आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FIRST REACTION : जाणून घ्या का बघावा आणि का बघू नये \'चेन्नई एक्स्प्रेस\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला यावर्षीचा बिगेस्ट रिलीज सिनेमा समजत असाल, तर तुम्ही चुक ठरु शकता. बिगेस्ट रिलीज तर नव्हे, मात्र सिनेमा बघताना तुम्ही नक्कीच बोअर होणार नाहीत, याची गॅरंटी आहे. शिवाय हा सिनेमा बघितला नाही तरीसुद्धा चालू शकेल. म्हणजेच सिनेमाच्या कथेत नाविन्य असे काहीच नाहीये, जे तुम्ही यापूर्वी कधी ऐकले किंवा बघितले नसेल. मात्र हा सिनेमा कॉमेडी आणि एन्टरटेनिंग आहे.

40 वर्षाच्या या अविवाहित पुरुषाला आपल्या मनाप्रमाणे जगायचे आहे. सुरुवातीला आजोबा त्याच्यावरील प्रेमापोटी त्याला लग्न करु देत नाहीत. त्यांच्या निधनानंतर राहुल जेव्हा गोव्याला जायला निघतो, तेव्हा त्याची आजी त्याला आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी रामेश्वरमला पाठवते.

आजीला बुद्धू बनवून तो गोव्याला जाण्यासाठी 'चेन्नई एक्स्प्रेस' पकडतो. याचदरम्यान हीरो म्हणजचे शाहरुखची भेट हिरोईन म्हणजेच दीपिका पदुकोणबरोबर होते. शाहरुख तिची गुंडांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करतो आणि येथूनच सुरु होते 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' स्टाईलची 'लव्ह एक्स्प्रेस'.

चेन्नईतील कोम्बन गावातील डॉनची मुलगी आहे मीना. जी तिच्या अप्पांनी पसंत केलेल्या मुलाबरोबर लग्न करु इच्छित नाही आणि तेथून पळ काढते. याचदरम्यान हा डॉन राहुलचासुद्धा शत्रू बनतो. मग राहुल कशी हिंमत एकवटून या गुंडांचा सामना करतो आणि डॉन दुर्गेश्वरशी लढा देताना कशा पद्धतीने सगळ्यांची मनं जिकंतो याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. हीच या सिनेमाची कथा आहे.

रोहित शेट्टीच्या या कॉमेडी-अ‍ॅक्शन सिनेमात अ‍ॅक्शन तर आहे, मात्र अगदीच साधी. त्यामुळे या सिनेमाची तुलना दबंग, सिंघम, खिलाडी यांसारख्या अ‍ॅक्शन सिनेमांबरोबर करता येणार नाही. कॉमेडीबद्दल बोलायचे झाल्यास थिएटरमध्ये अनेक लोक सिनेमा बघताना हसताना दिसतात.

याची तीन कारणे आहेत...

1.. जेव्हा ठाऊक नसलेल्या भाषेचा वापर तुम्ही तुमच्या बोलण्यात करता तेव्हा तुम्हाला हसू येऊ शकतं आणि या सिनेमातील विनोदाचे कारण आहे तामिळ भाषा. ही भाषा दीपिका म्हणजेच चेन्नईतील मीनाम्मा उर्फ मीना लोचनीला नीट बोलता येते. मात्र मुंबईत राहणारा राहुल अर्थातच शाहरुख ती भाषा समजू शकत नाही आणि त्याच्या तोंडून निघणा-या प्रत्येक शब्दाचा अर्थ चुकीचे ठरतो. तो चुकीचे उच्चारणसुद्धा करतो. त्यामुळे लोक हसून लोटपोट होतात.

तसे पाहता या सिनेमावर साऊथ इंडियन कम्युनिटीने आक्षेप घेतला होता. मात्र तेव्हा दीपिकाने स्पष्टीकरण दिले होते, की रोहित शेट्टी आणि ती स्वतः साऊथ इंडियन आहे. त्यामुळे सिनेमात आक्षेपार्ह काहीही नाहीये.

2.. दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले सत्यराज शाहरुखबरोबर तामिळ भाषेत संभाषण करत असताना त्याला म्हणतात, की तमिल तेरी मां ?
तेव्हा तामिळ भाषा अवगत नसलेल्यांना हसू येतं.
या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, यह मेरी मां के बारे में क्या बोल रहे हैं?

3.. रोचक गोष्ट म्हणजे, सिनेमामध्ये विनोद निर्मिती करण्यासाठी शाहरुखने आपल्या काही खास सिनेमांमधील संवादांचा वापर येथे केला आहे.
उदाहरणार्थ... आई एम राहुल अँड आई अ‍ॅम नॉट अ टेरेरिस्ट.

