आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review : दावत-ए-इश्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा :
अब्दुल कादीर (अनुपम खेर) हे हायकोर्टातील लिपिक आपली मुलगी गुलरेज उर्फ गुल्लू (परिणीती चोप्रा) हिच्या सोबत हैदराबादेत वास्तव्यास आहेत. एमबीए टॉपर असणा-या गुल्लूच्या लग्नासाठी त्यांनी 15 लाखांची बेगमी जमवली आहे. मात्र गुल्लूचे लग्न नेहमीच हुड्यावरुन फिसकटत असते. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे गुल्लूचे स्वप्न आहे. आपल्या गुणांची, टॅलेंटशी कोणालाच देणे घेणे नाही, याची जाणीव गुल्लूला सतावत असते. अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हुंडा विरोधी कायदा वापरण्याचे ठरवून ती योजना आखते. यात वडिलांना सहभागी करून घेते. त्यातून ते लखनऊला येतात. येथे त्यांची भेट तारीक ऊर्फ तारू (आदित्य रॉय कपूर) होते. गुल्लू त्याच्याशी खोटे लग्न करते. हुंडा म्हणून दिलेल्या 40 लाखांवरुन त्याच्यावर पोलिसांत तक्रार देते. तडजोडीपोटी त्याचे 40 लाख घेऊन पोबारा करते.
त्या दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि शेवट गोड होतो.
संवाद-संगीत :
दिग्दर्शक हबीब फैसल यांनी पटकथा-संवाद लिहीले आहेत. हैदराबादी व लखनवी भाषेचा लहेजा सांभाळत त्या भाषेतील गोडव्याने भारलेले संवाद मजा आणतात. पटकथा एकाच सूत्राभोवती फिरते. कौसर मुनीर यांच्या गीतांना साजीद-वाजीद यांच्या संगीताने चार चाँद लावले आहेत. दावत-ए- इश्क, मन्नत मे, रंगरेली, शायराना ही गाणी चांगली जमली आहेत.
अभिनय :
परिणीतीने सर्वसामान्य मुलगी ते कोट्यधिशाची कन्या असा प्रवास आपल्या देहबोलीतून उत्तम साकारला आहे. आदित्य रॉय कपूरने भूमिकेची गरज लक्षात घेऊन अभिनय केला आहे. खरी मजा आणतात ते अनुपम खेर. एकतर हैदराबादी गेटअप त्यांना चांगलाच शोभला आहे. त्यातच त्यांनी उत्तम पंचेस देत व्यक्तीरेखा चांगली खुलवली आहे.
सार :
दोन घटका करमणूक करणारी, सहकुटूंब पाहता येणारी ही चवदार थाळी आवर्जून पाहावी. हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेवर प्रकाश टाकणारी मनोरंजनाची दावत एकदा तरी चाखावी अशी आहे.