आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : एक व्हिलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा :
गुरू (सिद्धार्थ मल्होत्रा) हा एक भाडोत्री गुंड. सिक्सर (रेमो फर्नांडिस) साठी तो काम करत असतो. कोणाचीही सुपारी घेणे आणि त्याला उडवमे हा गुरूचा खेळ. त्याच्या जीवनात आयेशा (श्रद्धा कपूर) येते (ती कशी, कोठून, कशासाठी, येते हे मात्र विचारू नका). ते एकत्र काम करु लागतात. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. (ये तो होना ही था). कालांतराने विवाहबद्ध होतात. राकेश (रितेश देशमुख) पत्नीच्या नजरेत हीरो ठरण्यासाठी विकृत सिरियल किलर बनतो. अंगावर खेकसणा-या महिलांचे खून करत सुटतो. त्याच तडाख्यात तो आयेशाचा खून करतो. मग गुरू आणि राकेश यांच्यात उंदीर-मांजराचा खेळ रंगतो. (तो पाहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो) पुढे सांगायची गरज आहे का?
गीत-संगीत :
'आशिकी-2' प्रमाणेच सुरी साहेबांनी व्हिलनच्या संगीताकडे लक्ष दिले आहे. अंकित तिवारी, मिथून आणि सोच यांच्या संगीताने नटलेली गाणी यात आहेत. ये गलियाँ, बंजारा, जरूरत ही गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत.
कथा-पटकथा :
सिरियल किलर मधला थरार जास्त वठवायचा की प्रेमकथेला जास्त माप द्यायचे या बाबतचा गोंधळ पटकथेला विस्कळीत करतो. त्यामुळे धड थरारही अनुभवता येत नाही अन धड रोमान्सही खुलत नाही. त्यामुळे रंगत कमी होते.
अभिनय :
सिद्धार्थने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका चांगली निभावली आहे. श्रद्धा कपूरने तिचे काम चोख बजावले आहे. रितेश देशमुखने कॉमेडीच्या बाहेर येत रंगवलेला विकृत सिरियल किलर चांगला वठवला आहे. बाकी पात्रे ठीक.
सार :
रोमँटिक थ्रिलरपट सादर करताना एक विशिष्ट बाज, मांडणी असावी लागते. एक व्हिलनमध्ये नेमके येथेच दिग्दर्शकाचे घोडे पेंड खाते. हा उंदिरामांजराचा खेळ मांडण्या ऐवजी निर्मात्या एकता कपूर यांनी त्यांचा आवडता सासू-सून फॉर्म्युला दाखवला असता तरी एक वेळ परवडले असते. मात्र, एक व्हिलन दोन तास दहा मिनिटांत संपतो हाच सर्वात मोठा दिलासा मानावा, यातच सर्व काही आले.