या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने विनोदात आपला हात आजमावला आहे. काही ठिकाणी शाहरुखचे एक्स्ट्रा एफर्ट्स दिसून येतात. शिवाय साजिद आणि फरहाद यांनी चांगले कॉमेडी डायलॉग्स लिहिले आहेत.

रोहित शेट्टीचा सिनेमा आणि गाड्यांबबरोबर स्टंट्स नसतील असं बरं कसं होईल. खास गोष्ट म्हणजे या सिनेमात द्विअर्थी विनोद नाहीये. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाबरोबर बसून हा सिनेमा बघता येऊ शकतो.

हा सिनेमा बघण्याची आणखी पाच कारणे....

1.. सुपरस्टार शाहरुख करोडो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. यावेळी सलमानने नव्हे तर शाहरुखने ईदच्या मुहूर्तावर आपला सिनेमा रिलीज केला आहे. त्यामुळे खानची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढते. शाहरुखची लोकप्रियता सातासमुद्रापलीकडेसुद्धा आहे. आता शाहरुख आणि सलमान चांगले मित्रही झाले आहेत. म्हणजेच सलमानचे चाहते हे आता शाहरुखचे चाहते. त्यामुळे तिकिटबारीवर गर्दी होणे स्वाभाविक आहे.

2.. सिनेमात एकही इंटीमेट सीन नाहीये. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाबरोबर बसून हा सिनेमा एन्जॉय करता येईल.

3.. 2007 साली दीपिकाने शाहरुख खानच्या 'ओम शांति ओम' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे एवढ्या वर्षांनी शाहरुख-दीपिकाची केमिस्ट्री कशी जमलीय हे बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील.

4.. शाहरुखला दीपिकाबरोबर जेव्हा काही सिक्रेट बोलायचे असतं, तेव्हा तो गाणं गाऊन आपली गोष्ट तिला सांगतो. दीपिकासुद्धा त्याचे उत्तर गाऊनच देते. हा सिनेमातील बेस्ट पार्ट आहे. सोबतच दाक्षिणात्य स्टार प्रियमणीचे आयटम नंबर थिरकायला लावणारे आहे.

5.. दिग्दर्शक रोहित शेट्टीची स्वतःची एक वेगळी छाप आहे. हा शाहरुखचा नव्हे तर रोहितचा सिनेमा आहे, असेही तुम्ही म्हणू शकता. यापूर्वीही रोहितने 'गोलमाल' सिरीजमध्ये कॉमेडीची स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. रोहितच्या 'बोल बच्चन' आणि 'सिंघम' या कॉमेडी-अ‍ॅक्शन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
रोहितने स्वतः दाक्षिणात्य असल्याचा फायदा या सिनेमात घेतला आहे. सिनेमाचा सेट तुम्हाला चेन्नईची सैर घडवतो. दीपिकाचा बोलण्याची लकब आणि सिनेमात दाखवण्यात आलेले दाक्षिणात्य सौंदर्य तुम्हाला नक्कीच पसंत पडेल.
गोवा, हैदराबाद आणि मुंबईव्यतिरिक्त या सिनेमाचे शूटिंग केरळमध्ये करण्यात आले आहे.

या तीन कारणांमुळे तुमची निराशासुद्धा होऊ शकते -

1.. सिनेमाच्या शेवटी सुपरस्टार रजनीकांतला ट्रिब्यूट देण्यात आले आहे. गाण्याचे शब्द आहेत लुंगी डान्स. हे गाणं प्रेक्षक सर्वाधिक एन्जॉय करु शकतात. मात्र हनी सिंगने गायलेल्या या गाण्याला सिनेमाच्या शेवटी ठेवण्यात आले आहे. हे गाणं सुरु होताना अर्धे प्रेक्षक थिएटरबाहेर पडलेले असतात. तर सिनेमातील इतर गाण्यांना विशाल-शेखरने दिलेले संगीत ठिकठाक आहे. मात्र वारंवार ऐकण्यासारखी ही गाणी नाहीत.

2..सिनेमात शाहरुखला 40 वर्षांचे दाखवण्यात आले आहे. आता शाहरुखच्या चेह-यावर वाढत्या वयाचा प्रभाव रोहित शेट्टीला दिसला असावा. दीपिका या सिनेमात खूप सुंदर दिसली आहे. मात्र काही ठिकाणी या शाहरुख-दीपिकाची जोडी चांगली दिसत नाही.

3.. काही ठिकाणी विनोद निर्मिती करताना शाहरुख ओव्हर-अ‍ॅक्टिंग करतोय, असं वाटतं. हं पण जर का तुम्ही शाहरुखचे चाहते असाल तर त्याची ओव्हर-अ‍ॅक्टिंगही तुम्हाला आवडू शकते.

आमच्याकडून या सिनेमाला साडे तीन स्टार्स.