आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्षिप्त मात्र आकर्षक आणि खिळवून ठेवणारा सिनेमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हातारा मंडोला (या भूमिकेसाठी अभिनयात पंकज कपूरला तोड नाही. त्याने रंगवलेला मंडोला सहज पटू लागतो.) जेव्हा मद्यधुंद होतो, तेव्हा तो पहिलेपेक्षा जास्त चांगला माणूस होतो. म्हणजेच बेफिरीने वागणारा, जास्त बडबड करणारा आणि थोडासा भाबडा.

खरे पाहता हे कोणताही दारुड्या व्यक्तीविषयी बोलले जाऊ शकते. अशा व्यक्तींनीच दारुड्या लोकांची लाज राखली आहे. तसेही मल्टीपल पर्सनॅलिटी असणे नेहमीच काही वाईट नसतं. मात्र मंडोलाचे व्यक्तीमत्त्व कमालीचे विभाजीत झालेले आहे.दारु पिल्यानंतर हा सुशिक्षित आणि श्रीमंत हॅरीहून थोडासा विक्षिप्त हरिया बनतो.

सिनेमाच्या शिर्षकात ज्या मंडोला शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे, तो या म्हाता-याशी संबंधित असून हरियाणातील एका गावाचे नावसुद्धा आहे. हरियाणाता मंडोलाच्या नावाचंच गाव आहे. आणि त्या गावाचा हा म्हातारा मंडोला राजा असतो.

एखाद्या श्रीमंत घरातील दारु पिणारी व्यक्ति ड्रिंकच्या रुपात स्कॉच किंवा सिंगल माल्‍टची निवड करेल. मात्र मंडोलाला गुलाबो नावाची दारू जास्त पसंत आहे.

कायदेशीररित्या त्याला चार ड्रिंकनंतर थांबायला हवे. येथे चार ड्रिंकचा अर्थ चार दारुच्या बाटल्या हा आहे. मात्र हा मंडोला एका श्वासात 42 बाटल्या दारु पिऊ शकतो. हे मजेशीर दृश्य कादर खान यांच्या कोणत्याही पटकथेतील एक भाग असू शकतो.

मंडोलाचा ड्रायव्हर आहे मटरु. इमरान खानने मटरुची भूमिका साकारली आहे. इमरान येथे आपल्या कंफर्ट झोनपासून बराच लाबं आहे. मात्र तरीदेखील इमरानने ही भूमिका अगदी सहजरित्या साकारली आहे.
मटरु त्याचा मालक मंडोलाच्या मुलीबरोबर (अनुष्का शर्मा) बरोबरच वाढला आहे. मटरु सुशिक्षित तरुण आहे. मात्र शिकलेला असूनदेखील त्याला चांगली नोकरी मिळत नाही. त्यामुळे तो मंडोलाकडे ड्रायव्हरचे काम करतो. वास्तविक पाहता मटरुचे काम मंडोलाला दारू पिण्यापासून थांबवणे हे आहे. मात्र तो अगदी याउलट काम करतो. श्रीमंत मंडोलाच्या घरी नोकरी करण्यामागे मटरुचा एक खास उद्देश आहे. तो म्हणजे गावातील शेतक-यांना त्यांच्या जमीनीवरील हक्क परत मिळवून देणे.

सिनेमाचा ट्रेलर बघता मटरुच्या भूमिकेबद्दल आपल्याला जास्त कळत नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिग्दर्शकाने ताणून धरली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नाचताना दाखवण्यात आलेले लोक खरे पाहता नोकर आहेत. या सगळ्या लोकांना एका राजकारणी नेत्याच्या मुलाने आफ्रिकेहून बोलवले आहे. आपल्या गर्लफ्रेंडला इंम्प्रेस करण्यासाठी त्याने हा सगळा घाट घातला आहे. सिनेमातील अनेक दृश्ये मजेशीर वाटतात. मात्र काही मजेशीर दृश्य दिग्दर्शकाने जास्त ताणून धरली आहेत. त्यामुळे कुठेतरी हा सिनेमा रटाळ वाटायला लागतो.

विशाल भारद्वाजच्या 'सात खून माफ' या सिनेमात व्यक्तिरेखांची लांबलचक श्रृंखला होती. सोबतच सिनेमाची कथाही तगडी होती. मात्र त्यात वास्तविकता नव्हती. या सिनेमाची कहाणी अगदी त्याउलट आहे.

या सिनेमातील व्यक्तिरेखा अगदी वास्तविक आणि ख-या वाटतात. सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करणा-या आहेत. सिनेमात शबाना आझमी यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली आहे. ही राजकारणी स्त्री अनेक दशकांपासून राजकारणात सक्रीय आहे. जर हे जग एक रंगमंच असते तर राजकारणी सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरले असते.

यूनानी भाषेत अभिनेत्याला पाखंडी म्हटले जाते. महिला मुख्यमंत्री विकास आणि गरीबांच्या उन्नतीबद्दल बोलते. मात्र खरे पाहता ही राजकारणी स्त्री फक्त स्वतःच्याच विकासावर जास्त भर देताना दिसते. या सिनेमातील इतर कलाकारही असेच करताना दिसतात.

खेदाची गोष्ट म्हणजे अशाप्रकारचा डार्क ह्युमर आपण 'जाने भी दो यारो' या संपूर्ण सिनेमात बघितला होता. तो या सिनेमात अपवादानेच काही काही ठिकाणी पाहायला मिळतो. कदाचित खूप व्यक्तिरेखा घेऊन हा सिनेमा अधिक इंट्रेस्टिंग बनवता आला असता. विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल' आणि 'ओमकारा' या सिनेमांचे हेच वैशिष्ट्य होते. त्यामुळे कधीकधी हा सिनेमा सपाट वाटतो. कदाचित साचेबद्धपणाची अपेक्षा असणा-यांना हा सिनेमा विशेष भावणार नाही. तसे पाहता अशा प्रकारच्या सिनेमात ते अपेक्षितसुद्धा आहे. असे असले तरीदेखील हा सिनेमा विक्षिप्त पण कमालीचा आकर्षक आणि खिळवून ठेवणारा आहे. त्यामुळे एकदा या सिनेमाची मजा लुटायला काहीच हरकत नाही.

(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)