आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाविन्य नसलेला 'रब्बा मैं क्या करु'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रब्बा मैं क्या करु' या सिनेमाद्वारे पौराणिक मालिकांचा पाया रचणारे दिवंगत रामानंद सागर यांच्या कुटुंबातील एकमेव चित्रपट दिग्दर्शक असलेले अमित सागर यांनी आपली दुसरी इनिंग सुरु केली आहे.

अमित यांनी यापूर्वी '1971' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारासह बरीच प्रशंसा मिळाली होती. 'रब्बा मैं क्या करु' या सिनेमाद्वारे सागर कुटुंबातील एक सदस्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्याचे नाव आहे आकाश सागर. दिवंगत रामानंद सागर यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य पौराणिक मालिका किंवा सिनेमे तयार करेल, असा विचार तुम्ही करत असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल.

हा सिनेमा एक रोमँटिक कॉमेडी असून यामध्ये आकाश, अर्शद वारसी, ताहिरा कोचर, परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ही दोन भावांची कथा आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत अर्शद वारसी तर धाकट्या भावाच्या भूमिकेत आकाश आहे. आकाश लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नापूर्वी अर्शद वारसी आणि त्यांचे तीन मामा आकाशला सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र देतात.

सुखी वैवाहिक आयुष्य जगायचे असेल तर नव-याने आपल्या बायकोला धोका दिला पाहिजे, असे हे चौघे आकाशला सांगतात. हा एक सेक्स कॉमेडी सिनेमा असून यात बरेच द्विअर्थी संवाद आहेत. अशाप्रकारचे सिनेमे यापूर्वीही बॉलिवूडमध्ये बनले आहेत.

'मस्ती', 'क्या सुपरकूल है हम' यांसारखे अश्लील संवाद असलेले सिनेमे जर तुम्ही सहन करु शकता तर हा सिनेमासुद्धा तुम्ही नक्कीच पचवू शकाल. काही संवाद आणि दृष्ये मजेशीर झाली आहेत. सिनेमात नाविन्याच्या नावावर काहीच नाहीये.

कलाकारांचा अभिनय साधारण आहे. एकंदरीत ज्या प्रेक्षकांना सेक्स कॉमेडी सिनेमे आवडतात त्यांनी एकदा बघण्यासारखा हा सिनेमा आहे. कुटुंबाबरोबर बसून हा सिनेमा बघणे जरा कठीण आहे. आमच्याकडून या सिनेमाला 1 1/5 स्टार.