आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO MOVIE REVIEW: \'अलोन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार 1
सिनेमा अलोन
कलाकार बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर
दिग्दर्शक भूषण पटेल
निर्माता कुमार मंगत, अभिषेक पाठक, प्रदीप अग्रवाल आणि प्रशांत शर्मा
संगीत अंकित तिवारी आणि मिथुन
जेनर हॉरर
आतापर्यंत, 'राज', 'राज 3' आणि 'आत्मा'सारख्या हॉरर सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी बिपाशा पुन्हा एकदा हॉरर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सिनेमाचा दिग्दर्शक भूषण पटेल असून '1920: एविल रिटर्न्स' आणि 'रागिनी एमएमएस 2' नंतर त्याला हा तिसरा हॉरर सिनेमा आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत बिपाशाशिवाय टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर आहे. त्याने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.
कहाणी-
सिनेमाची कहानी दोन जुळ्या बहिणींची आहे. संजना आणि अंजना (बिपाशा बसु) दोघी सयामी जुळ्या असतात. दोघींचा एकमेकींमध्ये खूप जीव असतो. परंतु कबीर (करण सिंह ग्रोवर) जेव्हा त्यांच्या आयुष्यात येतो, तेव्हा दोघींमध्ये तिरस्कार निर्माण होतो. कबीरवर संजना आणि अंजना दोघींना प्रेम होते. परंतु कबीरला फक्त संजना आवडते. हे पाहून अंजानाला हेवा वाटतो. कबीर संजनासोबत परदेशात जाण्याचा निर्णय घेतो, मात्र अंजाना त्याला असे करू देत नाही. अखेर संजना वेगळे होण्याचा निर्णय घेते. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान अंजना संजनाला मारून टाकते आणि स्वत: संजना बनून कबीरसोबत परदेशात जाते.
जेव्हा कबीर आणि संजना (अंजना) भारतात येतात, तेव्हा कहानीला नवीन वळण येते. अंजाना (संजना)च्या खोलीला बंद करून ठेवण्यात आले आणि तिच्या सर्व आठवणी त्या खोलीत जपून ठेवण्यात आल्या, हे त्यांना समजते. कबीर कबीर हे पाहून वाईट वाटते आणि तो खोली उघडण्यास सांगतो. खोली उघडल्यानंतर अंजाना (संजना)चा आत्मासुध्दा भटकायला लागतो. ही आत्मा अनेकदा कबीरला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र ती अपयशी ठरते. अंजना (संजना)ची आत्मा बदला घेऊ शकले का? कबीरसोबत राहणारी तरुणी खरंच अंजना आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागेल.
दिग्दर्शन-
भूषण पटेलने 'अलोन'पूर्वी दोन हॉरर सिनेमे केले आहेत. या सिनेमा पाहिल्यास तुम्हाला त्याच्या जून्या सिनेमांची आठवण होईल. हिंदी हॉरर सिनेमांपेक्षा त्याने काही वेगळे इफेक्ट्स सिनेमात टाकले आहेत. साऊंड इफेक्ट्ससुध्दा काहीप्रमाणात घाबरवण्यात यशस्वी ठरतो.
अभिनय-
टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवरने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केले आहे. परंतु त्याचा अभिनय सिनेमात जास्त दिसत नाही. मात्र बिपाशाला हॉरर क्वीन म्हणणे वावगे ठरणार नाही. परंतु सिनेमात काही ठिकाणी तिच्या अभिनय तुम्हाला जून्या सिनेमांची आठवण करून देईल.
का पाहावा?
तुम्हाला हॉरर सिनेमे पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही 'अलोन' एकदा पाहू शकता. सिनेमा घाबरवण्यापेक्षा हसवण्याचे काम जास्त करतो क? हे तुम्हाला 'अलोन' पाहिल्यानंतर लक्षात येईल.