आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवणारा \'एक थी डायन\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सिनेमातील डायनचे डायना आहे. दोन मुलांचे वडिल (पवन मल्होत्रा) असलेल्या व्यक्तिचा या डायनवर जीत जडतो. प्रत्यक्षात या वडिलांचे वागणे हे अनुचित असून यापासून त्यांनी स्वतःचा बचाव करायला पाहिजे होता. मात्र सगळ्या सुपरनॅचरल सिनेमांची सुरुवात बेजाबाबदार नास्तिकांपासून होते, ज्यांना लवकरच दुस-या जगातील वास्तव कळत.

या वडिलांचा मुलगा मोठा होऊन प्रसिद्ध जादूगार बनतो. निश्चितच या मॅजिक ट्रिक्सच्या मागे त्याची कला आणि कौशल्य आहे. मात्र त्यालासुद्धा डायन आणि भूतांबद्दल थोड फार ठाऊक आहे. कारण तो बालपणापासूनच त्यांच्याविषयी वाचत आला आहे.

बहुतांश भारतीय डायनबद्दल ऐकून आहेत. गावांमधून सामान्य महिलेला डायन सिद्ध केल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. त्यांच्याविषयी असे म्हटले जाते की, अशा स्त्रिया कुटुंबीयांसाठी कमी नशीबाची असून त्यांचा मृतात्मांबरोबर संपर्क आहे.

प्रत्यक्षात शैक्षणिक रुपाने मागासलेल्या भागात जागरुकता नसते. त्यामुळे सीजोफ्रेनिया किंवा मनोरुग्ण असलेल्या व्यक्तिंवर वाईट आत्मांचे सावट असल्याचे म्हटले जाते.

मात्र या सिनेमात खरीखुरी डायन दिसते. तिचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला होता. ती मध्य रात्रीपासून ते सकाळी चार वाजेपर्यंत काम करते. आणि तिच्या सर्व शक्ती तिच्या लांब केसांमध्ये आहेत.

ती रात्रीची राणी आहे आणि त्यामुळे ती भूतप्रेतांचे फिमेल व्हर्जन आहे. मला भूतप्रेतांबद्दल एवढेच ठाऊक आहे की, हनुमान चालिसामध्ये 'भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे...' या ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे.

जगभरात धर्म-परंपरांमध्ये भूतप्रेतांबद्दल सविस्तर सांगितले गेले आहे. त्यांना वाईट शक्तींचे प्रतिनिधी समजले जाते. मात्र या सिनेमाला कोणतीही धार्मिक पार्श्वभूमी नाहीये आणि ही गोष्ट या सिनेमाचे वेगळेपण जपते.

जादूगर बोबो (इमरान हाश्मी) एक सामान्य माणूस आहे. त्याची गर्लफ्रेंड (हुमा कुरैशी) सुद्धा नॉर्मल आहे. हे दोघेही अनाथलयातील एका छोट्या मुलाची जबाबदारी स्वीकारतात. ते बॉलिवूड मसाला सिनेमातील हीरो-हिरोईनप्रमाणे नाहीयेत. ते शहरात वाढलेले तरुण-तरुणी आहेत. त्यांच्यात शारीरिक संबंधही आहेत. ते कॉफी शॉपमध्ये एकत्र वेळ घालवतात. घरी पार्टी साजरी करतात आणि गुलजार यांचे गीत गुणगुणतात. प्रत्यक्षात हा सिनेमा हॉरर धाटणीचा असून घाबरगुंडी उडवणारा आहे. या सिनेमातील डायनला बघून अंगावर शहारा उभा राहतो. कारण ती आपल्यापैकी एक असू शकते. ही भूमिका कोंकणा सेन शर्माने साकारली आहे. सिनेमातील तिचा पहिला शॉट बघूनच आपल्या लक्षात येत की, मागील काही सिनेमांमध्ये आपण तिला किती मिस केले.

एकता कपूर या सिनेमाची सहनिर्माती आहे, ही खरंच आश्चर्यात टाकणारी बाब आहे. एकताची ओळख भव्यदिव्य मालिकांमुळे झाली आहे. तिच्या मालिकेत भरभक्कम मेकअप केलेल्या, भरजरी साड्या नेसलेल्या स्त्रिया खलनायिकेच्या रुपात हिरोईनच्या आयुष्यात वादळ निर्माण करताना दिसतात. तर दिग्दर्शक म्हणून विशाल भारद्वाज यांचा 'मकडी' (2002) हा सिनेमा होता. डायनच्या जाळ्यात अडकलेल्या जुळ्या मुलींभोवती 'मकडी'ची कहाणी रेखाटण्यात आली होती. हं पण ती डायन नसून चेटकीण होती. तो सिनेमा नास्तिकांसाठी बनवला होता. कारण शंभर वर्षांपासून उपाशी असलेली ती चेटकीण (ही भूमिका शबाना आझमी यांनी साकारली होती) अखेर ठग असल्याचे सिद्ध होते. मात्र 'एक थी डायन' हा सिनेमा भूतांवर विश्वास ठेवणा-यांसाठी आहे.

याविषयी मला रोचक वाटलेली गोष्ट म्हणजे, या सिनेमाचे सहलेखक मुकुल शर्मा आहेत, त्यांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे, ते भारतातील एक प्रसिद्ध मॅथ-सायन्स कॉलमिस्ट होते. माझ्यासमवेत अनेक लोकांना संडे टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्या दर आठवड्याला प्रकाशित होणारा माईंडस्पोर्ट हा कॉलम आठवतच असले. 'एक थी डायन' या सिनेमाच्या स्क्रिनप्लेची गणना भारतातील हॉरर सिनेमांच्या सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्लेमध्ये केली जाऊ शकते.

हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या सिनेमात एकामागून एक येणारी भयावह दृश्ये प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवायला पुरेसी आहेत.

थिएटरमध्ये मी हा सिनेमा बघत असताना माझ्यासमोर दोन गपिष्ट मुले बसली होती. त्यांची नॉनस्टॉप बडबड मला त्रासदायक वाटत होती. मात्र थोड्याच वेळात ते अगदी शांत झाले. समोर वाकून त्यांच्या काळात 'बू' म्हणून ओरडावे, असे एका क्षणी माझ्या मनात आले. मात्र मी तसे केले नाही. कारण मला विश्वास होता की, मी असे केल्यास ते एकतर आपल्या खुर्चीवरुन खाली पडले असते, किंवा त्यांना हार्ट अटॅक तरी नक्कीच आला असता आणि नंतर त्यांनीच मला थिएटरबाहेर काढले असते.

हेच ते क्षण आहेत, जेव्हा अंधारमय थिएटरमध्ये आपल्या लक्षात येत की, हॉरर सिनेमा आपल्यावर त्यांची काळी जादू चालवण्यात यशस्वी होतो की नाही.