आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: हैदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल भारद्वाज यांच्या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सिनेमातील पात्र कुठेही भरकटत जात नाही. शेवटपर्यंत हे पात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. असेच 'हैदर'च्या बाबतीतसु्द्धा म्हटले जाऊ शकते.
कथाः
'हैदर'ची या सिनेमाची कथा ही काश्मीरमधील एका विद्यार्थ्याच्या अवती-भवती गुंफण्यात आली आहे. त्याचे डॉक्टर वडील (नरेंद्र झा) एक दिवस अचानक गायब होतात. येथील काही अधिकाऱ्यांना अतिरक्यांची माहिती पुरविण्याच्या संशयावरून अतिरेकी त्यांचे अपहरण करतात. या डॉक्टरांचा मुलगा हैदर (शाहिद कपूर) अलीगड युनिव्हर्सिटीतून सूचना मिळताच आपल्या गावी परततो. येथे त्याची प्रेमिका अर्शिया (श्रद्धा कपूर)कडून त्याला त्याचे घर उद्धवस्त झाल्याची बातमी कळते. त्याची आई गजाला (तब्बू) त्याचे काका खुर्रम (के.के मेनन) यांच्या घरी वास्तव्याला असते. तेथे आई आणि काकाचे प्रेमसंबंध असल्याचे त्याला समजते. तो रागातून तेथून निघून जातो आणि आपल्या वडिलांचा शोध घेण्याचे ठरवतो. युद्ध काळातील परिस्थतीमध्ये वडिलांचा शोध घेणाऱ्या मुलावर या वातावरणाचा कसा परिणाम होतो? आई आणि काकाचे पुढे काय होते?, हे 'हैदर'मध्ये बघायला मिळेल.
अभिनयः
हैदरच्या भूमिकेत शाहिद कपूरने जीव ओतला आहे. सोबतच तब्बू, इरफान खान, के.के. मेनन आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय हैदरची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. या सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. याशिवाय नरेंद्र झा, ललित परिमू, आमिर बशीर, सुमित कौल, रजत भगत यांनीदेखील भूमिकांना चांगल्या वठवल्या आहेत.
दिग्दर्शनः
विशाल भारद्वाजला अवलिया दिग्दर्शक म्हटले तर वावगे ठरु नये. त्यांनी ज्याप्रकारे शेक्सपिअरच्या नाटकांना पडद्यावर सादर केले, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. विशाल यांचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. त्यांनी काश्मीरमध्ये सिनेमाचे शूटिंग केले आहे. सुंदर लोकेशन्स डोळ्याचे पारणे फेडणारी आहेत.
संगीतः
'हैदर'मधील 'बिस्मिल बिस्मिल' हे गाणे श्रीनगरच्या मार्तंड सूर्य मंदिराच्या भग्नावशेषांवर साकारलेले आहे. या गाण्यावरील शाहीदचे अफलातून नृत्य टाळ्या मिळवतात. विशाल भारद्वाज यांनीच सिनेमाचे संगीत दिले.
का बघावा?
'हैदर' न बघण्याची कारणे देता येणार नाहीत. 'हैदर'ला अस्सल भारतीय तत्त्वज्ञानाचा डोस पाजून विशाल यांनी उत्कृष्टरित्या सादर केले आहे. बॉलिवूडमधील मसाला सिनेमांपेक्षा हा सिनेमा नक्कीच वेगळा आहे. 'ओमकारा' आणि 'मकबूल'प्रमाणेच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा आहे.