आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फटा पोस्टर..\'ला घासून गुळगुळीत झालेल्या कथानकाची फोडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या शाहिद कपूरच्या बाबतीत असे म्हटले जाऊ शकते, की त्याचे करिअर दुस-या कुणावर तरी अवलंबून आहे. सिनेमाच्या शेवटापर्यंत जाताजाता प्रेक्षक सिनेमातील एक-एक गोष्टी आठवू लागतात. म्हणजेच सिनेमात व्हिलनबरोबर हीरोची झालेली फाईट, आयटम गर्लबरोबर हीरोचा डान्स, हिरोईनबरोबरच रोमान्स, थोडीशी कॉमेडी, खूप झाले इमोशन्स, गुंडाना केलेले सळो की पळो. हीरोकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करायला हवी ? कदाचित एक डोकेदुखीची गोळी.

सिनेमातील हीरोला बॉलिवूडचा मोठा स्टार व्हायचे आहे. मात्र त्याने प्रामाणिक पोलिस ऑफिसर व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा आहे. का ? कारण त्याचे वडील भ्रष्ट पोलिस ऑफिसर असतात, त्यामुळे मुलाने तरी प्रामाणिकपणे पोलिस खात्याची सेवा करावी, अशी त्याच्या आईची इच्छा असते. मुलगा आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल होतो.

एका विचित्र घटनेमुळे एका प्रमुख वृत्तपत्रात सिनेमाचा नायक पोलिस वेशात वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर येतो. ही बातमी ऐकून त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती आपल्या मुलाच्या भेटीसाठी मुंबई गाठते. आता नायकाला तो पोलिस असल्याचं नाटक करावं लागतं. वास्तवात तो एक स्ट्रगलिंग कलाकारापेक्षा अधिक काही नाहीये.

सिनेमातील काही दृश्य मजेशीर आहेत. कदाचित हा सिनेमा कॉमेडीच्या रुपात तयार करण्यात आला असावा. मात्र डॉन, खरे आणि खोटे पोलिस, विचित्र घडामोंडीमुळे या सिनेमाची एक वेगळीच खिचडी तयार झाली आहे.

हा सिनेमा राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला आहे. संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अंदाज अपना अपना' या सिनेमाची गणना आजही हिंदी सिनेमातील उत्कृष्ट कॉमेडी सिनेमांमध्ये केली जाते. या सिनेमात सलमान खानने एक छोटेखानी भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेवरुन तो लवकर 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलमध्ये आमिर खानबरोबर झळकेल अशी आशा निर्माण झाली आहे. राजकुमार संतोषी जर 'अंदाज अपना अपना'चा सिक्वेल बनवण्याचा विचार करत असतील तर आपण प्रार्थना करायला हवी, की त्यांनी हा विचार सोडून द्यावा.

हा सिनेमा टिप्सची निर्मिती आहे. ही एक म्युझिक कंपनी आहे. आहे. एक चांगला रुबाबदार दिसणारा स्टार, भरपूर नाचगाणी हा टिप्सचा साधासरळ फॉर्मुला आहे. या सिनेमात फाटलेल्या पोस्टरमधून निघणारा हीरो अजब प्रेम की गजब कहानीतल्या हीरोप्रमाणेच अगदी बिनधास्त राहणारा आहे. टिप्सचे अनेक सिनेमे विकेण्डमध्ये जास्तीत जास्त कमाई करण्याच्या उद्देशाने रिलीज केले जातात. मात्र आठवडा संपतासंपता प्रेक्षक ते सिनेमे विसरलेले असतात. संतोषी यांना आजही दामिनी, घायल, घातक, द लेजेंड ऑफ भगत सिंग यांसारख्या सिनेमांसाठी ओळखले जाते.

संतोषींचा हा सिनेमा बघून मात्र निराशा होते. मात्र काय करणार, मुख्य नायक बॉलिवूडमध्ये स्टार बनण्यासाठी उत्सुक आहे. हा सडपातळ दिसणारा नायक सिंघमप्रमाणे हवेत उडून वार करतो आणि गुंडाना सळो की पळो करुन सोडतो. तो सूफी गाणं गाताना समुद्रकिना-याची सैर करतो, आयटम डान्स करण्यासाठी स्टेजवर अवतरतो, आईसाठी अश्रू गाळतो, कॉमेडीसाठी देवआनंद आणि अमोल पालेकर यांची नकल करतो. मनातल्या मनात विचार येतो, की देव त्याचे भले करो. मग आपण पॉपकॉर्नबरोबर डोकेदुखीची एक गोळी घेतो आणि घरी परततो.