आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोके बाजूला ठेऊन बघावा \'चष्‍मेबद्दूर\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

80 च्‍या दशकात फारूक शेख, दिप्‍ती नवल, राकेश बेदी आणि रवी वासवानी यांच्‍या जबरदस्‍त अभिनयामुळे गाजलेला चित्रपट 'चष्‍मेबद्दूर' आजही रसिकांच्‍या मनात घर करून आहे. मात्र, अविश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर 'कथा' आणि 'स्पर्श' यासारख्या अप्रतिम चित्रपटाच्या दिग्दर्शिका सई परांजपे ज्यांनी १९८१ साली ओरीजनल 'चश्मेबद्दूर' बनवला होता. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटामुळे त्या अस्वस्थ आहेत. यामुळे नाही की त्यांच्या चित्रपटाचा रिमेक केला जातोय. पण डेव्हिड धवनसारखा दिग्‍दर्शक याचा रिमेक करतोय यामुळे त्‍या अस्वस्थ झाल्‍या.

जर आपण डेव्हिड धवनचा मागील चित्रपट 'रास्‍कल्‍स' (जो कोणत्याही प्रकारे चित्रपट वाटत नाही) आणि त्या आधीचा 'डु नॉट डिस्‍टर्ब' (जो रिव्हीव्यू लिहिण्याच्या लायकीचाही नव्हता) हा त्‍याने दिग्दर्शित केलेला ४१वा चित्रपट होता. डेव्हिड धवन हे पुण्याच्या फिल्म अ‍ँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)चे गोल्ड मेडलिस्‍ट असून त्यांच्या नावावर 'आँखे', 'शोला और शबनम' आणि 'हसीना मान जायेगी' सारख्या हिट विनोदी चित्रपटांची नोंद आहे.

परांजपे सांगतात (किंवा त्याच्या जवळच्या सूत्राकडून आम्हाला समजते) की 'हिरो नंबर वन', 'कुली नंबर वन'सारखे तद्दन फालतू चित्रपट तयार करणा-या धवन यांना मी एवढ्या कष्टाने तयार केलेल्या चित्रपटासोबत छेडछाड करण्याचा कोणताही हक्क नाही. ही बातमी वाचल्यानंतर मला वाटले की, परांजपे थोडा जास्त आणि व्यर्थ क्रोध दाखवत आहेत.

परंतु जेव्हा मी हा चित्रपट पहिला, तेव्हा मला पटले की परांजपे यांनी दिग्दर्शकाच्या विरोधात मानहानीचा दावा का दाखल करू नये. जर एखादी कलाकृती वास्तवामध्ये कलाकाराच्या मुलासारखी असेल आणि त्या कलाकृतीसोबत अशा प्रकारे केलेली वागणूक म्हणजे त्या मुलावर अत्याचार करण्‍यासारखे आहे.

चित्रपटात तीन मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे, ज्यामधील एक मुलगा सज्जन असून (अली जफर, मुळ चित्रपटात ही भूमिका फारुख शेख यांनी केली आहे) इतर दोन मुले उडाणटप्पू (सिद्धार्थ आणि दिव्‍येंदु शर्मा, मूळ चित्रपटात या भूमिका रवि वासवानी आणि राकेश बेदी यांनी केल्या आहेत) आहेत. या दोघांचे एकाच मुलीवर (तापसी पन्‍नु, जिने दीप्ती नवलची भूमिका साकारली आहे) प्रेम जडते. उडाणटप्पू मुलांचा प्रेम प्रस्ताव लगेच रद्द केला जातो, परंतु ते असा दिखावा करतात की, त्या सुंदर मुलीला त्यांनी पटवले आहे. शेवटी सज्जन मुलालाच ती सुंदर मुलगी मिळते आणि या दोन उडाणटप्पू मित्रांना ही गोष्ट आवडत नाही.

मुलीचे वडील (अनुपम खेर) कधी काळी सैन्यात असतात आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की, मुलीचे लग्न एखाद्या सैनिकाबरोबर व्हावे. दुसरीकडे मुलीचे काका, जे त्या मुलीच्या वडिलांचे जुळे भाऊ आहेत. त्यांना मुलीचे लग्न एखाद्या साध्या सज्जन मुलासोबत व्हावे असे वाटत असते. तीनही मित्रांची स्वतःची अशी काहीच ओळख नाही. चित्रपटात जोसेफ आणि जोसेफाइन (ऋषी कपूर, लिलिट दुबे) नावाचे एक जोडपे बळजबरीने टाकले आहे, यामुळे वयोवृद्ध जोडप्याचा रोमान्स दाखवला जाऊ शकेल.

ही आपल्याला सुन्न करणारी कॉमेडी आहे. ही कॉमेडी पाहताना आपण विचार करू लागतो की, तुमच्या सीटजवळ बसलेला जो व्यक्ती हसत आहे, त्याच्या बुद्धीमत्तेचे आपण काय आकलन करावे. परंतु मी हे आकलन न करता आपल्या फोनमध्ये व्यस्त होतो.

या प्रसंगाचा इथे उल्लेख करण्याची काही गरज नाही. काही दिवसांपूर्वी टाइम्‍स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डेव्हिड धवनने एफटीआयआयमधील आपल्‍या आठवणी ताज्‍या केल्‍या होत्‍या. तो म्‍हणाला, 'मी रित्विक घटक यांचा बंगाली चित्रपट ‘मेघे ढाका तारा’ पहिला तेव्हा मला जाणवले की, फिल्‍ममेकिंगमध्ये आपण काही नसतानाही खूप काही करू शकतो." परंतु डेव्हिड धवनचा हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवते की, खूप काही असूनही काहीच बनवता आले नाही.