आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाला भावणारा \'रांझणा\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


या सिनेमाविषयी विचार करण्यापेक्षा हा सिनेमाच का बनवला गेला याचा विचार करायची गरज आहे. एक तर कोणताही रोमँटिक सिनेमा बनवण्यामागे व्यावसायिक दृष्टिकोन असतो. कारण एक मोठा वर्ग रोमँटिक सिनेमांचा चाहता आहे. अशा प्रकारचे सिनेमे बघणा-यांमध्ये स्त्रिया आघाडीवर असतात. अनेक स्त्रिया आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडबरोबर रोमँटिक सिनेमे बघायला थिएटरमध्ये जात असतात. या तुलनेत अ‍ॅक्शन सिनेमाचा चाहता वर्ग मर्यादित आहे. अ‍ॅक्शन सिनेमांचे हार्डकोर चाहते मुख्यतः पुरुष असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास 'दिलवाले दुल्हिनिया ले जायेंगे' हा सिनेमा आजही मुंबईतील मराठा मंदिरमध्ये सुरु आहे. तर अ‍ॅक्शनचा तडका असलेल्या 'बॉडीगार्ड'ला प्रेक्षक विसरुनही गेले.

'रांझना' हा रोमँटिक धाटणीचा सिनेमा आहे. सिनेमातील हिरोईन (सोनम कपूर) मुस्लिम तर हीरो (धनुष) हिंदू आहे. दोघे लग्न करु शकत नाहीत. मुळात मुलीलाच मुलामध्ये रस नाहीये.

तिचा एक बॉयफ्रेंड (अभय देओल) आहे. हीरो (धनुष) हिरोईनचा (सोनम कपूर) पाठलाग करतो. मात्र तो तिला कधीही नुकसान पोहोचवत नाही. उलट तो स्वतःलाच त्रास देतो. जर मुलीला मुलगा आवडत नसेल तर मुलीने त्याच्यापासून दूर राहायला हवे, मात्र येथे तर हिरोईन हीरोला भाव देताना दिसते.

'मौसम' या सिनेमात शाहिद कपूरला सोनमला हॅलो म्हणायला जेवढा वेळ लागला होता, त्यावेळेत तर ती मुलाला वाईट वागणूक देते. ती त्याच्यावर हात उचलते, शिवाय त्याच्या लग्नाच्या प्रस्ताव स्पष्ट नाकारतही नाही. त्यामुळे हिरोईन आपल्या प्रेमाला स्वीकारेल की नाकारेल, हा विचार करुन हीरोचा जीव टांगणीला लागला आहे.

या सिनेमाच्या केंद्रबिंदू धर्म आहे. हीरोची भूमिका साकारणारा अभिनेता दक्षिण भारतीय आहे. हा तरुण साधारण नसून सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. तर सिनेमातील हिरोईन सोनम कपूर अभिनेता अनिल कपूरची लाडकी लेक आहे. ती मुळात पंजाबी असून पक्की मुंबईकर आहे. सिनेमातील जास्तीत जास्त भागाचे शूटिंग बनारस आणि दिल्लीत झाले आहे.

म्हणजेच चंदीगडपर्यंतच्या प्रेक्षक वर्गाचा याच्याशी संबंध येऊ शकतो. बराच हिशेब करुन या सिनेमात कोटी रुपये गुंतवण्यात आले, असे आपण म्हणू शकतो. मात्र अडचण ही आहे की, दिग्दर्शकाने सर्व स्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीला पडेल असा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यात तो यशस्वी ठरु शकला नाही.

मात्र आपण हे समजू शकत नाही की, हा एकतर्फी प्रेमावर आधारित (उदा. 'डर') सिनेमा आहे की वेगवेगळ्या स्तरातील लोकांची प्रेमकहाणी (उदा. 'राजा हिंदूस्थानी'), ज्यात हिरोईन सुशिक्षित आणि हीरो अशिक्षित दाखवण्यात आले होते. ? कारण सिनेमातील दोन मुख्य व्यक्तिरेखा तब्बल पाच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.

किंवा ही वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची प्रेमकथा (उदा. 'गदर') आहे ? की हा चेन्नईच्या एका हीरोला उत्तर भारताच्या सुपरस्टारच्या रुपात पडद्यावर सादर करण्याचे एक महागडे माध्यम आहे ?

धनुष तामिळनाडूमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याला देशभरातील लोक 'कोलावरी डी' या गाजलेल्या गाण्यासाठी ओळखतात. धनुषसाठी त्याची हिंदी भाषा दुरुस्त करणे आणि बनारसी शैलीत बोलणे सोपे काम नव्हते. ब-याच वेळा त्याच्या बोलण्यात तामिळ भाषेचा प्रभाव दिसून येतो.

असो, मात्र या भूमिकेसाठी धनुषची निवड योग्य आहे. या व्यक्तिरेखेच्या मते, जर तुमचे एखाद्या मुलीवर प्रेम असेल तर ते तिला पटवून देण्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे खूप मेहनत करा आणि दुसरा मार्ग म्हणजे तिच्या मनात भीती निर्माण करा. उदाहरणार्थ स्वतःच्या हाताची नस कापून घेणे, वैगेरे...

सिनेमाचे लोकेशन्स सुंदर आहेत. तसेही सध्याचे मुख्यधारेतील दिग्दर्शक स्टुडिओत सिनेमा चित्रीत करण्यापेक्षा प्रत्यक्ष ख-या लोकेशन्सवर चित्रीत करणे पसंत करतात. ए.आर.रहमान यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. या सिनेमात संगीतातील झॅजपासून ते कव्वालीपर्यंतचे प्रकार अनुभवायला मिळतात. तर बॅकग्राऊंड स्कोरमध्ये पाश्चिमात्य संगीत आहे. मला या सिनेमातील 'ऐसे ना देखो...' हे सॉफ्ट गाणे आवडले. हे गाणे 'दिल्ली 6' 'रहना तू' या गाण्याची आठवण करुन देतो.

माझ्या मते, या सिनेमातील रांझणाला बघण्यापेक्षा आपल्याकडे खूप कामं आहेत. जर तुमच्याकडे काम नसेल तर हा सिनेमा तुम्ही नक्की बघू शकता.