आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लुटेरा\' - एक क्लासिक लव्हस्टोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा एक भावनिक आणि अत्यंत प्रणयरम्य, कल्पनारम्य सिनेमा आहे. बॉलिवूडमध्ये खास अंदाजात प्रणयरम्य सिनेमे तयार केले जातात, हे जगाला ठाऊक आहे. याच कारणामुळे ट्रॅजेडी किंग आणि क्वीन, किंग ऑफ रोमान्स यांसारख्या मेलोड्रॅमिक सुपरस्टार्सचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.

मात्र हा सिनेमा वेगळ्या धाटणीतला आहेत. नेहमीप्रमाणे या सिनेमातही दोन प्रेमी आहेत. हीरोची भूमिका अशा अभिनेत्याने (रणवीर सिंह) साकारली आहे, जो यशराज बॅनरच्या 'बँड बाजा बारात', 'लेडी वर्सेस रिकी बहल' या सिनेमात झळकला आहे. तर नायिकेची (सोनाक्षी सिन्हा) भूमिका अशा अभिनेत्रीने साकारली आहे जी 'सन ऑफ सरदार', 'दबंग', 'दबंग 2', आणि 'राऊडी राठौर' यांसारख्या शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करणा-या सिनेमांसाठी ओळखली जाते.
हा सिनेमा वर नमुद केलेल्या सिनेमांपैकीच एक आहे, असा विचार करुन जर तुम्ही थिएटरमध्ये जात असाल तर ती तुमची मोठी चुक असेल.

संगीत, नृत्य, गाणी आणि उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि कोरिओग्राफी हिंदी सिनेमातील प्रणयरम्य कथांचा जीव आहेत. त्यांच्या मदतीने सिनेमातील त्रुटी सहज लपवल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ 'बर्फी' सिनेमात नाटकीपणाचा अभाव होता, तर 'आशिकी 2' मुळातच सरासरी सिनेमा होता. 'रांझणा'ची कहाणी काहीशी विचित्र होती. मात्र प्रेक्षक या त्रुटींकडे कानाडोळा करतात. ते सिनेमातील गोड गीत गुणगुणत थिएटरबाहेर पडतात.

या सिनेमातसुद्धा उत्कृष्ट संगीत आहे. काही गोड गाणीसुद्धा आहेत. मात्र ती सगळी गाणी बॅकग्राऊंडमध्ये वाजतात. त्यामुळे या सिनेमाची लांबी अर्ध्या तासाने कमी झाली आहे.

सिनेमात कॅमेरा बहुतेकवेळा फ्रीज फ्रेम करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या नजरा कलाकारांवर खिळून राहतात. मात्र हा सिनेमा मेलोड्रामापेक्षा वेगळ्या वळणाचा आहे. कलाकार मंद स्वरात बोलतात. त्यांचा अभिनय खरा आणि संतुलित वाटतो. त्यांच्या देहबोलीतसुद्धा इतका संयम जाणवतो, की पडद्यावर आपण रणवीर सिंहला बघतोय यावर आपला विश्वासच बसत नाही. कारण आत्तापर्यंत आपण रणवीरला खट्याळ भूमिका साकारताना बघितले आहे. रणवीरच्या अभिनयाची ही बाजू देखील आहे, यावर आपला विश्वासच बसत नाही.

सिनेमाचे शीर्षक 'लुटेरा' त्याच्या व्यक्तिरेखेच्या आधारावर ठेवण्यात आले असेल, मात्र माझ्या मते सिनेमाचा केंद्रबिंदू त्याची नायिका आहे. एका परोपकारी बंगाली जमीदाराच्या मुलीच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हाची निवड खूप विचारपूर्वक करण्यात आली आहे. ही भूमिका बुद्धिमत्तेसह प्रेम करण्याच्या क्षमतेने परिपूर्ण आहे.

