तुम्ही ब्लॅक अमेरिकन गेटोजबरोबरही करु शकता. सिनेमात गणेश विसर्जनाचे दृश्यही दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा तुमच्यासाठी एक उत्तम डान्स प्रशिक्षक ठरु शकतो. जर तुम्हाला डान्स शिकायचा नसेल तर माझ्यासारखे आरामात बसून तुम्ही या सिनेमाची मजा घेऊ शकता.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)

Next Article

Recommended