आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review: मेरी कोम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कहानी-
सिनेमाच्या पहिल्या सीनमध्ये मँगते चेग्नेइजँग मेरी कोम (प्रियांका चोप्रा)ला प्रेग्नेंट दाखवण्यात आले आहे. ती फ्लॅशबॅकमध्ये जाते तिला बालपणीपासून ते मेरी कोमपर्यंतचे सर्व दिवस आठवतात. मेरी कोमला बालपणी एक बॉक्सिंगचे ग्लब्ज सापडते. ती ते घेऊन घरी येते. मेरी कोम जशी-जशी मोठी होते तिचे बॉक्सिंगप्रति प्रेम वाढत जाते. तिच्या वडिलांना तिला एथिलट बनवण्याचे स्वप्न असते. मेरी कोमची भेट नरजीत सिंग यांच्याशी होते. ते बॉक्सिंगचे प्रशिक्षक असतात. ते मेरीला बॉक्सिंग शिकवतात. नॅशनल चॅम्पिअनसाठी टीमची निवड होते, तेव्हा मँगते चंग्नेइजँग मेरी कोमचे नाव शॉर्ट करून एमसी मेरी कोम ठेवण्यात येते. मेरी कोम पहिल्यांदा नॅशनल चॅम्पिअन बनते तेव्हा वडिलांना तिच्याविषयी माहित होते. त्यानंतर मेरीचे वडील तिच्याशी बोलणे बंद करतात. मात्र तिच्या वडिलांना स्वत:च्या चुकिची जाणीव होते आणि ते मेरीची माफी मागतात. तीन वेळा वर्ल्ड चॅम्पिअन बनल्यानंतर मेरी तिचा मित्र ऑनलेर (दर्शन कुमार)शी लग्न करते. लग्नावेळी कोच मेरीवर नाराज होतात. मेरीला लग्नानंतर जुडवा मुले होतात. परंतु तिचे लक्ष बॉक्सिंगकडे असते. पती ऑनलेर तिला पुन्हा बॉक्सिंगच्या करिअरला सुरुवात करण्याचा सल्ला देतो. मात्र, आई झाल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये मेरीचा प्रवास कठिण होतो. सिनेमात पुढे काय होते? मेरी कोणत-कोणत्या समस्यांना आणि अडचणनींना सामोरी जाते हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागेल.
प्रियांकाचा अभिनय-
प्रियांका चोप्रा किती उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे तिने सिध्द केले आहे. तसे तिने यापूर्वी 'बर्फी' आणि 'सात खून माफ'सारख्या सिनेमांतून वाहवाह मिळवली होती. परंतु यावेळी 'मेरी कोम' बननू तिने अभिनयाची पातळी उंचावली आहे. सिनेमातील ही भूमिका तिच्यासाठी कठिण होती. त्यामध्ये फिटनेससह उर्जादेखील लागणार होती. मात्र प्रियांकाने चाहत्यांना नाराज केले नाही.
उमंग कुमारचे दिग्दर्शन
एक दिग्दर्शक म्हणून उमंग कुमारचा हा पहिला सिनेमा आहे. परंतु सिनेमा पाहून ते जाणवत नाही. सिनेमा गतीने सुरुवात होतो त्याच गतीने पुढे जातो. अशाच उमंगचे पहिले दिग्दर्शन उत्कृष्ट होते असेच म्हणावे लागेल.
संगीत-
'मेरी कोम' हा एक बायोपिक सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमातील संगीतात लोकांना काहीच रस नसतो. सिनेमाचे 'दिल ये जिद्दी' हे गाणे खेळाडूच्या मनात उत्साह निर्माण करणारे आहे. इतर गाण्यांना शशि-शिवम यांनी चांगले संगीत दिले आहे.
का पाहावा?
महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने जगभरात नाव कमावले आहे. सिनेमाव्दारे तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी माहित करू घ्यायच्या असतील तर त्या दोन तासांपेक्षा कमी वेळात माहित होतील. त्यात प्रियांकाचे दमदार अभिनय असेल तर तुमचे पैसे वसूल झालेच असे समजा.
सिनेमाचा शेवट नॅशनल अँथमने
मेरी कोम चौथ्यांदा जेव्हा वर्ल्ड चॅम्पिअन बनते तेव्हा नॅशनल अँथम ऐकवले जाते.