आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : 'सिंघम रिटर्न्स'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्‍वातंत्र्य दिन आणि सलग चार दिवस आलेल्‍या सुट्या यांचे औचित्‍य साधुन रोहित शेट्टी दिग्‍दर्शित बहुचर्चित चित्रपट 'सिंघम रिटर्न्स' रिलीज झाला आहे.
काय आहे गोष्‍ट?
यापूर्वी आलेला 'सिंघम' चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाची कहानी आहे. मुंबई पोलिसमधील डीएसपी 'बाजीराव सिंघम'वर आधारित हा‍ चित्रपट आहे. यामध्‍ये सिंघम (अजय देवगन) गुन्‍हेगारांची चांगलीच धुलाई करताना दिसत आहे.
महाभ्रष्‍ट बाबा (अमोल गुप्‍ते) आणि त्‍याचे भक्‍तगण जनतेला मुर्ख बनवत असतात. त्‍यांचा फर्दाफाश करण्‍यासाठी सिंघम प्रयत्‍नरत असतो. या भोंदुबाबाच्‍या विळख्‍यातून जनेतेला मुक्‍त करण्‍यासाठी सिंघमची भूमिका कशी असेल याविषयी संपूर्ण कथानक आहे.
'सिंघम' पेक्षा किती वेगळा आहे.'सिंघम रिटर्न्स'?
कार हवेत उडविने, स्‍फोट होणे हे रोहित शेट्टीच्‍या चित्रपटातील चिरपरिचीत सीन वाटतात. तसेच ते 'सिंघम रिटर्न्स'मध्‍येही ओघानेच आले आहेत.
'सिंघम रिटर्न्स'चा पहिला भाग थोडा स्‍लो आहे. त्‍यामुळे प्रेक्षकांना थोडे कंटाळवाने वाटू शकते. परंतु मध्‍यांतरानंतर चित्रपट अतिशय गतिवान होतो. आणि प्रेक्षकांच्‍या मनावर पकड घट्ट करतो.
कसे राहिले दिग्‍दर्शन ?
चित्रपटाचे सेंट्रल ऑफ अ‍ॅट्रक्‍शन अजय देवगन आहे. किंबहूणा चित्रपटाचा तो कणाच आहे. अ‍ॅक्‍शन सीनसाठी अजय अगदी परफेक्‍ट बसतो. तर करीना कपूरला चित्रपटामध्‍ये पाहिजे त्‍या प्रमाणात वाव मिळाला नाही. अजय सोबतची तिची केमेस्‍ट्री चांगली जुळली. परंतु डान्‍स आणि फक्‍त गाण्‍यातच तिला पाहण्‍याची मजा येत नाही.
राहिला प्रश्‍न अमोल गुप्‍तेचा. अमोल गुप्‍तेने खलनायकाच्‍या भुमिकेत जीव ओतला आहे. अगदी तो रोल त्‍याच्‍यासाठीच बनविला गेला आहे.
चित्रपट का पाहावा ?
'सिंघम रिटर्न्स' हा चित्रपट जबरदस्‍त अ‍ॅक्‍शनपट असून सहयोगी कलाकरांनीही चांगली भूमिका निभावली आहे. ज्‍या प्रेक्षकांना सिंघम आवडला होता त्‍यांना 'सिंघम रिटर्न्स' नक्‍कीच आवडणार आहे. मनोरंजनासाठी एकदातरी हा चित्रपट बघावाच.