आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Show, First Reaction : जंजीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


1973 हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीत एक मोठा बदल घेऊन आलं, ज्यामुळे सिनेमांचा ट्रेंडच बदलून गेला. रोमँटिक सिनेमांऐवजी अँक्शन सिनेमांचा काळ सुरु झाला. हा नवीन ट्रेंड सुरु करण्यात जंजीर सिनेमाचा मोठा वाटा होता. जंजीरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे बिग बींना अँग्री यंग मॅनचा किताब मिळाला.

जंजीर 1976 मधला सुपरहिट सिनेमा होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ जबरदस्त कमाईच केली नाही, तर राजेश खन्ना यांच्या स्टारडमलासुद्धा फूल स्टॉप लावला. बॉलिवूडला अमिताभ बच्चनच्या रुपात नवा सुपरस्टार मिळाला. या सिनेमामुळे बिग बींचा फिल्म इंडस्ट्रीतील संघर्षाचा काळ संपला आणि त्यांनी यशोशिखर गाठले. दिग्दर्शक-निर्माता प्रकाश मेहरा यांचा जंजीर सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील क्लासिक सिनेमांमध्ये गणला जातो.

अमिताभ बच्चन यांच्या या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा मोह झाला तो अपूर्व लाखियाला. या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जंजीर सिनेमा रिलीज झाला. या रिमेकविषयी बोलताना कुठून सुरुवात करावी आणि कुठून नको, हे आम्हाला कळत नाहीये. शतकातील महानायक यांना किंग खान शाहरुखसुद्धा आव्हान देऊ शकला नाही, मग रामचरण तेजाचा हा तर डेब्यू सिनेमा आहे. सिनेमात मुख्य पात्राचे नाव विजय खन्ना ठेवून अभिनेत्याची उंची बिग बींऐवढी असून किंवा त्यांच्यासारखा ड्रेस परिधान करुन शतकातील महानायकाचे व्यक्तिचित्र मोठ्या पडद्यावर कुण्या दुस-या व्यक्तिच्या मदतीने मोठ्या पडद्यावर साकारणे अशक्य आहे, हे हा सिनेमा बघून स्पष्ट होतं.

या क्लासिक सिनेमाचा रिमेक केला असल्यामुळे पटकथेपासून ते अभिनेता, संगीतापासून प्रत्येक गोष्टीची तुलना ही होणारच. आता एवढ्या मोठ्या सिनेमाचा रिमेक बनवलाच आहे, तर मग प्रेक्षकांनी हे जाणून घ्यायला हवं की या सिनेमाचा निकाल काय आहे आणि त्याला किती स्टार्स मिळालेत ?

या सिनेमाच्या मुळ पटकथेत आजच्या काळानुरुप बदल करण्यात आले आहेत. या सिनेमात विजय खन्ना हैदराबादहून बदली होऊन मुंबईत येतो. तर मालाच्या भूमिकेत असेलली प्रियांका रस्त्यांवर नाचगाणं करणारी तरुणी नसून न्यूयॉर्कमधील सुशिक्षित मॉड तरुणी आहे. ती मुंबई आपल्या फेसबूक फ्रेंडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मुंबईत येते. तर तेजा या सिनेमात ऑईल माफिया आहे. 1973 साली ही भूमिका अजितने साकारली होती. या सिनेमात ही भूमिका साऊथ स्टार प्रकाश राजने साकारली आहे. तर मोना डार्लिंगची प्रसिद्ध भूमिका बिंदूने साकारली होती. ती भूमिका नवीन जंजीरमध्ये माही गिलने साकारली आहे.

या सिनेमात आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका ही शेरखानची आहे. प्राण साहेबांनी पठाणच्या भूमिकेत जीव ओतला होता. प्राण साहेबांची ही भूमिका कॉपी केली आहे ती संजय दत्तने. या सिनेमाचा स्क्रिनप्ले ढासाळ आहे. सिनेमा पुढे सरकवण्यात जो प्लॉट गुंफण्यात आला आहे, तो मुळीच जमला नाही. या सिनेमात लोक हीरोला बघण्यापेक्षा व्हिलनला बघणे पसंत करतील.

हा सिनेमा बघून रामचरण तेजाने बॉलिवूडमध्ये लीड हीरोच्या रुपात न आलेलेच बरे. या सिनेमाचे 25 दिवसांचे शूटिंग हैदराबादमध्ये झाले होते.सिनेमाचे संगीत ठिकठाक आहे. प्रियांची एन्ट्री पिंकी गाण्याने होते. ममता शर्मा आणि मीट ब्रदर्स अनजनने गायले आहे. या गाण्यातील लूक मुन्नी बदनाम हुई... या गाण्याशी मिळताजुळता आहे. मात्र या सिनेमातील एकही गाणे प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत नाही.

या सिनेमाला आमच्याकडून मिळतात दीड स्टार.