आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: कुक्कू माथुर की झंड हो गई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कहानी: कुक्कू आणि रोनी बालपणीचे जिवलग मित्र आहेत. थोडे मोठे झाल्यानंतर दोघे विभक्त होतात आणि मोठे होतात. एका छोट्याशा ब्रेकनंतर दोघांची मैत्री त्यांना पुन्हा एकत्र आणते.
हा सिनेमा मैत्रीच्या संकल्पनेवर आधारित आहेत. तीही त्याच-त्याच कथेसह फक्त सिनेमात नवीन चेहरे आहेत. ना त्यात हनीसिंगचे रॅप आहे ना त्यात सिक्स पॅक्स आहेत.
कुक्कू माथुर (सिध्दार्थ) एक आई नसलेला मध्यमवर्गीय दिल्लीत राहणारा मुलगा असतो. तो आपल्या कडक स्वभावाच्या वडिलांसोबत राहतो. कुक्कूचे वडील त्याच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. परंतु कुक्कू एक हॉटेल चालू करण्याचे स्वप्न बघतो.
रोनी (आशीष) कुक्कूचा एक खास मित्र असतो. त्यांना रात्री साडीच्या गोदामामध्ये जाऊन फ्रुट बिअर पिण्याचे व्यसन असते.
बारावीनंतर कुक्कूला खूप संघर्ष केल्यानंतर एका शेडी सिनेमात स्पॉट बॉयची नोकरी मिळते. तसेच, रोनी आपल्या ब्लाऊज पीसच्या कौंटुबीक व्यवसायात गुंतून जातो. त्यामुळे त्याला अनेकदा आपल्या मित्रांमध्ये अपमानित व्हावे लागते.
त्यानंतर एक कडू सत्य कुक्कूसमोर येते आणि त्याचे आयुष्य उध्वस्त होते. त्याचवेळी कानपूरच्या प्रभाकर भैय्याची एंट्री सिनेमात होते. त्याच्याकडे प्रत्येक समस्येचा तोडगा असतो.
इथूनच सिनेमाल नवीन वळण येते. एक चांगला मुलगा कसा परिस्थितीनुसार बदलत जातो. सिनेमाची कथा अशाच संकल्पनेभोवतची गुंफलेली आहे. एकुणच कुक्कूचे आयुष्य पूर्णत: उध्वस्त होते. त्यामुळे कुक्कू की झंड हो गई म्हणणे वावगे ठरणार नाही.
सिनेमाची कहानी तुमच्यासमोर काहीच नवीन गॉसिप मांडत नाही. तेच जूने जोक्स, तोच जूना मसाला. तुम्ही यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये बघितलेले असेल. सिनेमा इतकाही आकर्षित करत नाही.
मात्र सिनेमामध्ये प्रभाकर यांचा अभिनय तुम्हाला भूरळ घालणारा ठरेल. याव्यतिरिक्त गोदामच्या गार्ड आपल्या पत्नीसोबत प्रेमाचे क्षण कसे घालवतो हे गंमतीशीरित्या दाखण्यात दिग्दर्शकाला यश मिळाले आहे. परंतु इथेसुध्दा सिनेमाची कमकुवत पटकथा आडवी येते.
अभिनय: या सिनेमामधून पदार्पण करणारा सिध्दार्थ आणि आशीषने चांगला अभिनय केला आहे. परंतु सिनेमात कुक्कूची लव्ह इंटरेस्ट बनलेली गल्लीतली सिमरन आपल्या अभिनयाची छाप पाडण्यास मात्र अपयशी ठरली. सिमरनसाठी सिनेमात जास्त अभिनयसुध्दा नव्हता.
दिग्दर्शन: अमन सचदेवाचे दिग्दर्शन चांगले आहे. परंतु कमकुवत पटकथेमुळे तो कमाल दाखवू शकला नाही.
का बघावा सिनेमा?
जर तुम्हाला प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये बघण्याचा छंद असेल तर तुम्ही हा सिनेमा बघू शकता. कुक्कूची बिकट परिस्थीती तुम्ही बघू तर शकाल.