आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये जवानी है दिवानी' सिनेरसिकांसाठी मस्त ट्रीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सिनेमाच्या सुरुवातीच्या पहिल्या तासातच आपल्या लक्षात येतं की, हा सिनेमा 1995 साली रिलीज झालेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाचा रिमेक आहे. मात्र येथे रिमेक या शब्दाचा उपयोग वाईट नकलेच्या अर्थाने करण्यात आलेला नाहीये. उलट त्याला नवीन रुपात सादर करण्यात आले आहे. खरं सांगायचं म्हणजे, एक उत्कृष्ट रिमेक असाच असतो.

सिनेमाचा हीरो बेजबाबदारपणे वागणारा, टवाळक्या करणारा आहे. तर हिरोईन (दीपिका पदुकोण, जिचे हास्य लाजवाब आहे.) एक चश्मा लावणारी आणि अभ्यासू मुलगी आहे. ती पहिल्यांदाच आपल्या आईवडिलांशिवाय फिरायला जात आहे. दोघांचेही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते. या वयात घेण्यात आलेले निर्णय आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. ते मनालीमध्ये सुटी घालवायला आले आहेत. तेथेच या दोघांचे सुत जुळते. मात्र दोघांना काय घडतंय ते उमजत नाही. कदाचित याच कारणामुळे दोन भिन्न प्रकृतीचे लोक एकमेकांकडे आकर्षित होत असतात. या सिनेमात एक उत्तर भारतीय लग्नसुद्धा आहे. या सिनेमातील अर्धी गाणी या लग्नालाच समर्पित आहेत.

सिनेमाचा हीरो रणबीर कपूर आहे. सिनेमात त्याने कबीरची भूमिका साकारली आहे. मात्र सगळेजण त्याला बनी म्हणून हाक मारतात. मी सकाळी साडे दहाच्या सुमारास ज्या थिएटरमध्ये बसून हा सिनेमा बघतोय, तेथे सत्तर टक्के महिला आणि तरुणी आहेत. माझ्या मते, जो सिनेमा बघायला स्त्री वर्गच मोठ्या संख्येने गर्दी करतो, त्या सिनेमाच्या यशाची हमखास गॅरंटी देता येते. विश्वास बसत नसेल तर शाहरुख खानलाच विचारा. जर तुम्ही हॉलिवूड सिनेमांचे चाहते असाल तर रेयान गोसलिंगचा कोणताही सिनेमा बघून तुम्ही याचा अंदाज बांधू शकता. तसे पाहता रेयान गोसलिंगच्या सिनेमाचा या सिनेमाशी मुळीच संबंध नाहीये. स्त्रिया त्यांच्या आवडत्या हीरोला बघण्यासाठी थिएटरमध्ये दाखल होत असतात.

हळूहळू सिनेमाचे कथानक पुढे सरकतं. आपल्या लक्षात येतं की हा सिनेमा जवानी आणि दिवानीपेक्षा आणखी एका गोष्टीविषयी आहे. आपल्यासमोर बॉलिवूडमधला तोच अनादी प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे कधी एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात मैत्री होऊ शकते ? हो होऊ शकते. सध्याच्या काळातील सिनेमात ही काही नवीन गोष्ट नाहीये. शहरी आयुष्यात तर हे चित्र नेहमीच बघायला मिळतं. मात्र प्रेम आपल्यासाठी बंधनकारक आहे का ? यावर हा सिनेमा आधारित आहे.

या सिनेमातील कोणत्याही व्यक्तिरेखेजवळ याचे उत्तर नाहीये. प्रत्येकजण आपल्या पातळीवर या प्रश्नाचा सामना करतो. अगदी आपल्याप्रमाणे. हीरो आणि हिरोईनचे आणखी दोन बेस्ट फ्रेंड्स आहेत. 'आशिकी 2' या सिनेमातील हीरो आदित्य रॉय कपूर हीरोचा घट्ट मित्र आहे. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनय हा कल्कि कोचलीनचा आहे. ती या गँगची टॉमबॉय आहे. तिने साकारलेली डॅशिंग, टॉम बॉईश आदितीची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.

माझ्या मते, या पीढीत असे तरुण आहेत, जे आपले काम स्वतः निवडतात. एकतर ते आयुष्यभर कुणासाठी तरी काम करतात, किंवा स्वतःचेच एखादे नवीन काम सुरु करतात. ज्यामध्ये अपयश मिळण्याचीही बरीच शक्यता असते. पूर्वी हे चित्र फक्त धनाढ्य कुटुंबात बघायला मिळायचे. एक बिग बजेट रोमँटिक धाटणीच्या या बॉलिवूड सिनेमातसुद्धा हा पेच दाखवण्यात आला आहे. मुळात हा पेचच सिनेमा खास बनवतो. मी अशा प्रकारचा शेवटचा उत्कृष्ट सिनेमा 2011 साली बघितला होता. त्या सिनेमाचे नाव होते, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'. येथे आपल्याला या सिनेमाचे अनेक संदर्भ मिळतात. दिग्दर्शक अयान मुखर्जीचचा 'वेक अप सिद' (2009) असाच एक फ्रेश सिनेमा होता. अयान मुखर्जी बॉलिवूडमधील उत्कृष्ट तरुण लेखक-दिग्दर्शकांच्या पंक्तीत आला आहे, याबाबत कुठलेही दुमत नाहीये.

दिग्दर्शकाने सिनेमाची अचूक बांधणी केली आहे. रणबीर-दीपिकामधलं भारत आणि परदेशाविषयीचं द्वंद्व, फारुख शेख-रणबीरमधला संवाद असे अनेक प्रसंग उल्लेख करण्यासारखे आहेत. दिग्दर्शकाने इथे बाजी मारली आहे. फक्त खटकणारी एक गोष्ट म्हणजे सिनेमाची लांबी. सिनेमा अजून छोटा करता आला असता.

असो, सिनेमाचे संगीत उत्तम झाले आहे. कलाकारांचा अभिनयही उत्कृष्ट झाला आहे. त्यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांसाठी नक्कीच एक ट्रीट ठरु शकतो.