आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आँखो देखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी बरेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेत. या रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये रजत कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'आँखो देखी'सुध्दा सामील आहे.
हा एक विनोदी सिनेमा असून हा एका व्यक्तीच्या जीवनप्रवासावर रेखाटलेला आला आहे. सिनेमाची शुटिंग दिल्लीमध्ये झाली असून हा एक घरगुती सिनेमा आहे. सिनेमात एकत्र कुटुंब पध्दतीचे महत्व दाखवले आहे.
कहाणी:
सिनेमाची कहाणी बाबूजी (संजय मिश्रा) यांच्या भोवती गुंफलेली आहे. बाबूजी जून्या दिल्लीतील एक छोट्या गल्लीतील लहान घरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. बाबूंजींच्या घरात अम्मा अर्थातच सीमा भार्गव त्यांचे रीटा-शम्मी हे दोन मुले आणि ऋषि काका (रजत कपूर) त्यांची पत्नी आणि एक मुलागा असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे.
बाबूजींच्या दोन खोलीचे घर आणि थोडी रिकामी जागा आहे. त्यांच्या घरात राहण्यासाठी खूप कमी जागा आहे. घरात राहणारे लोक कधी आनंदी राहतात तर कधी भांडण करतात.
त्यांच्या या दौनंदिन आयुष्यात सुखी ह्या कुटुंबाचे मुख्य सदस्य बाबूजाली जेव्हा माहित होते, की गल्लीतील एक अज्जू नावाचा मुलगा रीटासोबत फिरतो. त्यानंतर सर्वजण अज्जूला धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. परंतु नेहमीच आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आपलसे करून घेणारे बाबू यांना अज्जू चांगला मुलगा वाटतो. सिनेमामध्ये असेही दिसून येते, की कधी-कधी बाबूजी काही निर्णयांवर मौन बाळगतात. बाबू यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. त्यांच्या या जिद्दी स्वभावामुळे त्यांनी बनवलेल्या दांडी मार्चवर निघून जातात. आता सिनेमात पुढे काय घडते हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघावे लागेल.
अभिनय:
सिनेमात बाबूजीची भूमिका साकारणारे संजय मिश्रा सिनेमाचे सर्वात मोठे यूएसपी आहे. संजय यांनी यापूर्वीही आपल्या अभिनयाची झेंडे रोवले आहेत. परंतु यावेळीही त्यांचा अभिनय चांगला होता असे म्हणावे लागेल. रजत कपूर, सीमा भार्गव, विजेंद्र काला, मनुऋषि चढ्ढा, माया. नमित दाससह सिनेमाच्या प्रत्येक स्टार्सनी आपला अभिनय पडद्यावर चांगला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शन:
एक दिग्दर्शक म्हणून रजत यांनी या सिनेमाची पटकथा चांगली रेखाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सिनेमाच्या प्रत्येक कलाकारला त्यांच्यानुसार अभिनय करण्याची संधी दिली आहे. तसेच रजत यांनी सिनेमाच्या कथेला कुठेच थांबू दिलेले नाही. फक्त सिनेमाचा क्लॅमॅक्स थिएटरसारखा वाटतो.
का पाहावा सिनेमा?
सध्या बॉलिवूडमध्ये अधिकतर सिनेमा हे केवळ सुपर कलेक्शन करण्यासाठी बनवले जातात. परंतु असे नाही, की बॉलिवूडमध्ये चांगले सिनेमे बनणे बंद झाले आहे. तुमच्याजवळ वेळ असेल तर हा एक चांगला सिनेमा तुम्ही बघू शकता. सिनेमात पटकथा तसेच अभिनयही चांगला सादर करण्यात आला आहे. सिनेमाच्या कथेत जास्त मसाला किंवा ग्लॅमर नाहीये. परंतु तरीदेखील सिनेमाचे सादरीकरण चांगले झाले आहे. तुम्हाला सिनेमा बघण्यासाठी कंटाळवाणा वाटणार नाही.