आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'हंसी तो फंसी\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हंसी तो फंसी' हा एक रोमाँटिक सिनेमा आहे. दिग्दर्शक विनिल मैथ्यू यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमात अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. सिध्दार्थने निखिल नावाचे तर परिणीतीने मीतीचे पात्र साकारले आहे. सिनेमा रोमाँटिक असल्याने काही प्रेक्षकांच्या तो पसंतीस पडू शकतो.
सिनेमाची कथा थोडी हटके आहे, परंतु गंमतीशीर आहे. सिनेमात निखिल(सिध्दार्थ मल्होत्रा) आणि मीता (परिणीती चोप्रा) यांचे विचार एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत.
निखिलचे लग्न मीताची मोठी बहीण करिश्मासोबत होते. मीताला वैज्ञानिक बनण्याची इच्छा असते. ती तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातून 7 वर्षासाठी दुर निघून जाते. ती 7 वर्षानंतर घरी परतते तेव्हा ती निखिलला पाहते आणि त्याच्यावर प्रेमात पडते. त्यानंतर काय घडते हे बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागणार आहे.
अभिनय- सिध्दार्थ आणि परिणीती यांचा अभिनय चांगला आहे. परिणीतीचा मागच्या काही सिनेमांमध्ये तुम्ही जो अंदाज बघितला आहे तसाच अंदाज तुम्हाला या सिनेमातही पाहायला मिळेल. सिध्दार्थनेही त्याची भूमिका चांगली पार पाडली आहे. तो प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला. या दोघांव्यतिरिक्त सिनेमातील बाकिच्या कलाकारांचाही अभिनय ठिक-ठाक आहे.
दिग्दर्शन- सिनेमा विनिल यांनी दिग्दर्शित केला आहे. विनिल यांचा या सिनेमाच्या माध्यमातून नवीन विचार बघायला मिळाला आहे. सिनेमात त्यांनी कलाकरांना चांगले प्रदर्शित केले आहे. सिनेमा काही ठिकाणी थोडा कंटाळवाणा आहे. परंतु विनोदामुळे सिनेमात जीवंतपणा येतो.
संगीत- विशाल-शेखरने सिनेमाला संगीत दिले आहे. संगीतसुध्दा जबरदस्त आहे. सिनेमाची 'जहनसीब' आणि 'इश्क बुलावा' ही दोन गाणी ऐकायला आणि बघायला चांगली आहेत.
एकुणच म्हटले जाऊ शकते, की या आठवड्यात हा सिनेमा तुमचे नक्कीच मनोरंजन करेल.