आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकदाच बघण्यासारखा \'मर्डर 3\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही रिअ‍ॅलिटी शोचे चाहते असाल तर तुम्हाला विशेष भट्टच्या 'मर्डर 3'चे बिग ब्रदर आणि इमोशनल अत्याचार या रिअ‍ॅलिटी शोबरोबर असलेले साम्य ओळखायला फार वेळ लागणार नाही.

आता सिनेमा आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये कसले साम्य ? हाच विचार तुम्ही करत असाल ना... तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की, आपल्या पार्टनरचा खरेपणा ओळखण्यासाठी सिक्रेट रुपमधील समानता जी आज प्रत्येक रिअ‍ॅलिटी शोमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवली जात आहे. ती या सिनेमातसुद्धा बघायला मिळते.

तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून तुम्ही जर का सिनेमा बघण्यासाठी आले असाल, तर तुमची निराशा होणार आहे.

सिनेमात कोणताही दम नाही, असा विचार जेव्हा तुमच्या मनात डोकावतो, तेव्हा काही भयावह दृश्य तुम्हाला खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

ज्या प्रेक्षकांना हॉलिवूड चित्रपट बघायला आवडतं, त्या प्रेक्षकांना हा सिनेमा स्पेनिश थ्रिलर 'द हिडन फेस'ची हुबेहुब कॉपी असल्याचे लक्षात येईल. दिग्दर्शक विशेष भट्टने स्पेनिश सिनेमा देसी अंदाजात हुबेहुब साकारला आहे.
या सिनेमाची कहाणी व्यवसायाने वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असलेल्या विक्रम (रणदीप हुड्डा) भोवती गुंफण्यात आली आहे. विक्रम सुरुवातीच्या काळात साऊथ आफ्रिकेत राहतो, मात्र नंतर तो मुंबईत स्थायिक होतो.

विक्रमच्या गर्लफ्रेंडचे नाव रोशनी (आदिती राव हैदरी) आहे. रोशनीला विक्रमवर संशय आहे. एक दिवस ती विक्रमला मेसेज करुन आपल्या मनातील ही गोष्ट सांगून टाकते आणि त्याला सोडून निघून जाते. रोशनी अचानक सोडून निघून गेल्यामुळे विक्रम काळजीत पडतो, शिवाय काहीतरी गडबड असल्याचेही त्याच्या लक्षात येतं. तो पोलिसांत रोशनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतो. रोशनी बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई विक्रमकडेच वळते. मात्र विक्रम त्याकडे लक्ष न देता रोशनीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु करतो.

विक्रम प्रामाणिक जोडीदार आहे, असे आपल्याला वाटत असतानाच तो आपली निराशा करत एक मोठा झटका देतो. विक्रमची भेट बारमध्ये काम करणा-या निशा (सारा लॉरेन) बरोबर होते. तो तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर आलेल्या एका ट्विस्टमुळे पोलिस विक्रमलाच अटक करतात.

सिनेमात सस्पेन्स, टेंशन निर्माण करणारे अनेक चढउतार येतात. त्यानंतर सिनेमात पुढे काय होणार हे बघण्यास तुम्ही उत्सुक होतात.

रणदीप हुड्डाच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर, त्याने अभिनयात फारशी कमाल दाखवलेली नाही. सारा लॉरेनबद्दलही हेच बोलावे लागेल. तिचा अभिनय बघता तिला भविष्यात खूप वाव मिळेल असेही वाटत नाही.
आदितीची काम चांगले झाले आहे. एकंदरीतच हा सिनेमा वन टाईम वॉच आहे. सिनेमातील थ्रिल्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.