आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : रंगरेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रेटी तयार करण्यात अवघड असे काहीच नाही, फक्त तुमच्या खिशात भरपूर पैसा हवा. तुमचा फोटो किंवा व्हिडिओ मिडीयामध्ये जेवढ्या वेळेस दिसेल, तेवढीच तुमची ख्याती वाढेल, परंतु यासाठी खिसा रिकामा करण्याची तयारी हवी. निर्माता आणि रिअल इस्टेट डेव्हलपर वासू भगनानीचे सुपुत्र जॅकी असाच एक सेलिब्रेटी आहे आणि निश्चितच भारतामध्ये असे अनेक सेलिब्रेटी समोर येण्यास तयार असतील.

हा सिनेमा पूर्णपणे जॅकीच्या अवतीभवती फिरतो. सिनेमातील इतर सर्व पात्रांचे अस्तित्व यासाठी आहे की, जॅकीला चांगले आणि विनम्र दाखवता यावे. सिनेमात जॅकीच्या वडिलांचे त्याच्यावर खूप प्रेम आहे, कारण तो प्रामाणिक आहे. शेजारी त्याला पसंत करतात, कारण तो खूप गुणवान आहे.

हा सिनेमा आपल्याला 1980-90 दशकाच्या राम-लखन, दिवाना यासारख्या सिनेमांची आठवण करून देतो. ज्यामध्ये हीरोचे टपोरी मित्र जवळपास त्याच्या भक्तासारखे दाखवले जात होते. ते स्‍पॉटलाइटच्या खाली कॅरम खेळत होते, त्याच्यासोबत वाट्टेल तिथे जात होते आणि एखाद्यावेळेस त्याने एखादी चापट मारली तरी त्याचे जास्त वाईट वाटून घेत नव्हते. दुसरीकडे हिरो ‘यारों का यार’ आहे, सेक्सचे नाव काढताच लाजणारा आहे. परंतु धाडसपणात संपूर्ण मर्द आहे. त्याला कोणावरही झालेला अन्याय सहन होत नाही.

सिनेमात आपण पाहतो की, सगळीकडे शोषण आणि फक्त शोषणच आहे. कारण हा दोन दशकापूर्वीच्या ,सिनेमासारखा आहे, म्हणजेच यामध्ये कोणाचेतरी प्रेम हस्तगत करणे हे एक मोठे आव्हानच आहे. एक मुलगी घरात बंदिस्त आहे, एका मुलाची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. मुलीच्या जमीनदार बापाला मुला-मुलीचे भेटणे पसंत नाही.

मुलगा हिरोला भेटतो, जो पूर्णपणे दबंग, किंवा धाडसी, किंवा रंगरेज आहे. त्याच्याजवळ या समस्येचे एकच समाधान आहे : मुलीला पळवून आणा. सर्वांचे एकमत होते, कारण हा प्रेमाचा मामला आहे. या कामासाठी एक मित्र आपली कार फुकट किरायाने देतो.

मग काय, चार बेरोजगार मुले एसयूव्ही कारवर स्वार होतात आणि मुलीला तिच्या बापाच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी निघतात. या दरम्यान एका मित्राची ऐकण्याची ताकद संपून जाते. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार झालेला असतो, मला आत्तापर्यंत हे माहित नव्हते की, डोक्यावर मार लागल्यानंतर ऐकायला येत नाही. या ग्रुपमधील अन्य एक मित्र आपला पाय तोडून घेतो, कारण त्याच्या पायावरून ट्रक गेलेला असतो. परंतु थोड्याच वेळात तो आपल्या पायावर उभा राहतो.

या सिनेमातील ज्युनिअर कलाकार, उदाहरणार्थ पोलिस, ढाबेवाला, जमीनदाराची भूमिका साकारणा-या कलाकारांची निवड अगदी योग्य झाली आहे. मात्र या कलाकारांची नावेदेखील आपल्याला ठाऊक नाहीत. ते फक्त या सिनेमाचा एक भाग आहेत. याचा फायदा हा होतो की, सिनेमाची कथा आणि कॅमेरा पूर्णपणे हीरोच्या अवतीभोवती फिरत असतो.

हीरो आगीतून निघतो आणि जीपवर असलेल्या एका घोड्यावर ताबा मिळवतो. तो कुटुंबियांसाठी आपल्या बालपणीच्या प्रेमाचीही आहुती देण्यासाठी मागेपुढे बघत नाही. आपण आशा करतो की, ज्याप्रमाणे हा तरुण त्याचे कुटुंबीय आणि वस्तीतील लोकांवर प्रेम करतो, अगदी त्याचप्रमाणे सगळेजण त्याच्यावरही जीव टाकतात. मात्र सिनेमाच्या शेवटी जेव्हा हीरो गंगनम स्टाईलचा डान्स करतो तेव्हा लोकांना नेमक काय आवडत आणि काय नाही, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे आपल्या लक्षात येतं.

शेवटी तुमच्यात स्टार बनण्याची क्षमता आहे की नाही, तुमचे चाहते आहेत की नाही, हे महत्त्वाचे नाही. याउलट सेलिब्रिटी होण्यासाठी प्रयत्न करण्यात हरकत आहे. महत्त्वकांक्षा ही मोठी असते. मात्र अडचण ही आहे की यामुळे कधी कधी अशा सेलिब्रिटींचा सिनेमा बघण्यासाठी पैसे वाया घालून देखील प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागतो.