आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून लोटपोट करणारा 'बजाते रहो'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील बहुतेक चित्रपटांमध्‍ये सूड, प्रेम असे वेगवेगळे भाव एकमेकांमध्‍ये गुंफलेले असतात. या सर्वांपेक्षा असा वेगळा रिव्हेंज कॉमेडीचा चित्रपट आपल्या भेटीस आलाय. या आठव्यात 'बजाते रहो' रिव्हेंज कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विनय पाठक, रणवीर शौरी आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिल्लीत सभरवाल नावाचा मोठा व्याव‍सायिक (रवी किशन) आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून गौडबंगाल करत असतो. त्याच्या वाईट उद्योगाचा परिणाम चार ग‍रीब व्यक्तिंवर होतो. त्या चार व्यक्ती म्हणजे बवेजा, सुखी, मिंटू हसन आणि बल्लू हे होय. हे चौघे सभरवालचा बदला घेण्‍यास सतत तडफडत असतात.


सभरवाल हा बवेजा व त्यांची सहकारी सायरावर बँकमध्‍ये घोटाळा केल्याचा खोटा आरोप करतो. या घटनेमुळे बवेजांना मोठा धक्का बसतो आणि त्यांना हार्ट अ‍ॅटक येऊन त्‍यांचा मृत्यू होतो. आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्‍यासाठी सौ. बवेजा सूड घेण्‍याचा निर्णय घेते. जेव्हा सत्ययुग संपून कलयुगाला सुरूवा त झाली असते. त्यावेळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्‍वी तलावर अवतरतो. चित्रपटाची कथा ही वाईट आणि चांगल्या प्रवृत्‍ती या संघर्षावर आधारलेली आहे. चित्रपटात सूड हा खूप गंमतीदार आणि मनाला भावेल अशा पध्‍दतीने रेटण्‍यात आला आहे. हे पाहून आपण खूप हसाल. दिग्दर्शक शशांक शहाने हा चित्रपट कमी खर्चात बनवला आहे. यापूर्वी त्यांनी 'दसविदानियां' आणि 'चलो दिल्ली' हे चित्रपट बनवले आहेत. डॉली अहलुवालिया आणि विनय पाठक यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे. त्यांच्या अभियानापुढे तरुण तारे-तारका अभिनयात कमी पडले आहेत.