आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review 'खूबसुरत'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथाः
या नव्या सिनेमाची नायिका डॉ. मृणालिनी चक्रवर्ती उर्फ मिली (सोनम कपूर) दिल्लीची रहिवासी असून फिजिओथेरपिस्ट आहे. मिलीची आई मंजू चक्रवर्ती (किरण खेर) यांनी तिचे पालनपोषण केले असून तिच्या घरात तिला कोणतीही रोकठोक नसते. मिली आयपीएलच्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्याचे काम करत असते. ती संभलगडच्या राजघराण्याच्या आमंत्रणावरून फिजिओथेरपिस्ट म्हणून तिथे जाते. शेखर सिंह राजेसाहेबांचे (आमिर रझा हुसेन) पाय गुडघ्यापासून खाली पांगळे झाले आहेत, ते दुरुस्त करण्याचे काम मिलीवर आले आहे. येथे त्या आघाताचीही एक वेगळी कहाणी आहे.
राणीसाहेबांचा (रत्ना पाठक-शाह) दरारा सुरुवातीलाच जाणवतो. युवराज विक्रमसिंह राठोड (फवाद खान) आणि मिलीची सुरुवातीला चकमक उडते आणि नंतर हळूहळू त्यांची गाडी प्रेमाच्या ट्रॅकवर जाते. मिली मनमौजी स्वभावाची मुलगी आहे. एकदा तिची बडबड सुरु झाली की ती थांबतच नाही. तिची जादू हळूहळू राठोड फॅमिलीवर चालू लागते. पुढे सिनेमात काय घडते, हे पडद्यावर बघणे इंट्रेस्टिंग ठरेल.

शशांकचे दिग्दर्शनः
शशांक घोष यांनी आत्तापर्यंत 'वैसा भी होता है पार्ट 2', 'क्विक गन मुरगन'सह आणखी काही सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. मागील सिनेमांच्या तुलनेत खूबसुरतचे दिग्दर्शन त्यांना चांगले जमले आहे. मात्र अधूनमधून सिनेमा लय सोडतो. नव्या काळातील मुलगी म्हणून तिचं आधुनिक रूप दाखवण्याच्या नादात ती मुळात एक फिजिओ डॉक्टर आहे, याचाच दिग्दर्शकाला विसर पडलाय की काय, असं वाटतं.
सोनम-फवादचा अभिनयः
सिनेमाची कथा सोनमवर केंद्रित आहे. सोनमने आपल्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. मात्र जेव्हा तिची तुलना रेखा स्टारर खूबसुरतसोबत होते, तेव्हा ती कमजोर वाटते. सोनमने केलेला अभिनय तिच्या व्यक्तिमत्त्वावर अगदी फिट बसतो. तर दुसरीकडे, फवादने या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले आहे. मात्र या सिनेमामध्ये तो आपली छाप सोडण्यात अयशस्वी ठरला आहे. किरण खेर, रत्ना पाठक यांनी आपल्या भूमिका योग्य बजावल्या आहेत.

संगीतः
या सिनेमात एकुण सहा गाणी आहेत. जवळजवळ 24 मिनिटांची ही गाणी आहेत. यामध्ये 'इंजन की सिटी में मारा बम डोले' आणि 'अभी तो पार्टी शुरू हुई है' ही गाणी चांगली जमून आली आहेत. इतर गाणी छाप पाडत नाहीत. एकंदरीतच स्नेहा खानवलकरचे संगीत ठिकठाक आहे.
सिनेमा का बघावाः
खूबसुरत हा सिनेमा कौटुंबिक धाटणीचा सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही या सिनेमाची मजा घेऊ शकता. तरुणांना सोनमचा चुलबुली अवतार पसंत पडणारा आहे. शिवाय सोनम तरुणींना सिनेमाच्या माध्यमातून फॅशन आणि ड्रेसेस टीप्स देऊ शकते. एंकदरीतच सिनेमा मनोरंजनासोबत तरुणींना एक्स्ट्रा टीप्स देऊ शकतो.