आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : मर्दानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कथा :
शिवानी राय (राणी मुखर्जी) ही मुंबई क्राइम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी आहे. आपले पती डॉ. बिक्रम राय (जिस्सू सेनगुप्ता) व भाचीसह ती राहात असते. क्राअम ब्रँचच्या आपल्या टीमसह गुन्हेगारांवर तिचा जबरदस्त वचक आहे. अनाथालयात राहणा-या प्यारी (प्रियांका शर्मा)वर शिवानीचे पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम. एके दिवशी प्यारी गायब होते. मुलींची तस्करी करणा-या व त्यांना देहविक्रयास भाग पाडणा-या टोळीच्या हाती प्यारी असल्याचे शिवानीच्या लक्षात येते. करन ऊर्फ वाल्ट (ताहीर भसिन) हा या टोळीचा डोकेबाज म्होरक्या. ड्रग्ज तस्करी, सेक्स ट्रॅफिकिंगच्या दुनियेच्या बादशाहच्या मागे मग शिवानी लागते. त्यासाठी ती दिल्लीत येते. शिवानीवर काय काय संकटे येतात? प्यारीची सुटका होते का? हे पडद्यावर पाहणे योग्य.
पटकथा- संवाद :
गोपी पुथरन यांनी कथा-पटकथा लिहिली आहे. मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील बहुतेक पात्रांच्या तोंडी आहे. तसेच खटकेबाज संवाद आहेत. गाणी फारशी नाहीत. शंतनू मोइत्राने कथेची गरज लक्षात घेऊन बॅकग्राउंड गाण्यावर भर दिला हे चांगलेच झाले.
अभिनय :
राणी मुखर्जीच्या घरचाच हा चित्रपट. काही फाइटस आणि देहबोली व संवादफेकीतून तिने डॅशिंग पोलिस अधिकारी चांगला साकारला आहे. तिची बाह्या सरकावण्याची स्टाइल, गुन्हेगारांवर टाकलेली जळजळीत नजर यातून राणीची मेहनत लक्षात येते. ताहीर भसिनने थंड रक्ताचा मुलींचा व्यापार करणारा माफिया मस्त रंगवला आहे.
सार :
राणी मुखर्जीला वेगळ्या रुपात पाहण्याचा अनुभव चांगला. मर्दानीचा पहिला हाफ चांगला रंगला असून दुसरा हाफ रेंगाळलाआहे. सेक्स ट्रॅफिकिंगसारख्या विषयावर प्रकाश टाकताना व्यवस्थेतील उणिवांही ठळकपणे मांडल्या आहेत. आणि हो, यशराज बॅनरचा फक्त प्रौढांसाठी (ए) प्रमाणपत्र असलेला हा पहिलाच चित्रपट आहे हे मात्र विसरू नका.