आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नशा' बघण्याची हिंमत न केलेलीच बरी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नशा' हा किंगफिशर मॉडेल पूनम पांडेचा पहिला सिनेमा आहे. हा सिनेमा बॉलिवूडमध्ये धमाल करेल असा दावा पूनमने केला आहे.

खरं तर आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेली पूनमला बघून ती एक अभिनेत्री होऊ शकते, यावर आपला विश्वास बसत नाही. कारण सोशल नेटवर्किंग साईट्वर पूनम आपल्या बोल्ड छायाचित्रांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे अभिनेत्रीच्या रुपात तिला मोठ्या पडद्यावर बघणे जरा आश्चर्यकारक वाटतं.

'नशा' हा सिनेमा एका 18 वर्षीय तरुणाची कथा आहे, जो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या 25 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडतो. ती तरुणी कधीच आपल्याला भेट शकणार नाही, हे ठाऊक असूनसुद्धा तो तिच्यावर प्रेम करु लागतो.
आपल्या एकतर्फी प्रेमाचा पाठ शिकताना त्याला अनेक गोष्टी समजू लागतात आणि परिणामस्वरुप हे दोघे एकमेकांच्या जवळ येतात. कथानकाच्या नावावर सिनेमात फक्त एवढेच आहे. संधी मिळताच हे दोघे एकमेकांच्या जवळ येत असतात. सिनेमात बोल्ड दृश्यांचा भडीमार आहे.

'जिस्म' या सिनेमाचे दिग्दर्शक अमित सक्सेना यांनी हा सिनेमा बनवताना पूनमची बोल्ड इमेज कॅश करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. अभिनयाच्या नावावर त्यांनी पूनमकडून तेच सीन्स करुन घेतले आहे, ज्यासाठी पूनम प्रसिद्ध आहे. अर्थातच पूनमचे अनेक बोल्ड सीन्स या सिनेमात बघायला मिळतात.

नवोदित कलाकार अभिनयात कमी पडले आहेत. त्यामुळे सिनेमा बघणे डोकेदुखीपेक्षा कमी नाहीये. पूनम पांडेला मोठ्या पडद्यावर बघण्यास इच्छूक असणा-यांनीच थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करावे, अन्यथा हा सिनेमा बघण्याची हिंमत न केलेली बरी.