आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW: 'आय, मी और मैं'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''हु इद द बेस्ट, हु इद द बेस्ट, ईशान इज द बेस्ट, हफ्फ-हफ्फ'', ही व्यक्ती संपूर्ण सिनेमात सतत हेच वाक्य बोलताना दिसते. विशेषतः आरशासमोर उभा राहून स्वतःला बघताना तो हे वाक्य हमखास बोलताना दिसतो.

त्याची प्रेयसी त्याचाकडे आपल्या प्रेमाची कबूली देते, तेव्हा तिला उत्तर देताना तो म्हणतो, आय लव्ह मी.
पुन्हा एकदा त्याची प्रेयसी आपल्या प्रेमाची कबूली त्याच्याकडे देते, तेव्हा तो म्हणतो, मी आहेच मुळात एवढा चांगला.

ही व्यक्ती मानसिक रुपाने आजारी आहे की त्याचा आयक्यू लो आहे, हे समजणे जरा कठीण जातं. कारण सतत तो स्वतःचे गोडवे गाताना दिसतो.

असो, मनोवैज्ञानिक सांगतात की, आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास वयाच्या सातव्या वर्षी होत असतो. या सिनेमाच्या सुरुवातीला छोटा ईशान आपल्या आईसोबत दिसतो. त्याची आई (झरिना वहाब) त्याला तो बेस्ट असल्याचे सांगते. (बेस्टचा अर्थ येथे काय होतो, हे कळत नाही.) त्यामुळेच कदाचित तो स्वत:ला बेस्ट समजत असावा.

तसे पाहता हा मुलगा आपल्या करिअरमध्ये चांगला सेट झाला आहे. पण तो नेमके काय काम करतो, हे मला माहित नाही. शिवाय त्याच्या बॉसला (रायमा सेन) तो आपला अ‍ॅटिट्युड दाखवत असतो. कदाचित तो म्युझिक लेबल एक्झिक्युटिव्ह आहे. नवीन सिंगिंग टॅलेंटचा शोध घेऊन त्यांना स्वतःचा अल्बम बनवण्याची संधी देण्याबद्दल तो बोलत असतो.

ही एक रोमँटिक कॉमेडी आहे. मात्र मला या सिनेमात कुठेही विनोद दिसला नाही. त्यामुळे हा सिनेमा एक मुलगा आणि दोन मुलींचा रोमँटिक सिनेमा आहे, असे आपण समजुया. खरे पाहता, मला रोमँटिक सिनेमे बघायला आवडतात. मात्र रोमँटिक सिनेमांना आपली पसंती दर्शवणे जितके सोपे आहे, तितकेच असे सिनेमे बनवणे कठीण असल्याचे मला वाटतं.

मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार कोण आहेत, यावर कदाचित हे अवलंबून असावं. प्रेक्षक त्याला केमिस्ट्री असे म्हणतात. हिंदी रोमँटिक सिनेमांमध्ये बँकग्राऊंड स्कोरची भूमिका खूप महत्त्वाची असते. मात्र या सिनेमातील 'जाने तू या जाने ना...' हे गाणे ए. आर. रेहमान यांच्या संगीताने सजलेल्या 'कहीं तो होगी वो..' या गाण्याची नकल वाटते.

वास्तविक पाहता डीडीएलजे, जेरी मॅकगिरे, हॉलिडे आपण या काही जुन्या रोमँटिक सिनेमांवर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, या सिनेमातील हिरो खूप साधा आहे, मात्र तरीदेखील त्याला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. कारण आपल्याला माहित आहे की, त्याच्यात चांगल्या माणसाचे गुण आहेत.

मात्र या सिनेमात आपल्याला दिसणारा बॉक्सिंग चॅम्पिअन खूपच बोअर आहे. ही भूमिका जॉन अब्राहमने साकारली आहे. या फिल्म इंडस्ट्रीत चॉकलेटी चेह-याचे भरपूर अभिनेते आहेत, त्यामुळे जॉनने स्वतःला अ‍ॅक्शन किंवा कॉमेडी सिनेमांपर्यंतच मर्यादित ठेवायला हवे. जसे सुनील शेट्टीने त्याच्या काळात केले होते.

चित्रांगदा सिंगने हिरोच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. या सिनेमात ती सतत रागातच दिसते. प्राची देसाई या सिनेमातील सेकंड लीड हिरोइन आहे. तिची भूमिकाही खूप चांगली जुळून आलेली नाही.

असं वाटतं जणू, या सिनेमातील कलाकारांची निवड करतानाच हा सिनेमा आपल्या ट्रॅकवरुन खाली घसरला. एकंदरीतच या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे जरा विचार करुनच थिएटरकडे वळा.