आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'इंकार\' : हायक्लास लव्ह सेक्स आणि धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा सिनेमा लैंगिक शोषणावर आधारित आहे. हा सिनेमा हॉलिवूडच्या 'डिस्क्लोजर' (1994) किंवा त्याची नकल असलेल्या 'ऐतराज' (2004) या सिनेमांसारखा मुळीच नाहीये.

खरे पाहता हा सिनेमा कामाच्या ठिकाणी असेलली मनोवैज्ञानिक पडताळणी आहे. हा सिनेमा कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांचा समूह, त्यांची कार्य पद्धती आणि त्यांची विचार प्रणालीची पडताळणी करतो.

हं... पण हे नक्कीच कॉर्पोरेट जगतातील सत्य असू शकतं. जर तुम्ही एखाद्या शहरातील ऑफिसमध्ये काही दिवस जरी काम केले असेल तर तुम्ही या सिनेमातील पात्रांना नक्कीच ओळखू शकाल.

एक अकडू सुपर बॉस (कंपनीचा अमेरिकन हेड) च्या व्यतिरिक्त येथे एक सुजाण कर्मचारी (विपिन शर्माने ही भूमिका चांगली वठवली आहे.) येथे काम करतो. तो या पदावर ब-याच वर्षांपासून काम करतोय आणि तो इतरांपेक्षा अधिक हुशार असल्याचे त्याला वाटतं.

कनिष्ट कर्मचा-यांमध्ये ईर्ष्या आणि चढाओढ लागली आहे. सिनेमात एक अत्याचार करणारी बॉससुद्धा आहे. तिला 'अल्फा वुमन' असे म्हटले जाते. ती आपल्यावर कुणाचाही दबाव सहन करु शकत नाही. शिवाय यशोशिखर गाठण्यासाठी ती कोणत्याही स्तराला जाऊ शकते. एकेकाळी ती अतिमहत्त्वकांक्षी होती. वास्तिविक पाहता ती आजही तशीच आहे. तिला या कंपनीत एक समांतर सत्ता स्थापित करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
जेव्हा लोकांना आपल्या उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा ते असेच वागतात. म्हणूनच राजकारण करणे ही एक कला असते.

सिनेमाची कहाणी मध्य मुंबईत घडते. ही एक जाहिरात कंपनी असून देशातील उत्पादनांबरोबरच स्वप्न विकण्याचे काम ही कंपनी करते. बोर्डरुममध्ये ही महिला क्रिएटिव्ह हेड आपल्या सीईओसोबत बसली आहे.
या महिला क्रिएटिव्ह हेडने आपल्या सीईओवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्या आजुबाजुला बसलेल्या लोकांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि जज बसले आहेत. सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये चालतो. जसजशी सिनेमाची कथा पुढे सरकते तसतसा कथानकावरुन पडदा उठतो.

हा सिनेमा काहीसा 2010 मध्ये रिलीज झालेल्या ऑस्कर विजेत्या 'सोशल नेटवर्क' या सिनेमाशी साधर्म्य साधणारा वाटतो. घटना एकच आहे, मात्र लोकांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा विषय वेगळा वाटतो. त्याला रशोमोन इफेक्ट असे म्हटले जाते. या इफेक्टचे नाव कुरोसावाच्या सिनेमावर पडले आहे.

सिनेमा छोटे छोटे दृश्य आणि कट्सच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. अमेरिकन टीव्ही ड्रामा बघणा-यांना ही पद्धत माहित असून ती त्यांच्या पसंतीला पडणारी आहे. क्रिएटिव्ह हेडची भूमिका चित्रांगदा सिंगने (सिनेमात चित्रांगदा सेन्सुअस आणि मनमोहक दिसली आहे.) साकारली आहे.

चित्रांगदाने आपल्या करिअरची सुरुवात सुधीर मिश्रा यांच्याच 'हजारो ख्वाहिशें ऐसी' या सिनेमाद्वारे केली होती. मात्र सुधीर मिश्रा यांचा हा पहिलाच सिनेमा असावा जो संपूर्णपणे भारतातील उच्च मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवर आधारित आहे. या सिनेमाची अडचण म्हणजे अशा धाटणीच्या सिनेमांचा प्रामाणिकपणा केवळ त्यातील संवादांवर आधारित असतो. याप्रकारच्या वर्तुळात जास्तीत जास्त इंग्रजी भाषा बोलली जाते.

सुधीर मिश्रा यांनी आपल्या या सिनेमात इंग्रजी शिव्या टाळल्या आहेत. शिवाय पात्रांची हिंदी भाषा विचित्र वाटत नाही. सीईओची भूमिका अर्जुन रामपालने साकारली आहे. काही वर्षांपूर्वी अर्जुन एवढा चांगला अभिनय करु शकतो असे कुणालाही वाटले नसेल.

संपूर्ण सिनेमा अर्जुन आणि चित्रांगदाच्या अवतीभोवती फिरतो. हा सिनेमा विचार करायला लावणारा आणि महत्त्वकांक्षेबद्दल आहे. या सिनेमातील महिला अधिकार कार्यकर्त्याची भूमिका साकारणारी दिप्ती नवल यांचा एक संवाद आहे. त्या म्हणतात, ‘अगर फ्लर्टिंग लड़की को पसंद न हो तो वह हैरेसमेंट बन जाती है।'.
मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर निश्चितच हा सिनेमा बघण्याची संधी मी कधीच गमावली नसती.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)