आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजन करणारा \'जॉली एलएलबी\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


काही प्रमाणात हा सिनेमा जोनाथन लिन यांच्या 'माय कजिन्स विन्नी' (1992) या सिनेमावर आधारित आहे. हा सिनेमा आपल्या न्यायिक व्यवस्थेवर व्यंग करतो. ज्याप्रमाणे लगे रहो मुन्नाभाई या सिनेमात रिअल इस्टेट माफियावर आणि मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात मेडिकल प्रोफेशनवर प्रकाश टाकण्यात आला होता.

मात्र 'जॉली एलएलबी' हा सिनेमा मुन्नाभाई सिरीजच्या दोन सिनेमांप्रमाणे विनोदी असेल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाहीये. मी येथे या सिनेमांचा उल्लेख यासाठी केला, कारण मुन्नाभाईच्या दोन्ही सिरीजमधील प्रमुख कलाकार अर्शद वारसी आणि बोमन इराणी या सिनेमातही हजर आहेत.

उत्कृष्ट अभिनेता बोमन इराणी यांनी या सिनेमात एका बड्या वकिलाची भूमिका साकारली आहे. हा वकिल श्रीमंतांच्या फायद्यासाठी न्यायिक व्यवस्थेचा हवा तसा वापर करतो. तो गर्भश्रीमंत नंदा कुटुंबीयांचा खटला लढतोय. या कुटुंबातील श्रीमंत आणि वाया गेलेल्या मुलाने दारुच्या नशेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना आपल्या गाडीखाली चिरडून मारले.

निश्चितच तुम्ही दिल्लीतील हिट अँड रन नंदा केसविषयी ऐकलेच असेल. या सिनेमातील बोमन इराणी यांच्या पात्राची प्रेरणा वकिल आर. के. आनंद यांच्यापासून घेतली असल्याचे जाणवते. मात्र त्यांच्या हजरजबाबीपणा मला राम जेठमलानी यांच्यासारखा वाटतो.

अर्शद जॉली एलएलबी आहे. जगदीश त्यागीचे शॉर्ट फॉर्म जॉली आहे. भारतात एलएलबी असा पोस्ट ग्रॅज्युएश कोर्स आहे, जो कॉलेज ड्रॉपआउट्स किंवा दुस-या मास्टर कोर्सेस निवडण्यासाठी सक्षम नसलेले विद्यार्थी निवडतात. म्हणूनच एलएलबीला 'लटक लटक के बीए पास' असेही म्हटले जाते.

जॉली मेरठचा रहिवाशी आहे. तो निश्चितच 'लटक लटक के' प्रकारातला लॉ ग्रॅज्युएट आहे. तो अपीलला अ‍ॅप्पल आणि प्रोसिक्युशनला प्रोस्टिट्युशन लिहितो.


दिल्लीच्या एका सेशन कोर्टाबाहेर त्याचे छोटेसे दुकान आहे. त्याचे करिअर यशोशिखरावर पोहोचेल अशी कोणतीही चिन्ह नाहीत. अखेर वकिल डॉक्टरांप्रमाणे जाहिराती देऊ शकत नाहीत. एकतर त्यांना चांगले खटले मिळतात किंवा एखाद्या लॉ फर्म्समध्ये ते नोकरी करतात. मात्र याशिवाय वृत्तपत्रात वारंवार नाव छापून आल्याचा फायदा वकिलांना नक्कीच मिळतो, हे जॉलीला चांगलेच ठाऊक आहे.

टीव्ही चॅनलवाल्यांनी त्याची वारंवार मुलाखती घ्यावी यासाठी तो नंदा खटला आपल्या हाती घेतो. निश्चितच आपल्या देशात त्याच्यासारखे असे अनेक वकिल आहेत आणि आपण अनेक टीव्ही पॅनल चर्चांमध्ये त्यांना बघतच असतो. 'हिट अँड रन' केस खरे पाहता 'ओपण अँड केस' आहे. बचाव पक्षाने सगळे पुरावे नष्ट केले आहेत.

जॉलीसुद्धा राजा हरिश्चंद्र नाहीये जो सत्यासाठी स्वतः शहीद होईल. असे असले तरीदेखील त्याला खटला लढायचा असतो. अचानक जॉली अशा साक्षीदारांना बोलावतो, जे त्या दिवशी कोर्टात हजर राहणार नव्हते. दुस-या पक्षातील वकिल हसू लागतो. जणू साक्षीदारांना बोलावणे म्हणजे एखाद्या सिनेमातील दृश्य असावे. प्रत्यक्षात पाहता, ज्या व्यक्तीने कधीच कोर्टाची पायरी चढली नसेल ती व्यक्ती खरा कोर्ट आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये दाखवण्यात येणा-या कोर्टातील वेगळेपणा सांगू शकत नाही. त्यामुळे या सिनेमाचे मोठे योगदान म्हणजे, हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांना कनिष्ठ कोर्टातील सत्याशी ओळख करुन देतो.

सिनेमा बघून आपल्या लक्षात येत की, प्रत्यक्षात आपल्याला आणखी कायद्यांची गरज नाहीये, उलट जे कायदे आहेत त्यांचीच योग्यप्रकारे अमंलबजावणी व्हायला हवी.

हा सिनेमा एका साहसी विषयावर बनवला गेला आहे. हा सिनेमा बघून आपल्या लक्षात येईल की, यापूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत न्यायव्यवस्थेचे विविध पैलू दाखवणारा एकही सिनेमा बनला नाहीये. आपण भारतीय न्यायव्यवस्थेवर टीका करु शकतो, मात्र न्यायाधिशांविरोधात बोलणे धोकादायक सिद्ध होऊ शकते.

पत्रकार ही गोष्ट जाणून आहेत. कोर्टाचे अवमान करणे एक गंभीर गुन्हा आहे. या सिनेमात न्यायाधिशांच्या भूमिकेत अभिनेते सौरभ शुक्ला आहेत. ते म्हणतात की, ‘कानून अंधा होता है, जज नहीं। जज को सब दिखता है’.

संगीताने सजलेला हा सिनेमा भावूक आणि कोर्टरुम कॉमेडी आहे. या विषयावर सिनेमा बनवताना बारीक सारीक गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र काहीही ठिकाणी दिग्दर्शकाच्या नजरेतून या बारीक सारीक गोष्टी सुटल्या आहेत. मात्र दिग्दर्शक त्याची बाजू सांभाळण्यात यशस्वी झाला आहे.

सुभाष कपूर यांचा शेवटचा सिनेमा 'फंस गए रे ओबामा' हा होता. प्रत्यक्षात राजकुमार हिराणी प्रिसंपल असलेल्या शाळेतील सुभाष कपूर दिग्दर्शक आहेत, सुभाष कपूर यांना मुन्नाभाई सिरीजच्या तिस-या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी विचारणा झाली असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. असे झाले तर नक्कीच मुन्नाभाई सिरीजचा तिसरा सिनेमा उत्कृष्ट असले. तसे पाहता, जॉली एलएलबीसुद्धा बघण्यासारखा सिनेमा आहे.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)