गतकाळातील शोकांतिका असेलल्या प्रणयरम्य कथेप्रमाणेच हा सिनेमादेखील दोन हंगाम (शरद ऋतूतीत पतझड आणि हिवाळा) आणि दोन ठिकाण (डलहौजी आणि ग्रामीण बंगाल) यात विभागला आहे. ही एका अशा तरुणाची कथा आहे, जो नायिकेचे हृदय चोरतो मात्र त्याचा खरा उद्देश तिच्या वडिलांची संपत्ती लुटण्याचा असतो.

नायिकेचे नायकावर खूप प्रेम आहे, मात्र नंतर ती त्याचा द्वेष करते. माझ्या मते, प्रेमाच्या उलट उपेक्षा आहे, द्वेष नाही. कारण नायिकेच्या मनात नायकासाठी खूप प्रेम आहे. सिनेमात व्यक्तिरेखांचा भडीमार नाहीये. त्यामुळे कथेत उगाचच गुंतागुंत निर्माण झालेली नाही. नायकाला आईवडील नाहीत.

नायिकेचेसुद्धा तिच्या वडिलांशिवाय जगात दुसरे कुणीही नाही. सिनेमाच्या शेवटापर्यंत आपल्या मनातसुद्धा नायकाविषयी सहानुभूती निर्माण होऊ लागते आणि नायकाला त्याची प्रेयसी मिळावी, अशी आपण अपेक्षा करणे सुरु करतो. तो एक चाणाक्ष्य लबाड आहे. मात्र तरीदेखील तो नायिकेला फसवतोय किंवा तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करतोय, असे आपल्याला मुळीच वाटत नाही.

याप्रकारे हा सिनेमा 'टॅलेंटेड मिस्टर रिप्ले' किंवा 'मॅचपाँईंट' (जो एका ठगाविषयी होता) आणि 'द नोटबूक' (ख-या प्रेमावर आधारित) या सिनेमांचे मिश्रण आहे. मात्र तरीदेखील हा या तिन्ही सिनेमांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. दिग्दर्शकाने ओ हेनरी यांच्या 'द लास्ट लीफ'पासून प्रेरणा घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात ओ हेनरीच्या कथेत आणि या सिनेमात फार कमी साम्य आहे.

1953 साली सिनेमाची कथा घडते. याकाळात भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र तरीदेखील बंगालमध्ये जमीनदारी प्रथा सुरु होती. सिनेमाचा मुळ गाभा त्याच्या तपशीलात असतो. या सिनेमात आपल्याला उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी बघायला मिळते.

दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांचा हा दुसरा सिनेमा आहे. आयएमडीबी डॉट कॉमवर असलेल्या माहितीत विक्रमादित्य मोटवाने यांच्या कामाचा तपशील आहे. त्यानुसार, ते 'देव डी' सिनेमाचे पटकथा लेखक, 'देवदास'चे साऊंड डिझायनर, 'वॉटर'चे कोरिओग्राफर, 'शानु टॅक्सी' या शॉर्ट फिल्मचे एडिटर, सिनेमॅटोग्राफर आणि 'पांच'चे 'डायरेक्टर ऑफ साँग' आहेत.

यावरुन हे स्पष्टच आहे, की त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. बहुतेक दिग्दर्शक असे करत नाहीत. माध्यमांवर विक्रमादित्य यांची पकड स्पष्ट दिसून येते. त्यांच्या 'उडान' (2010) या पहिल्या सिनेमाला व्यावसायिक यश मिळाले होते. शिवाय कान्समध्ये त्याचे स्पेशल स्क्रिनिंगही झाले होते.

पन्नासच्या दशकातील 'आवारा', 'दो बिघा जमीन' या सिनेमांनासुद्धा दुहेरी सन्मान प्राप्त झाले आहेत. या सिनेमांना एक प्रकारची लय असायची. ते एका ठिकाणी थांबायचे. भाषेकडे कल असायचा. तसेच काही शांत क्षणसुद्धा असायचे. या सिनेमातदेखील हे सगळे काही आहे. अशाप्रकारचा सिनेमा बनवण्यासाठी धैर्य आणि स्पष्ट दृष्टिकोन आवश्यक असतो.