आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम दिग्दर्शन आणि अभिनयाचा चविष्ट \'लंचबॉक्स\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं तर हा सिनेमा दोन म्हणींची गोळाबेरीज आहे. एक म्हणजे कुणाच्याही हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जात असतो. आणि दुसरी म्हण रिप्लेच्या प्रसिद्ध 'बिलिव्ह इट ऑर नॉट'वर आधारित आहे .
मुंबईतील डबेवाले लाखोच्या संख्येतील लंचबॉक्स वेगवेगळ्या उपनगरांमधील घरं आणि कार्यालयात दररोज कशाप्रकारे वेळेत पोहोचवतात हे पाश्चिमात्य मीडियात नेहमी दाखवलं जातं. कदाचितच कधी एखादा लंचबॉक्स चुकीच्या ठिकाणी पोहचण्याची तुरळक घटना या डबेवाल्यांकडून घडली असावी. गेल्या 130 वर्षांत डबेवाल्यांनी त्यांच्या कामात प्राविण्य मिळवले आहे.

असो, या सिनेमात मात्र एकदा डबेवाल्यांकडून ही चुक घडते. इरा नावाच्या गृहिणीने तिच्या नव-याला पाठवलेला लंचबॉक्स दुस-याच कुण्या व्यक्तिच्या टेबलापर्यंत पोहोचतो. फर्नांडिस हा विधुर असून सरकारी पेंशन किंवा वीमा एजन्सीच्या कार्यालयात अकाऊंटंट आहे. त्याच्या कार्यालयात संगणक नाहीये. सर्व कामं स्वहस्ते करावी लागतात. इतकेच नाही तर त्याच्या कार्यालयातील पंखेसुद्धा धीम्या गतीने सुरु आहेत. सर्व टेबलांवर कागद आणि फाईल्सचा ढीग साचला आहे. हे कार्यालय अगदीच भकास स्वरुपाचे आहे. मात्र फर्नांडिस गेल्या 35 वर्षांपासून येथे काम करतोय. त्याचे डोळे आणि चेहरा बघून आपण हे समजूदेखील शकतो. घरातून कार्यालयापर्यंत बस, ट्रेन किंवा कधी कधी ऑटो रिक्शा पकडण्याच्या नादात जणू त्याच्या आयुष्याची गाडीच सुटली आहे.

इरा मात्र फर्नांडिसपेक्षा वयाने बरीच लहान असून तिला एक मुलगी आहे. आपल्या नव-याचे परस्त्रीबरोबर संबंध असल्याचे तिला ठाऊक आहे. मात्र तरीही त्याला आनंदी ठेवण्यासाठी तिचे नानातऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवून धाडण्याचा देशपांडे काकूंनी दिलेला सल्ला अंमलात आणण्याच्या प्रयत्नात तिचा अनोळखी फर्नांडिसबरोबर संवाद सुरू होतो. मध्यवयीन अकाऊंटंट आणि एक तरुण गृहिणी यांच्यात एक अनोळखी नातं तयार होते. दोघांनाही आपल्या आयुष्यात थोडा बदल अपेक्षित आहे.

फर्नांडिस हा वयाच्या उत्तरार्धाकडे झुकलेला सरकारी अधिकारी असून निवृत्ती स्विकारून नाशिकला स्थिरस्थावर होण्याची त्याची इच्छा आहे.

इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आज दोन अनोळखी माणसं एकमेकांच्या संपर्कात येणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. यू हॅव गॉट मेल, मिट माय फ्रेंड, स्लीपलेस इन सिएटल यांसारख्या काही रोमँटिंक सिनेमांमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या सिनेमात हे दोघे लंचबॉक्समध्ये पत्र पाठवून एकमेकांशी संवाद साधत असतात. त्यांचे विचार खूप गंभीर स्वरुपाचे नाहीयेत. डबेवाले त्यांच्यासाठी कबूतर किंवा टपालवाहकासारखे काम करतात. सेलफोनच्या जमान्यात हा खूप जुना काळ वाटतो. इराच्या घरी असलेला ट्रान्सझिस्टरसुद्धा रेडिओ किंवा व्हिडिओ प्लेअरसारखा आहे.

फर्नांडिसची भूमिका अभिनेता इरफान खानने साकारली आहे. मुळचा मुंबईचा असलेल्या फर्नांडिसला सर्वजन मॅक अंकल म्हणून हाक मारतात. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीने शेखची भूमिका साकारली आहे. फर्नांडिस ऑफिसमधून रिटायर झाल्यानंतर त्यांच्याजागी एका नवीन कर्मचाऱ्याची शेखची (नवाझुद्दीन सिद्दीकी) भरती केली गेलीय. त्याला ट्रेन करण्याची जबाबदारी फर्नांडिसवर आहे.

सिनेमात शेख आपल्याला हसवण्याचे काम करतो. खरं तर शेख सिनेमात विनोदनिर्मितीसाठी मुळीच नाहीये. पण त्याच्या छोट्या छोट्या संवादातून तो प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य आणतो.

काही कलावंतांना भूमिका जिवंत करण्याची कला अवगत असते. नवाजुद्दीनबद्दल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेखच्या भूमिकेत त्याने जीव ओतला आहे. तर दुसरीकडे इरफानसुद्धा हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील एक सक्षम अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने इरफानने मोठा पडदा व्यापून टाकला आहे. मिस्टर फर्नांडिसला निरखून बघितल्यास ती म्हातारी, उदास झालेली व्यक्ति आपल्यातीलच एक वाटते. फर्नांडिस म्हणतो, की जर आपण आपली गोष्ट इतरांना सांगितली नाही, तर ते आपल्याला विसरु लागतात. कदाचित त्यामुळेच आपण नेहमी मित्र आणि सहका-यांना नेहमी शोधत असतो.

मलाडची गृहिणी, वांद्र्यातील मॅक अंकल आणि डोंगरीचा विवाहित असिस्टंट, या पात्रांची गुंफण करत या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणा-या रितेश बत्राने मोठ्या खुबीने माणसाचे एकटेपण चित्रित केले आहे. जगातील गर्दीच्या शहरांत राहणा-या लोकांच्या मनाला भावणारा हा सिनेमा आहे. कान्स फिल्म फेस्टीव्हल 2013 मध्ये पहिल्यांदा या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडलं होतं. यावेळी ‘क्रिटिक विक व्हिवर्स चॉईस अवॉर्ड’ या सिनेमानं पटकावलं होतं. हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवला जावा, असं वातावरण मीडियाने तयार केलं आहे. यांसारखे छोटे-तरल सिनेमे लांबचा पल्ला गाठू शकतात.

जगातील उत्कृष्ट सिनेमांचा उत्तरार्ध त्याच्या पुर्वाधापेक्षा अधिक चांगला असतो. हा सिनेमा एका चांगल्या शेवटाकडे घेऊन जातो. निश्चितच त्यात एक वास्तव आहे. प्रेमाची एक झुळूकही व्यक्तीनं स्वत: निरर्थक ठरवलेलं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं त्याच्यासमोर मांडताना पाहायचं असेल, तर हा ‘लंच बॉक्स’ नक्की पाहावा. उत्तम दिग्दर्शनाचा आणि उत्तम अभिनयाचा नमुना यात प्रेक्षकांना बघायला मिळेल.