आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्स ऑफ ह्युमर नसलेला \'यमला पगला दिवाना 2\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर आपल्या डोळ्यासमोर स्क्रिनवर कोणताही सिनेमा सुरु नसेल तर आपण कशाची समीक्षा करणार आहोत ? खरे पाहता, अशावेळी भरपूर बोलता येतं. मात्र जेव्हा आपण काही बघतो, तेव्हा त्याविषयी तर्कवितर्क लावणे एक अवघडच असते. असा सिनेमा बघायला जाताना खरे तर एक पटियाला पेग घेऊन जाणे कधीही योग्य. मात्र जर तुम्ही सकाळचा शो बघत असाल तर पटिलाया पेग घेणे खूप घाईचे ठरेल. मी सकाळी साडे नऊचा शो बघत होतो. साहजिकच एवढ्या सकाळी धरम पाजी किंवा सनी पाजीचे फार चाहते आले नव्हते.

मी डोळे चोळून हे बघण्याचा प्रयत्न करत होतो की, सिनेमात एकही व्हिलन नसताना एवढा अ‍ॅक्शनचा भडीमार का होतोय. मला एक व्यक्ती (अनुपम खेर) दिसते. त्या व्यक्तिला असा एक मॉल बनवायचा आहे, जो स्पेस स्टेशनसारखा असेल. मात्र याचा या सिनेमाशी काहीही एक संबंध नाहीये. सिनेमात रोमान्सचा तडका आहे, मात्र कुणाचे कुणावर आणि का प्रेम आहे, हे समजणे अवघड आहे. अर्थात हा एक असा सिनेमा आहे, जो कॉमेडी तर आहे, मात्र त्याच्यात सेन्स ऑफ ह्युमर नाहीये. तर मग आपण असा सिनेमा का बघतोय ? हा एक फॅमिली सिनेमा आहे. मात्र येथे फॅमिलीचा अर्थ देओल फॅमिलीबरोबर आहे.

धर्मेंद्र सिनेमात वडिलांच्या भूमिकेत आहे. त्यांची दोन मुले आहेत. सनी आणि बॉबी. हे दोघेही पडद्यावर सतत दिसत असतात. एक रोमँटिक आहे तर दुसरा पोलादी पुरुष आहे. तो इतक्या जोरात डरकाळी फोडतो, की सिनेमाचा पडदा थरथरायला लागतो, प्रेक्षकांच्या कानठळ्या बसू लागतात. सिनेमाची कथा लिहिण्याचे श्रेय सनी देओलची पत्नी लिंडाला जाते. मात्र हा सिनेमा पाच मिनिटांसाठी 'अंदाज अपना अपना' आणि पुढील पाच मिनिटांसाठी 'गोलमाल'सारखा आहे. पण त्या पुढील 141 मिनिटांचा संबंध कशाबरोबर आहे, हे मुळीच सांगता येत नाही. सिनेमाचे शीर्षक मोहम्मद रफींच्या गाजलेल्या आणि धर्मेंद्रवर चित्रीत करण्यात आलेल्या 'प्रतिज्ञा' (1975) या सिनेमातील 'मै जट्ट यमला पगला दिवाना...' या गाण्यावर आधारित आहे.

धर्मेंद्र आणि बॉबी पंजाबीच्या भूमिकेत आहेत. हे दोघेही लंडनमधील एका व्यावसायिकाच्या घरात ओबेरॉय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकाच्या रुपात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. सिनेमात व्यावसायिकाच्या भूमिकेत अन्नू कपूर आहेत. या व्यावसायिकाच्या घरात दोन तरुण मुली आहेत. दोघींपैकी एक त्याची मुलगी आहे. बॉबी सुरुवातीला दुस-याच मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र नंतर तो व्यावसायिकाच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करतो. सनीला मात्र अशी फसवणूक करणे जमत नाही आणि तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्णय घेतो.

मी खूप साध्या पद्धतीने सिनेमाची कथा तुमच्यासमोर रेखाटतोय. या सिनेमाच्यादरम्यान सूमो पहलवानसुद्धा दिसतात, हे मी तुम्हाला सांगितलेच नाही. शिवाय सलमान खानचे संवादही सिनेमात ऐकायला मिळतात. हा सिनेमा एखाद्या भोजपूरी सिनेमासारखा आहे. जो पंजाबी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आला आहे.

सिनेमा जसजसा पुढे सरकतो, तेव्हा आपल्याला कळतं की बॉबी त्या व्यावसायिकाच्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी स्वतः पेंटर बनण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्या कॅनव्हासवर अचानक एक चिंपाझी रंगांबरोबर खेळायला लागतो. तो या पेंटिंगला स्वतःची उत्कृष्ट पेंटिंग म्हणून विकतो. लोक त्या कलाकृतीला बघून आनंदीत होतात. बॉबी पिकासो बनतो. आपण मनातल्या मनात विचार करतो की, जर या कलाकृतीला कला म्हटले जाऊ शकते तर या सिनेमालाही सिनेमा म्हणायला हरकत नाही. होय, नक्कीच.