आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मद्रास कॅफे' सत्य घटनेवर आध‍ारित एक उत्कृष्‍ट कलाकृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्रास कॅफे हा चित्रपट फिक्‍शन आहे. तो वास्तवासारखा पाहिला पाहिजे. वर्तमान काळात आपल्या सभोवताली वेगवेगळ्या घटना घडतात त्यांचे वास्तव चित्रण मद्रास कॅफेमध्‍ये करण्‍यात आले आहे. मात्र या चित्रपटात चित्रित करण्‍यात आलेली घटना ही 1991 सालची आहे. ज्यात एलटीटीईच्या महिला दहशतवादी स्वत:च्‍या शरीराला बॉम्ब लावलेले असते व त्याच्या साहाय्याने भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करते. राजीव गांधींच्या हत्येपूर्वीचे क्षणचित्रे यात दाखवण्‍यात आले आहे.तसेच एलटीटीई या दहशतवादी संघटनेविषयी माहिती देण्‍यात आली आहे. तम‍िळ फुटीरवादी संघटना असलेल्या एलटीटीईनेच राजीव गांधी यांचा खून घडवून आणला होता. चित्रपटात दाखवण्‍यात आलेल्या घटना या बहुतेक विशेष तपास पथकाने (एसआयटी) जमा केलेले पूरावे, जैन आयोगाचा अहवाल यातून घेतले असल्याची शक्यता चित्रपट पाहिल्यानंतर येते. वास्तव हे फि‍क्शनच्यामाध्‍यमातून उत्कृष्‍टपणे मांडण्‍यात आल्याने तो एक डॉक्यू-ड्रामा झाला असल्याचे सतत वाटते. चित्रपटातील कथानक हे प्रेक्षकाला पाहाण्‍यास उद्युक्त करते. चित्रपटात दाखवण्‍यात आलेली कथा ही वास्तवात अशी घडली असेल हे सांगते.


पण चित्रपटाला देण्‍यात आलेल्या मद्रास कॅफे या शीर्षकातून कोणताही अर्थ सूचित होत नाही. कदाचित त्यातून एक
अर्थ ध्‍वनित होतो तो म्हणजे तो एक कॉफीशॉप्स असेल. राजीव गांधींच्या खूनाचा कट हा प्रथम मद्रास कॅफेमध्‍येच रचला जातो. 1991 साली जन्मास आलेल्या पिढीला राजीव गांधी यांच्या हत्याची घटना त्यांच्यासाठी खूप नवी असेल कारण त्यांनी इतिहासाच्या पुस्तकात ती वाचलेली नसेल. हा चित्रपट एलटीटीईबरोबरच आपले शेजारील राष्‍ट्र असलेल्या श्रीलंकेतील ग्रह कलहाची एक पार्श्‍वभूमी दाखवते. त्यात सिंहली आणि तमिळ यांच्यातील संघर्ष दिसतो. पण स्वातंत्र द्रविडस्तानच्या मागणीला काही प्रमाणात इंदिरा गांधींनी समर्थन दिले होते. तम‍िळनाडूच्या मुख्‍यप्रवाहातील राजकारणी व फुटीरवादी यांच्याबाबत कोणतेही भाष्‍य संबंधित चित्रपटात दाखवण्‍यात आलेले नसतानाही चेन्नईमध्‍ये या चित्रपटाच्या विरूध्‍द निदर्शने करण्‍यात येत आहेत.


चित्रपटात जॉन अब्राहम हा एका गुप्तेहेराच्या भूमिकेत आहे. राजीव गांधी श्रीलंकेतील संघर्ष संपवण्‍यासाठी त्या देशाबरोबर प्रयत्न करतात.या दरम्यान जॉनचा प्रवेश होतो. भारत श्रीलंकेबरोबर शांत‍ता करार करतो व आपले शांती सैन्य त्या देशात पाठवतो.पण या घटनेमुळे एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरण भारतावर हल्‍ला करण्‍याचा निर्णय घेतो.


प्रभाकरणला चित्रपटात अण्‍णा या नावाने संबोधण्‍यात आले आहे. जॉन अब्राहम हा विक्रांत या व्यक्ती भूमिकेत असतो. जो की श्रीलंकेच्या उत्तरेतील प्रांतात निवडणूका घेण्‍याची जबाबदारी देण्‍यात आलेली असते. ती विना अडथळा पार पडत नाही कारण त्याला विरोध असते एलटीटीईचा. श्रीलंकेतील भारतीय सेनेत या विक्रांत नामक गुप्तहेराच्या भोवती चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखांची निमिर्ती करण्‍यात आली आहे. यात एक परदेशी पत्रकार महिलेचाही समावेश असतो. या पत्रकाराच्या भूमिकेत नर्गिस फखरी आहे. मद्रास कॅफे असा पहिलाच चित्रपट आहे ज्यात विदेशी भूमीत भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करण्‍याचा कट रचण्‍यात आल्याचे दाखवण्‍यात आले आहे. विकी डोनरसारखा चित्रपट बनवणारे सुजित सरकारने उत्कृष्‍टरित्या मद्रास कॅफे बनवला आहे. आज राजीव गांधींच्या हत्येला 22 वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांच्या हत्यामुळे कोणालातरी फायदा नक्कीच झाला आहे. वर्तमान स्थितीत एलटीटीई ही दहशतवादी संघटना अस्तित्वात राह‍िलेली नाही.