आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: देसी कट्टे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही सिनेमाचे पोस्टर पाहून थिएटरमध्ये गेलात तर तुमचा पोपट होऊ शकतो. कारण सिनेमाचे संगीत, पटकथा यापेकी काहीच तुमच्या मनाला आवडणार नाहीये. सिनेमा संपल्यानंतर तुम्हाला पैसे आणि वेळ वाया गेल्यासारखे वाटेल.
कहाणी
ज्ञानी (जय भानूशाली) आणि पाली (अखिल कपूर) बालपणीचे मित्र असतात. दोघांचे बालपण एका आर्म्ड फॅक्टरीच्या आसपास गेलेले असते. दोघांना कट्टे बनवणे माहित असते. गुन्हेगारीच्या जगात ते जज साहेब (आशुतोष राणा) यांच्याप्रमाणे नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात. देसी कटट्याचा अवैध्य व्यापार करायला लागतात. बालपण ज्या परिसरात गेलेले असते तशीच यांचे राहणीमान असते, त्यामुळे ते निशानेबाजीतसुध्दा तरबेज असतात. त्यांच्यावर मेजर सूर्यकांत राठोडची (सुनील शेट्टी) नजर पडते. मेजर ते ज्ञानी आणि पालीला शूटरचे प्रशिक्षण देऊन शूटरच्या स्पर्धेसाठी तयार करतात. त्याचवेळी जज साहेब ज्ञानी आणि पालीला त्यांच्या टीममध्ये सामील करण्यासाठी बोलावतात.
पाली गुन्हेगारी जगात नाव कमावण्याच्या विचाराने जज साहेबासाठी काम करायला लागतो. मात्र ज्ञानी खेळात निपूण होतो आणि नाव कमवायला लागतो. दोघांचे मार्ग वेगळे होतात. हे दोन्ही मित्र पुन्हा एकत्र येतात का? ज्ञानी खेळात भारताला स्वर्णपदक मिळवून देतो का? गुन्हेगारी जगात पालीचे काय होते? हीच सिनेमाची पटकथा आहे. कथा वाचून तुम्हाला प्राभावी वाटली असावी मात्र बघायला एकदम बकवास आहे.
अभिनय
जय भानूशाली पहिल्या सिनेमात सुरवीन चावलासोबत 'बोल्ड सीन्स' देऊन रोमान्स करताना दिसला होता. त्या सिनेमात तो काही वेगळच दिसला. आता मुख्य नायिक होऊनदेखील त्याने काही खास कमाल दाखवली नाही. सुनील शेट्टीने कंटाळवाणा अभिनय केला आहे. अखिलविषयी बोलणेच व्यर्थ ठरेल. आशुतोष राणा दमदार होता. परंतु त्याचे पात्र रिपीट झाले. यापूर्वीसुध्दा तो अनेक सिनेमांत अशा भूमिका साकारताना दिसला आहे.
दिग्दर्शक
'जिला गाजियाबाद'सारखा फ्लॉप सिनेमा तयार केलेला दिग्दर्शक आनंद कुमारने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. इतर सिनेमांमधील काही सीन्स चोरी केल्यासारखे वाटतात. नको तिथे गाण्यांना मध्ये घातले आहे. अशाने प्रेक्षक टिकवून ठेवणे दिग्दर्शकाला जमलेले नाही.
पाहूच नये
या सिनेमाबाबतसुध्दा आमचे सरळ मत आहे, की हा सिनेमा फुल टू कंटाळवाणा आहे. सिनेमात ना अभिनय, ना कथा, ना संगीत काहीच पाहण्यासारखे नाहीये. त्यामुळे पैसे आणि वेळ वाया घालवू नका. असे सिनेमे लवकरच टीव्हीवर दाखवले जातात.