आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW: बेबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अ वेडनस्डे' सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे पुन्हा एकदा दहशतवादावर आधारित सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. सिनेमाचे नाव 'बेबी' असून अक्षय कुमारने एक काऊंटर एजेन्टचे पात्र साकारले आहे.
कहाणी-
'बेबी' एक अंडरकव्हर यूनिटचे नाव आहे, दहशतवादाला नष्ट करण्याचा त्यांचा हेतू आहे. या यूनिटचे मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षय कुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांचे यूनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारत राहणा-या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी जबरदस्ती करतो. सिनेमात जिहादच्या मुद्यावर जास्त केंद्रीत करण्यात आले आहे. अजय सिंह राजपूत मौलाना मोहम्मद रहमानव्दारा पसरल्या जाणा-या आतंकाला कसे थांबवतो, त्यासाठी त्याला कोण-कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, 'बेबी'चे मिशन यशस्वी होते का? हे सर्व पाहण्यासाठी एकदा सिनेमा पाहावा लागेल.
दिग्दर्शन-
नीरज पांडे यांनी 'अ वेडनेस डे' आणि 'स्पेशल 26'नंतर पुन्हा एकदा सिध्द केले, की बॉलिवूड उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. सिनेमाची कहाणी एका देशापासून दुस-या देशापर्यंत (टर्कीपासून नेपाळ, नेपाळपासून अरबिया) फिरते. परंतु नीरज यांनी कोणताही देखावा न करता, सुंदररित्या सादर केले. मात्र, काही ठिकाणी छोट्या-मोठ्या चुका झाल्या आहेत, पण कथेच्या ओघातमध्ये जाणवत नाही.
अभिनय-
अक्षय कुमारला त्याच्या अॅक्शन आणि स्टंटमुळे खिलाडी म्हटले जाते. यावेळीसुध्दा या खिलाडीने शानदार खेळ खेळला आहे. केवळ अक्षयच नाही इतर कलाकार डॅनी डेन्जोंगपा, अनुपम खेर, केके मेनन, तापसी पन्नू, सुशांत सिंह राजपूत आणि रशीद नाजनेसुध्दा आपला अभिनय उत्कृष्ट पार पाडला.
का पाहावा?
जर तुम्ही अॅक्शन आणि थ्रिलर सिनेमे पाहण्याचे शौकीन असाल, तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे. मात्र, इतरांनी एकदा पाहावा असा आहे.