आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंजक मसालेदार करमणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाइन डेचे फॅड अलीकडे फोफावले असले, तरी रुपेरी पडद्यावर प्रेम कितीतरी वर्षांपासून ओसंडून वाहते आहे. किंबहुना प्रेमपटांनी नेहमीच हिंदी चित्रपटसृष्टीला सावरले आहे. प्रेम म्हणजे अनेक निर्माता-दिग्दर्शकांचा हुकमी एक्का. यशराज हे बॅनर तर उत्कृष्ट प्रेमपटांसाठी प्रसिद्ध आहे. व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर पडद्यावर झळकलेला यशराजचा ‘गुंडे’ही याला अपवाद नाही. ‘चांदणी’, ‘लम्हे’, ‘सिलसिला’ यांच्याइतके गुंडेतील प्रेम उत्कट नसले, तरी मसालेदार मात्र नक्कीच आहे. एखादा चित्रपट तिकीटबारीवर चालण्यासाठी आवश्यक असणारा प्रेम, विनोद, हाणामारी, मैत्री, त्याग, रहस्य, गाणी हे सर्व ‘गुंडे’मध्ये आहे. त्यामुळे ही मसालेदार करमणूक चविष्ट बनली आहे.
कथा : बिक्रम (रणवीर सिंग) आणि बाला (अर्जुन कपूर) यांच्या अतूट मैत्रीची ही गोष्ट रंगते कोलकत्त्यात, 70 ते 90 च्या दशकात. बांगलादेश युद्धात निर्वासित झालेले हे दोघे लहानपणापासून एकमेकांचे जीवलग. पोटापाण्यासाठी लहानपणीच बंदुकीच्या अवैध विक्रीपासून गुंडगिरी त्यांच्या जीवनात प्रवेश करते. यातून ते एका लष्करी अधिकार्‍याचा खून करून कोलकत्त्यात पळून येतात. कोलकात्यात ते आपल्या जिद्द आणि मैत्रीच्या जोरावर आपले काळे साम्राज्य उभे करतात. इथला कोळसा डॉन दिवाकरचा खून करून ते कोळसा व्यापार आपल्या हाती घेतात. कोलकत्त्यातील काळ्या जगताचे अनभिषिक्त सम्राट बनतात. त्यांना आवर घालण्यासाठी सत्यजित सरकार (इरफान खान) या चतुर एसीपी अधिकार्‍याची नेमणूक होते. दरम्यान, बिक्रम आणि बालाच्या आयुष्यात नंदिनी (प्रियांका चोप्रा) ही कॅब्रे नृत्यांगना येते. प्रेमाचा त्रिकोण तयार होतो. बालाचे नंदिनीवर, तर बिक्रम आणि नंदिनीचे एकमेकांवर प्रेम जडते. त्यातून बाला बिक्रमवर गोळी झाडतो, ती नंदिनीला लागून नंदिनी जखमी होते. दोघांच्या मैत्रीत प्रेमाची दीवार उभी राहते. बाला बिक्रमचे सारे धंदे उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागतो. दरम्यान, एसीपी सरकार बिक्रमला सरकारी साक्षीदार होण्याची ऑफर देतो. याकामी नंदिनीही त्याला प्रवृत्त करत असते. एसीपी सरकारच्या जाळ्यात दोघे मित्र अडकतात. ते जाळे कोणते, हा चक्रव्यूह ते दोघे कसा भेदतात, नंदिनी कोणाला मिळते, या सर्व प्रश्नांची उत्तरे पडद्यावर पाहणे रंजक ठरेल.
संवाद- पटकथा : दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीच गुंडेची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. संवाद चटकदार आहेत. पटकथा मुद्देसूद आहे. पटकथेतील रहस्य प्रेक्षकांना धक्का देणारे असून हे रहस्य हीच गुंडेची यूएसपी आहे.
गीत- संगीत : दज्रेदार आणि र्शवणीय संगीत हे यशराज बॅनरचे वैशिष्ट्य आहे. कभी कभी, चाँदणी, सिलसिला आदींची गाणी आजही लोकप्रिय आहेत. गुंडेला सोहेल सेन यांचे संगीत आहे. त्यांनी प्रयत्न चांगला केला आहे. मात्र, आणखी र्शवणीय गाणी देता आली असती. जवाँ, तूने मारी एंट्री, असल्लामे इश्कूम, सैंया ही गाणी बरी जमली आहेत. संगीत चांगले आहे, पण ग्रेट नाही.
अभिनय : रणवीर सिंह आणि अर्जून कपूर यांनी मैत्रीची केमिस्ट्री चांगली वठवली आहे. इरफान खान प्रेक्षकांचा मूड प्रसन्न ठेवण्याचे काम चोख बजावतो. खरी कमाल केली आहे ती प्रियांका चोप्राने. गुंडेतून तिने आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने सांभाळेलेले बेअरिंग आणि वापरलेल्या साड्या झकास. बाकी पात्रे ठीक.
सार : प्रेम आणि मैत्री यातील त्यागाचे दर्शन घडवणारी ही अडीच घटकांची करमणूक जुन्या बाटलीत नवा मसाला असली, तरी चवदार आणि रंजक आहे. यशराज बॅनरच्या व्यावसायिक चित्रपटांत जे असते, ते सर्व ‘गुंडे’मध्ये आहे. आता एवढे सर्व सांगितल्यावर तुम्हाला अडवणारा मी कोण?