आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'घनचक्कर\' सुरुवातीला हसवणार नंतर बोअर करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'घनचक्कर' हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा असून प्रत्येक वळणावर आपल्याला ट्विस्ट बघायला मिळतात. मात्र यादरम्यान काही विनोदी प्रसंग आपल्याला पोटधरुन हसवतात.
सिनेमाची कहाणी गुन्हेगारी जगतातील मास्टर माईंड संजू (इमरान हाश्मी)च्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. तो गुन्हेगारी जगत सोडण्याचा निर्णय घेतो. तो आपल्या मित्रांबरोबर शेवटची चोरीची योजना बनवतो. तिघेही विचारपूर्वक एक बँक दरोडा घालण्याचे ठरवतात.
दरोड्यातून मिळालेले पैसे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी संजूला दिली जाते. जेव्हा प्रकरण शांत होईल तेव्हा तिघांमध्ये पैसे वाटले जातील, असे हे तिघे ठरवतात. योजनेनुसार तिघेही दरोडा घालतात. जेव्हा त्याचे दोन मित्र पैसे घेण्यासाठी संजूकडे येतात, तेव्हा सिनेमात खरा ट्विस्ट येतो.
दोघेही दरोड्याच्या दोन महिन्यांनी संजूकडे पैसे मागण्यासाठी घेतात. मात्र संजू त्यांना ओळखत नाही. संजू खरं बोलतोय की खोटं याभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे. यामध्ये अनेक विनोदी दृश्यही बघायला मिळतात.
'कहानी' आणि 'द डर्टी पिक्टर' या सिनेमासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावी करणारी विद्या बालन 'घनचक्कर'मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आली आहे. या सिनेमाचा निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर असून आठ महिन्यांपूर्वीच त्याने विद्याबरोबर रेशीमगाठ बांधली आहे. त्यामुळे आपल्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा हिट करण्याची जबाबदारी विद्याच्या खांद्यावर आहे.
सिनेमात विद्या ब-याच अंशी आपली जबाबदारी पूर्ण करताना दिसली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विद्याने पहिल्यांदाच विनोदात आपला हात आजमावला आहे. विशेष म्हणजे विद्या प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वीही झाली आहे.
विद्याने एका पंजाबी गृहिणीची (नीतू) भूमिका साकारली आहे. तिला रंगीबेरंगी कपडे घालायला आवडतात. ती अंतर्मुख स्वभावाची आहे. मात्र आपल्या नव-याला खुश ठेवण्यासाठी ती विचित्र करामती करत असते. विद्याने पंजाबी गृहिणीची भूमिका छान साकारली आहे.
'नो वन किल्ड जेसिका'सारखा गंभीर सिनेमा बनवणारे राजकुमार गुप्ता यांनीसुद्धा पहिल्यांदाच विनोदात हात आजमावला आहे. कदाचित त्यामुळेच सिनेमाचा फ्लो कुठे-कुठे कमी झालेला दिसतोय.
याशिवाय सिनेमाचे संगीतही खूप खास झालेले नाही. मात्र कलाकारांच्या अभिनयापुढे त्याकडे लक्ष जात नाही. पण सिनेमाचे कथानक काही ठिकाणी जड आणि त्रासदायक वाटू लागतं. सिनेमातील काही दृश्ये उगाचच ताणून धरलेली वाटतात. कुठे-कुठे तर विद्या ओव्हर अँक्टिंग करत असल्याचं वाटतं.
एकंदरीत हा सिनेमा एकदा बघू शकतो. आमच्याकडून या सिनेमाला दोन स्टार.