आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बी.ए. पास' - एक उत्कृष्ट कलाकृती बघितल्याचे समाधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एक अनाथ मुलगा आहे. त्याला दोन बहिणी असून त्या त्याच्यापेक्षा वयाने लहान आहेत. मात्र तो मुलगासुद्धा एवढा लहान आहे, की तो आपल्या बहिणींचे पालनपोषण करु शकत नाही. दोन्ही मुलींना दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजाने एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहावं लागतं.

एकदा फोनवर आपल्या बहिणींशी बोलत असताना मुलाच्या लक्षात येतं, की त्याच्या बहिणींना सेक्स वर्कर बनवण्यात येणार आहे. त्या मुली ज्या हॉस्टेलमध्ये राहतात, तिथे सेक्स रॅकेट चालवलं जातंय. या घटनेनंतर त्या मुलाचं आयुष्य बदलून जातं. तो उदास होतो.

आपल्या बहिणींना तेथून बाहेर काढण्यासाठी काही तरी करायला पाहिजे, या विचारात तो मुलगा असतो. यासाठी तो बरीच मेहनत करु लागतो. मात्र अडचण ही आहे, की तो मुलगा आपल्या बहिणींचा ज्यापासून बचाव करु इच्छितोय ते काम तो करत असलेल्या कामापासून मुळीच वेगळे नाहीये. अठरा वर्षांचा हा मुलगा एक पुरुष-वेश्या आहे. प्रेक्षकांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटायला लागते.

तो पैशांसाठी स्त्रियांबरोबर शय्यासोबत करतो. जर तो मुलाच्या ऐवजी मुलगा असता तर कथा वेगळी असती का ? हाच या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे. माझ्या मते, जर सेक्स करताना त्यात प्रेमाची भावना नसेल तर स्त्री असो किंवा पुरुष दोघांसाठीही ते दुःखद आणि कष्टदायी असतं.

जेव्हा तुम्ही या सिनेमाच्या अंधकारमय जगात प्रवेश करता तेव्हा या गोष्टी तुम्ही समजू शकता. हा सिनेमा बॉलिवूडच्या 'देसी बॉईज' (2011) यांसारख्या सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. मात्र या सिनेमाचे शीर्षक 'बी.ए. पास' का ठेवण्यात आले, हे माझ्या लक्षात आले नाही.

सिनेमात फक्त एवढेच दाखवण्यात आले आहे, की नायक त्या दिवसांत कॉलेजमध्ये बी.ए.चे शिक्षण घेत असतो. हे तर स्पष्ट आहे, की मुलाचे शिक्षण होऊ शकत नाही. कारण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तो आपल्या काका-काकू आणि चुलत भावाबरोबर राहतो. मात्र शेजारची आंटीच्या वयाची एक वयस्कर स्त्री त्या मुलावर फिदा होते.

ती स्त्री 1967 साली रिलीज झालेल्या 'द ग्रेज्युएट' या सिनेमातील मिसेस रॉबिन्सनसारखी आहे. कदाचित तो मुलगासुद्धा त्या स्त्रीकडे आकर्षित होत असावा. दोघांमध्ये होणारा प्रणय नक्कीच आत्मीय किंवा कोमल नाहीये, मात्र ते दोघांच्याही सहमतीने होत असतं आणि त्यात ते दोघेही समाधानी असतात. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेबरोबर शय्यासोबत करणं, ही टीनएज फँटसी असते. हा मुलगा आपल्या फँटसीमध्ये जगतो खरा पण काही क्षणांपुरताच.

कालांतराने ती महिला त्या मुलाला आपल्यासारखेच काही क्लायंट्स मिळवून देते. त्या मुलाबरोबर घडलेल्या या घटनेवरुन लक्षात येतं, की हाऊसवाईफ आपल्या पतीच्या बिझी शेड्युलमुळे परपुरुषाकडे आकर्षित होत असतात. दिल्लीत दिसणारे हे सामान्य चित्र आहे. या सत्याचा आपण इंकार करु शकत नाही.

या सिनेमात विनोदाचा अभाव आहे. मात्र गंभीर विषयावरील सिनेमा बघताना विनोदाची गरज भासत नाही. सेक्स आजही भारतीय समाज आणि सिनेमांसाठी एक संवेदनशील विषय आहे. हा सिनेमा आपल्याद्वारे दुर्लक्षित केल्या गेलेल्या सत्याला समोर आणतो. कदाचित प्रोमो बघून सिनेमात काही बोल्ड सीन्स बघायला मिळतील या विचाराने काही प्रेक्षक थिएटरमध्ये गेले असावेत. मात्र सिनेमा बघून थिएटरबाहेर पडताना प्रेक्षकांना नक्कीच एक सशक्त सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळेल.