आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाब गँग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गुलाब गँग' या सिनेमात माधुरीने साकारलेल्या पात्राचे नाव रज्जो आहे. रज्जो महिलांसाठी एक आश्रम चालवते. या आश्रममधील प्रत्येक स्त्री स्वावलंबी आहे. आश्रममधील महिला साड्या, मसाले आणि इतर साहित्यांची निर्मिती करतात. या महिला आपल्या हक्कासाठी कुणासोबतही लढा देण्यास सज्ज असतात. गरज पडल्यास त्या हातात शस्त्रसुद्धा उचलतात. आश्रमातील सर्व महिलांना ज्युडो-कराटेचे ट्रेनिंग देण्यात आले आहे.
दरम्यान रज्जोची भेट सुमित्रा देवी (जुही चावला) सोबत होते. सुमित्रा देवी राजकारणात सक्रिय आहे. सुमित्राला राजकारणाचे डावपेच चांगलेच ठाऊक आहेत. सत्ता पात्र करण्यासाठी ती रज्जाचा वापर करण्याचे ठरवते.
रज्जोसुद्धा सुमित्रा देवीची मदत करते. मात्र सुमित्राचं सत्य रज्जोसमोर उघड झाल्यानंतर ती तिच्यासोबतचे नाते संपुष्टात आणते. नंतर रज्जो स्वतः राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेते आणि निवडणूक जिंकून दाखवते. यादरम्यान रज्जो आणि सुमित्रा देवी यांच्यात काटें की टक्कर होते. दोघींमध्ये संवादाची चांगली लढाई बघायला मिळते.
माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांचा अभिनय...
गुलाब गँगचे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी अशा दोन अभिनेत्रींवर डाव लावला, ज्यांच्या नावावर अनेक हिट सिनेमांची नोंद आहे. माधुरी आणि जुहीने आपल्या अभिनय आणि एक्स्प्रेशनने प्रेक्षकांचा पैसा वसूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. या दोन अभिनेत्रींच्या बळावरच सौमिक आपला हा सिनेमा हिट करु इच्छितात. मात्र सिनेमातील काही दृश्यात उणीवा जाणवतात. माधुरी आणि जुही या उणीवा भरुन काढण्यात अपयशी ठरताना दिसतात. मात्र या दोघींच्या अभिनयाला तोड नाही. त्यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे.
माधुरीने 'डेढ इश्किया' या सिनेमात आपल्या एक्स्प्रेशन्सनी वाहवाह मिळवली होती. या सिनेमातसुद्धा तिच्याकडून ब-याच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे जुहीने निगेटीव्ह भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. सिनेमाची जुळून आलेली बाजू म्हणजे सिनेमाची कथा एका फ्लोमध्ये सुरु राहते, त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांवर आपली छाप सोडतो.