आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेरे डॅड की मारुती'मध्ये ड्राईव्हवर जाऊ शकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सिनेमा बघताना हा एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीच्या उत्पादनाची ही लांबलचक जाहिरात आहे की काय ? असे कदाचित तुम्हाला वाटत असेल तर हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका.

सिनेमातील हीरोच्या वडिलांनी आपल्या जावयाला भेट स्वरुपात देण्यासाठी एक सेव्हन सीटर एसयूव्ही खरेदी केली आहे. कुटुंबात लग्नाचे वातावरण आहे. एका रात्री पार्टीनंतर हीरो कार घेऊन घराबाहेर पडतो. मात्र जेव्हा तो क्लबमधून बाहेर पडतो, तेव्हा पार्किंगमधून कार गायब झालेली असते. आता काय करावे, हे त्याला मुळीच कळत नाही.

या हीरोचे वडील टिपिकल सेल्फ-मेड मिडल क्लास भारतीय वडील आहेत. ते ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी खूपच पजेसिव आहेत. इतकेच कशाला ते आपल्या मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना जॉनीलिव्हरच्या ब्लॅक बॉटलमध्ये स्वस्त दारू भरुन पाजतात. ते खूपच कंजुष आहेत. शिवाय आपल्या मुलांवर आपले प्रेम व्यक्त करण्यातही ते कंजुषी करतात.
ही भूमिका राम कपूरने साकारली आहे. 'बडे अच्छे लगते है' या लोकप्रिय मालिकेत सध्या राम कपूर आपल्याला दिसत आहेत.

त्यांनी कठोर स्वभावाच्या वडीलांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा (साकिब सलीम) त्यांना कार हरवल्याची बातमी सांगण्यापेक्षा तरुंगात जाणे पसंत करेल. तो आणि त्याचा सगळ्यात चांगला मित्र (प्रबल पंजाबी) नवीन कार शोधण्याचा अतोनात प्रयत्न करतात. ही गोष्ट एसआरकेला ट्विट करुन सांगण्याची कल्पना या दोघांना सुचते. जेणेकरुन हे स्टार्स आपल्या फॉलोअर्सना त्यांच्यासाठी एक एक रुपया डोनेट करायला सांगतील. एखादी कार चोरण्यापेक्षा ही आयडिया उत्तम असल्याचे त्यांना वाटते.

हा तरुणाईचा सिनेमा आहे. हा सिनेमा बघून थिएटरमधून बाहेर पडताना आपल्या तोंडात काही शब्द फिरत असतात. उदाहरणार्थ नाआआआइस, स्वाइइइट, डूउउउड वगैरे. आपल्या सगळ्यांच्या तोंडी अशाप्रकारचे शब्द असतात. हे सगळे तोडकमोडक इंग्रजी बोलत असल्याचे आपल्या लक्षात येतं. जसे की, एम लव यू. किंवा ते अशा लोकांची खिल्ली उडवत असतात ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही. सिनेमातील संवाद दमदार आहेत.

या लो बजेट सिनेमात बॉलिवूडमधील मसाला, संयुक्त कुटुंबपद्धती, लग्न वगैरे सगळे काही आहे. हा 'देल्ही बेल्ही' सारखा सिनेमा नाहीये. मात्र सिनेमा आपल्या मजेशीर प्रवासामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे.


(लेखक प्रख्यात चित्रपट समीक्षक आहेत.)