आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'क्रिश 3\' विज्ञान-मनोरंजनाचे देखणे फ्यूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या निमित्त राकेश रोशन 'क्रिश 3' हा चित्रपट घेऊन आले आहेत. हा चित्रपट हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन वर्गातील प्रेक्षकांना खेचणारा आहे. ज्यांना सुपरमॅन, स्पाईडरमॅन यासारख्या कॅरेक्टर्स पसंद पडतात त्यांना आता बॉलिवूडमध्ये तशा फिल्म उपलब्ध होऊ लागल्या आहेत. क्रिश-3 याच वर्गात मोडणारी असून फिल्म असून, भारतीय टच असलेली हॉलिवूड टाईप चित्रपटाची मजा तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत आरामशीर मजा लुटू शकता. असे असले तरी बॉलिवूडमध्ये यासारख्या चित्रपटाची संकल्पना म्हणजे वाईटातूनही चांगल्याचा विजयच म्हणता येईल.

कहाणी : कहाणी तेथूनच सुरु होते जेथे क्रिशची संपली होती. क्रिशमध्ये खलनायक डॉ. सिद्धांत आर्या (नसिरुद्दीन शाह) ला मात दिल्यानंतर कृष्णा आपले वडील रोहित (ऋतिक रोशन) यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढतो. यानंतर तो आपले प्रेम प्रियासोबत लग्न करून कौटुंबिक सुखात रममान झाला आहे. मात्र हे करीत असताना तो आपल्या तत्त्वाप्रमाणे वाईट लोकांविरूदधची लढाई लढत आहे. याचबरोबर तो विज्ञानाच्या मदतीने असे काही तंत्रज्ञान विकसित करु इच्छित आहे ज्याद्वारे त्याला वाटते की समाजाचा विकास झाला पाहिजे. जगात कृष्णासारखे चांगले माणसे लोककल्याणाकरिता झटत असले तरी वाईट करणा-यांचीही काही कमी नसते. असाच येथे एक काल (विवेक ओबेरॉय) येथे वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे. जो समाजात वाईट गोष्टी पसरवू पाहतो आहे. तो आपली ताकदीचा वापर काही तरी वाईट व खळबळजनक करण्याकरिता करीत असतो. त्याच्या या तालमीत आहे त्यानेच तयार केलेले म्यूटेंट्स. ज्यांच्या काही सवयी माणसासारख्या आहेत तर काही प्राण्यासारख्या. म्यूटेंट्सच्या मदतीने काल असा एक डाव रचतो ज्यामुळे जगाचा विनाश होण्याची शक्यता आहे. अशावेळी कृष्णा आणि त्याचे वडील रोहित या विनाशापासून जगाला वाचवितात. पण एकदम आलेल्या भयावह संकटावर कशी मात करायची हे सूचत नाही. त्यामुळे या दरम्यान त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. मग काय वाईटाचा नाश करण्यासाठी चांगले लोक यशस्वी होतात का? हे या चित्रपटात दाखविले आहे.
दिग्दर्शन- अशा चित्रपटात कलाकारांच्या अभिनयापेक्षा महत्त्वाच ठरते व असते ते म्हणजे तंत्रज्ञान. स्पेशल इफेक्ट्स साधारण काहणीलाही चांगलीच फोडणी देऊ शकतात. या चित्रपटाबाबत असेच काही घडले आहे. चांगले-वाईट ही संकल्पनेवर आलेल्या अनेक फिल्म्स आपण पाहिल्या असतील. अशावेळी या चित्रपटाची खासियत ठरते ते स्पेशल इफेक्ट्स. ज्यावर खूपच काम केले आहे. राकेश रोशनने यांनी हा चित्रपट करताना तंत्रज्ञानावरच जास्त मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्याचा फायदा राकेश रोशन यांना होणार आहे. राकेश रोशन यांना दिग्दर्शनाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याचाही प्रभाव जाणवतो. क्रिश सीरीजमधील पहिले चित्रपट मुलांना व कौटुंबिक प्रेक्षकांना खास आवडले होते तोच वर्ग धरून पुन्हा रोशन यांनी आपला होमवर्क केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी दर्जेदार केले आहे.
अभिनय- पडद्यावर ट्रिपल रोल करने सोपे नसते मात्र ऋतिकने हे आव्हान लिलया पेलले आहे. रोहित, कृष्णा आणि सुपरहीरो क्रिश या तीनही रोलमध्ये त्याने आपले सर्वोत्तम कसब पणाला लावले आहे. निगेटिव रोलमध्ये विवेक ओबेरॉय एकदम फिट बसला आहे. विवेकने याआधीही खलनायकाची भूमिका साकारल्या आहेत आणि विवेकने नायकाच्या भूमिका करण्यापेक्षा आता खलनायकाच्या भूमिकेकडे लक्ष द्यायला हवे असे म्हणावे वाटते.
संगीत- या चित्रपटाचे संगीत अतिशय कमकुवत आहे. ही चित्रपटाची सर्वाधिक दुबळी बाजू ठरली आहे. राकेश रोशन यांनी संगीताकडे थोडे अधिक लक्ष दिले असते तर चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांना आणखी मजा आली असती.
चित्रपट का पाहायचा- दिवाळीच्या काळात एक चांगली फॅमिली मूव्ही पाहू इच्छित असाल तर क्रिश-3 तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही हा चित्रपट एकदा जरूर पाहवू शकता. आमच्याकडून या चित्रपटाला 5 पैकी 3.5 स्टार.