आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST SHOW FIRST REACTION: शुद्ध देसी रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाची कथा आजच्या पिढीतील अशा तरुणांची आहे, जे मॉर्डन तर आहेत मात्र त्यांचे मन देसी आहे. या कथेत आकर्षण, प्रेम आणि नैराश्य हे सर्वकाही आहे. ही कथा प्रेम करणा-या अशा काही तरुणांची आहे, जे समाजातील नियमांना मानत नाहीत आणि केवळ आपल्या मनाच ऐकतात आणि तेच करतात. मात्र असं करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. एक वेळ अशी येते, की जेव्हा बिनधास्त स्वभावामुळे त्यांना समाज आणि कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. तेव्हा त्यांचं प्रेम हरतं की जिंकत ? यावर हा सिनेमा आधारित आहे.

'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाची कथा एक तरुण आणि दोन तरुणी यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे. रघु (सुशांत सिंग राजपूत) एक गाईड आहे. तो जयपूरमध्ये राहतो. येथेच त्याची भेट गायत्री (परिणीती चोप्रा) बरोबर होते. विचारांनी बोल्ड मात्र साधे राहणीमान असलेल्या गायत्रीचं रघूवर प्रेम जडतं. ती त्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची ऑफर देते.

रघूसुद्धा तरुणींवर फिदा होणारा तरुण आहे. तो तिची ऑफर स्वीकारतो. मग सुरु होते या दोघांची लव्ह स्टोरी. सर्व काही सुरळीत सुरु असतं. मात्र एकेदिवशी रघूची भेट तारा (वाणी कपूर) बरोबर होते. तारा मॉर्डन आणि स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे. जे मनात असतं तेच तिच्या ओठांवर असतं. रघु तिच्या अदांवर फिदा होतो. ताराला ही गोष्ट समजते. ती त्याला थेट म्हणते की, ''किस्सी विस्सी करने का मन कर रहा है तो कर न, बेवजह बातें बनाकर टाइम क्यों वेस्ट कर रहा है?''

आता रघू दोन्ही तरुणींमध्ये फसतो आणि येथून सुरु होते सिनेमातील खरी मजा. सिनेमात रघू तारा आणि गायत्री यांच्यापैकी कुणाची निवड करतो, हे लव्ह ट्रँगल रंजक पद्धतीने सिनेमात दाखवण्यात आले आहे.

दिग्दर्शन - 'बँड बाजा बारात' आणि 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमांचे दिग्दर्शन करणा-या मनीष शर्माने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या बोल्ड विषयाला त्याने मनोरंजनात्मक पद्धतीने सादर केले आहे. दिग्दर्शन उत्तम आहे.

अभिनय - सुशांत सिंग राजपूत एक तरुण टॅलेंटेड अभिनेत्याच्या रुपात समोर आला आहे. त्याने आपली भूमिका उत्तम वठवली आहे. परिणीती बोल्ड भूमिका साकारण्यात यशस्वी झाली आहे.
या सिनेमातील सरप्राईज पॅकेज म्हणजे न्यूकमर वाणी कपूर. तिचा नैसर्गिक अभिनय तुम्हाला दंग करतो. ती खूप चार्मिंग आहे आणि या सिनेमातील तिचा अभिनय बघून ती बॉलिवूडमध्ये लांबचा पल्ला गाठेल असं दिसतं.

एकंदरीतच हा सिनेमा मनोरंजन करणारा आहे. मात्र बोल्ड विषयावर आधारित असल्यामुळे कुटुंबाबरोबर हा सिनेमा बघता येणारा नाहीये. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. बोल्ड विषयाला फ्रेश ट्रिटमेंट दिल्यामुळे या विकेन्डला तुम्ही या सिनेमाचा ऑप्शन नक्कीच ट्राय करु शकता. आमच्याकडून या सिनेमाला 2.5 स्टार.