आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : हमशकल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा
साजिद खानच्या या सिनेमाची कथा तीन पात्रांभोवती गुंफण्यात आलेली आहे. अशोक (सैफ अली खान), कुमार (रितेश देशमुख) आणि मामाजी (राम कपूर) या तिघांचे त्यांचीच नावे असलेले हमशकल्स आहेत. एकाच नावाच्या हुबेहुब दिसणा-या व्यक्तिरेखांमुळे निर्माण होणारा गोंधळ ही या सिनेमाची कथा आहे.
याशिवाय या सिनेमाला आपण सायन्स फिक्शन सिनेमासुद्धा म्हणू शकतो. एक डॉक्टर सिक्रेट फॉर्म्युला MAD (माईंड अलर्टिंग ड्रग)ची निर्मिती करतो. याद्वारे तो लोकांचे डिएनए बदलून त्यांना कुत्रा बनवतो. या फॉर्म्युलाची निर्मिती करणारा डॉक्टर अशोक आणि कुमार यांच्यासारख्या दिसणा-या व्यक्ति बनवतो आणि त्यांच्यात व्हॉईस मॉड्युलेशन बॉक्ससुद्धा बसवतो. त्यामुळे या दोन व्यक्ती अशोक आणि कुमार यांच्यासारखा आवाज काढू शकतात.
साजिद खानचे दिग्दर्शन...
हमशकल्स हा एख माईंडलेस कॉमेडी सिनेमा आहे. त्यामुळे कदाचित साजिद खानने या सिनेमात बुद्धीचातुर्याचा उपयोग केला नसावा. सिनेमात अशोक (सैफ अली खान) एका बिलियन डॉलर कंपनीचा मालक आहे. आपल्या बोर्ड मेंबर्सना जे परदेशी आहेत, त्यांना हिंदीत भाषण देतो. एवढेच नाही तर लंडनमधील एका पबमध्ये परदेशी प्रेक्षकांसमोर तो हिंदीत स्टॅण्डअप कॉमेडी करताना दिसतो. हिम्मतवालानंतर पुन्हा एकदा साजिद खानचे दिग्दर्शन फेल ठरले आहे.
अभिनय
एकीकडे साजिद खानच्या दिग्दर्शनात दम नाहीये, तर दुसरीकडे सैफ, रितेश आणि राम कपूर यांचा अभिनयसुद्धा दमदार झालेला नाहीये. सर्वांनी सर्वसाधारण काम केले आहे.
संगीत
साजिद खानच्या हिम्मतवाला या मागील सिनेमाप्रमाणे 'हमशकल्स'चे संगीतही खूप उत्कृष्ट नाहीये. सिनेमातील गाणी प्रेक्षक थिएटरबाहेर पडताच विसरुन जातील. या सिनेमाचे संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे.
का बघावा किंवा का बघू नये?
जर तुम्ही हा सिनेमा बघण्याची योजना आखत असला, तर आमचा सल्ला हा आहे, की पैसे वाया घालवण्यापेक्षा हा सिनेमा टीव्हीवर येण्याची प्रतिक्षा करा. तरीदेखील तुमची इच्छा असल्यास 'हिम्मतवाला' बनून सिनेमा बघायला थिएटरकडे वळा.